साईमत / जळगाव / प्रतिनिधी अनुसूचित जातीची वर्गवारी करून , त्यांना क्रिमिलेयर लावून आरक्षण निश्चित करण्या बाबत राज्य शासनास अधिकार असल्या बाबतचा जो निर्णय सर्वोच्य न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे तो अनुसूचित जातीवर अन्यायकारक असून आरक्षणाची टक्केवारी त्यामुळे कमी होईल व अनुसूचित जातीत विनाकारण असंतोष निर्माण होईल तेंव्हा राज्यशासनाने त्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना येथील आरक्षण बचाव संघर्ष समिती तर्फे देण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी जळगावातील सागर पार्क मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळावा कार्यक्रमासाठी जळगाव विमानतळावर दाखल झाले होत, त्यावेळी त्यांची भेट घेवून निवेदन देण्यात आले. तसेच सर्वोच्य न्यायालयाचा…
Author: Saimat
साईमत / जळगाव / प्रतिनिधी ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा…या प्रमुख मागणीसह विविध मुद्द्यांचे निवेदन राष्ट्रीय ओबीसी मोर्चा व भारत मुक्ती मोर्चातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले, सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. ओबीसींची जातीनिहाय जनगणना व संख्येच्या प्रमाणात सर्व क्षेत्रात प्रतिनिधित्व द्या, या प्रमुख मागणीसह विविध ९ मुद्द्यांना धरुन राष्ट्रीय ओबीसी मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा मार्फत संपुर्ण भारतात चार चरणात नियोजनबध्द आंदोलन घोषित करण्यात आले आहे. त्यापैकी आज १३ ऑगस्ट रोजी आंदोलनाच पहिला टप्पा होता. या चरणात राष्ट्रपती महोदयांना भारतातील प्रत्येक जिह्यातील जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदने देण्यात आले. राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे राज्य सदस्य घनशाम चौधरी सर, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ…
साईमत / जळगाव / प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ समिती गठीत करण्यात आली आहे. समितीची बैठक दि.१२ ऑगस्ट रोजी मनपा प्रशिक्षण इमारतीतील माळा क्रमांक 13 येथे आ. राजूमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आयुक्त तथा प्रशासक झानेश्वर ढेरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्याच्यानंतर समिती अध्यक्ष तथा आ. राजूमामा भोळे यांच्या संमतीने बैठकीस सुरुवात झाली. यावेळी सदस्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ऑनलाईन केलेल्या रजिस्ट्रेशन व छाननी केलेले अर्ज याबाबतची संपूर्ण माहिती पीपीटी द्वारे देण्यात आली. मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेच्या अंमलबजावणी कामी नारी शक्ती दूत मोबाईल ॲप द्वारे ऑनलाइन भरलेल्या अर्जांची संख्या व…
साईमत / जळगाव / प्रतिनिधी जळगाव जनता सहकारी बँकेच्या संचालक पदी जळगाव शहरातील बांधकाम व्यावसायिक मधुकर धोंडू पाटील यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातून स्थानिक मतदार संघातून रिक्त झालेल्या जागेवर अध्यासी अधिकारी विशाल ठाकुर सहाय्यक निबंधक अधीन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या मुख्य कार्यालयात दुपारी 2 वाजता संचालक मंडळाच्या सभेत मधुकर धोंडू पाटील यांची निवड करण्यात आली. कार्यक्रम पत्रिकेनुसार मधुकर पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. सदर अर्जास सूचकहरिश्चंद्र यादव व अनुमोदक म्हणून हिरालाल सोनवणे होते. अर्ज छाननी अंती तो योग्य असल्याने अध्यासी अधिकारी विशाल ठाकुर यांनी मधुकर धोंडू पाटील यांची निवड झाल्याचे घोषित केले.…
साईमत/ न्यूज नेटवर्क/ सोयगाव सोयगाव शहरापासून जवळ असलेल्या निंबा यती शिवारात शनिवारी रात्री चक्क बिबट्या ने सावज च्या शोधात मुक्काम ठोकला असल्याचे रविवारी आढळलेल्या बिबट्या च्या पावलांच्या ठशा वरून स्पष्ट झाले आहे. वनविभागाने या ठशांची छाया चित्रे तपासणी घेतले असून पंचनामा केला आहे. परिसरात शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांनी केले आहे. सोयगाव शेंदूरणी रस्त्यावर मुक्त बिबट्या आढळल्याचे ताजी घटना असताना शनिवारी रात्री निंबायती शेती शिवारात बिबट्या ने मुक्काम ठोकल्याचे रविवारी सकाळी आठ वाजता आढळलेल्या फूट स्टेप वरून स्पष्ट झाले आहे, निंबायती शिवारातील शेतात व बांधावर ठिकठिकाणी बिबट्या चे पायांची ठसे रविवारी आढळून आल्या चे कळताच सोयगाव…
स्वातंत्र्य लढ्यात प्राणार्पण केलेल्या शहिदांना अभिवादन साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी : येथे ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे गोदाई बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘एक शाम शहीदों के नाम’ राष्ट्रभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम पहूर येथील आर.टी. लेले हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात घेण्यात आला. कार्यक्रमात प्रारंभी क्रांतिकारी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य लढ्यात प्राणार्पण केलेल्या शहिदांना अभिवादन केले. स्वर गुंजन म्युझिकल ग्रुपतर्फे विविध राष्ट्रभक्तीपर गीत सादर करण्यात आले. राष्ट्रभक्तांनी सादर केलेल्या गीतांनी सारेच वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. याप्रसंगी पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, गोदाई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कैलास चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य…
साईमत / प्रतिनिधी / जळगाव “जिल्हयात मुख्यमंत्री यांच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने पालकमंत्री गुलाबराव पाटील, यांची पत्रकार परिषद झाली. त्यापूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत 4 लाभार्थ्यांना पालकमंत्री यांच्या हस्ते कार्य प्रशिक्षण आदेश देण्यात आले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्य निवड झालेले उमेदवार खालील आस्थापनांवर रुजू झालेले आहेत. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय, जळगाव, सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, जळगाव, मौलाना आझाद, अल्पसंख्यांक महामंडळ, जळगाव या कार्यालयांचा समावेश आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अधिकाधिक शासकीय व खाजगी आस्थापना,महामंडळे,उद्योजक यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव…
साईमत / प्रतिनिधी / जळगाव तक्रारदार यांना मुकादम पदावरून स्थगिती दिल्यानंतर त्याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त येथे सुनावणी सुरू असतांना निकाल लावण्यासाठी लावून देतो असे सांगून ५० हजारांची मागणी करत तडजोडीअंत ३६ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या कामगार निरीक्षकाला जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवाशी आहेत. ते माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तथा मुकादम म्हणून करत होते. तक्रारदार यांना मुकादम पदावरून स्थगिती देण्यात आली होती. याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. दरम्यान या सुनावणीचा निकाल लावण्यासाठी कामगार निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी…
शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण, धरण पाहण्यासाठी होतेय गर्दी साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी: बहुतांश भागात पावसाचा जोर वाढून अनेक नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा होत असल्याने आनंद व्यक्त होत होता. मात्र, चोपडा तालुक्याच्या पूर्व भागातील २० ते २५ गावांसाठी सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणाऱ्या सातपुड्यातील चिंचपाणी धरणात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानंतरही धरणात फक्त मृतसाठा एवढे पाणी जमा झाले असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसाने हे धरण प्रथमच तुडूंब भरून ‘ओव्हर फ्लो’ वाहु लागल्याने शेतकरी वर्गाच्या आनंदाला उधाण आले आहे. धरण पाहण्यासाठी येथे मोठी गर्दी होत आहे. चोपडा तालुक्याच्या पुर्व भागातील बिडगाव, मोहरद, धानोरा,…
रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात शांतता साईमत/निंभोरा,ता.रावेर/प्रतिनिधी: रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक नुकतीच घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सपोनि हरिदास बोचरे होते. यावेळी प्रगतीशील शेतकरी कडू चौधरी, प्रल्हाद बोंडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डिगंबर चौधरी, स.पो.नी बोचरे, स्वप्निल पाटील यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीत निंभोरा येथून बदली झालेल्या पोलिसांना निरोप देण्यात आला. निंभोरा येथे प्रदीर्घकाळ सेवा बजावलेले गोपनीय विभागात कार्यरत पो.ना.का. स्वप्निल पाटील यांची बदली झाल्याने त्यांना भेटवस्तू शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते निरोप देण्यात आला. यावेळी नरेंद्र ढाके,राजीव बोरसे,सुनील कोंडे, काशिनाथ शेलोडे, ज्ञानदेव नेमाडे,राजू भोगे दिलशाद शेख मनोहर तायडे मनोज सोनार दस्तगीर खाटीक गोकुळ भोई,गजानन पाटील, सागर तायडे,…