साईमत वृत्तसेवा गेल्या दोन दिवसांत भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) बेंगळुरू येथील नेताजी सुभाष दक्षिणी केंद्राला भेट देण्याचा अनमोल अनुभव मला लाभला. या केंद्रातील अत्याधुनिक सुविधा, प्रशिक्षण उपकरणे आणि स्पोर्ट्स सायन्स सेंटरसारख्या जागतिक दर्जाच्या क्रीडा परिसंस्थेची पाहणी करताना मनात एक नवा उत्साह निर्माण झाला. नवीन इनडोर कबड्डी कोर्टपासून या केंद्राच्या विविध क्रीडा सुविधा पर्यंत पाहून, भारताच्या क्रीडा क्षेत्राचा भव्य विकास आणि भविष्यातील यशाची खात्री अधिक दृढ झाली आहे, असे सांगण्यात आले आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण, ज्याला सध्या ‘स्पोर्ट्स इंडिया’ नावाने ओळखले जाते, ही भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयांतर्गत 1982 मध्ये स्थापन झालेली सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा संस्था आहे. याचा मुख्य…
Author: Saimat
साईमत मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २०२४ मधील राज्यसेवा मुख्य परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे, मात्र या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (एसईबीसी) आरक्षणाचा तिढा अजूनही कायम आहे. यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली आहे. २०२४ साली एमपीएससीने नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात केली होती, पण त्या वेळी मराठा आरक्षण लागू नव्हते. नंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्यात मराठा आरक्षण लागू झाल्यामुळे उमेदवारांच्या प्रवर्गांमध्ये मोठी गडबड निर्माण झाली. विशेषतः वर उल्लेखलेले ‘नॉन क्रिमिनल’ प्रमाणपत्र न दिल्यामुळे काही उमेदवारांचे एसईबीसी प्रवर्गातील अर्ज अमान्य झाले आणि ते पूर्वी अर्ज केलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातच…
साईमत वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MAHATRANSCO) यांनी अलिकडे असिस्टंट इंजिनीअर (सिव्हील) या पदासाठी एकूण 134 जागांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती महापारणमध्ये सरळसेवा भरतीद्वारे करण्यात येणार असून, उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत. पात्रता आणि वेतन: या पदासाठी उमेदवारांना सिव्हील अभियांत्रिकीमध्ये बी.ई./बी.टेक. ची पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे आहे. वेतन श्रेणी रु. 58,560 ते रु. 1,42,050 असून, अंदाजे दरमहा वेतन रु. 1,07,596 एवढे असेल. चोकटी माहिती: पदाचे नाव: असिस्टंट इंजिनीअर (सिव्हील) एकूण जागा: 134 आरक्षण: ओपन – 36, EWS – 14, SC – 20, ST – 7, VJ – A – 2,…
साईमत चाळीसगाव प्रतिनिधी स्वर्गीय के. आर. पाटील यांच्या निधनामुळे मानव सेवा प्रतिष्ठान, वालझिरी (ता. चाळीसगांव, जि. जळगाव) येथे या संस्थेचे अध्यक्षपद रिक्त झाले होते.त्यामुळे संस्थेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीसाठी दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी संस्थेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. ही बैठक संस्थेचे उपाध्यक्ष संजय अहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली. सभेत एकमताने संस्थेच्या विविध पदांसाठी निवड करण्यात आली.या बैठकीत अध्यक्ष रविंद्र पुंडलिक पाटील,उपाध्यक्ष संजय विश्वासराव अहिरराव,सचिव नरेश कणककुमार दोशी,खजिनदार महेंद्र सिताराम पाटील,कायदेशीर सल्लागार अॅड संग्रामसिंग सुमेरसिंग शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडणुकीच्या प्रसंगी कांती पटेल, हरीष पल्लन, के. डी. पाटील, आर्किटेक्ट धनंजय यशवंतराव चव्हाण, कुलकर्णी साहेब यांच्या वतीन नवनिर्वाचित…
साईमत अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईला सामोरं जाण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्री. नितीनकुमार मुंडावरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत टँकरफेड गावांमध्ये सार्वजनिक उद्भवांची नोंद, जलतारा योजनांच्या अंमलबजावणीत वेग, पूर्णत्वास आलेल्या पाणी योजनांच्या इलेक्ट्रिक कनेक्शन अडचणी यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठकीचे प्रमुख मुद्दे: टँकरफेड गावांमध्ये तात्पुरते उपाय: सार्वजनिक उद्भव (जलस्रोत) चिन्हांकित करून तेथे जलतारा प्रकल्पांना प्राधान्य. मनरेगा योजनेतर्गत कामे: जलसंधारण कामांच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना तांत्रिक सहाय्य देण्याचा निर्णय. इलेक्ट्रिक अडचणी सोडवणे: पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांना तातडीने विजेचे कनेक्शन मिळण्यासाठी महावितरण आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांत समन्वय साधण्याचे आदेश. समन्वयात्मक नियोजन: तालुक्यातील सर्व विभागांनी 15-दिवसीय पाणीटंचाई आराखडा जिल्हास्तरावर सादर करण्याची मागणी श्री. मुंडावरे यांनी…
साईमत धुळे प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने विजय प्राप्त केला. या मध्ये धुळे ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार राघवेंद्र (राम) भदाणे यांनी प्रचंड मतांनी ऐतिहासिक विजयचा गुलाल उधळला. धुळे ग्रामीणच्या ग्रामस्थांमध्ये उत्सहाचे वातारवण झाले आहे. आ.राम भदाणे यांचा विविध ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. नुकताच अंचाडे येथे नवनिर्वाचित आमदारांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार भदाणे व विधान परिषदचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान अंचाडे गावाचे सरपंच तथा मुख्याध्यापक चुनीलाल पाटील यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला. आ. राम भदाणे यांनी अंचाडे गावातील ग्रामस्थांचे आभार मानताना मनोगत व्यक्त केले. ग्रामस्थांना विश्वास दिला कि, धुळे ग्रामीणच्या मतदारांनी ज्या कार्यासाठी…
साईमत यावल प्रतिनिधी सातपुडा (Satpuda) पर्वतापासून ६० ते ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या जळगाव जिल्ह्यातील यावल वनविभाग उपवन संरक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील यावल वनपरिक्षेत्र पश्चिम भागात गेल्या महिना दीड महिन्याच्या कालावधीत बिबट्याने (Leopard) एका बालकावर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज रात्री एक वाजेच्या सुमारास डांभुर्णी शिवारात मेंढपाळ कुटुंबातील आईच्या कुशित झोपलेल्या बालिकेला बिबट्याने उचलून नेऊन ठार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वनपरिक्षेत्र पश्चिम आणि पूर्व भागासह संपूर्ण यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. वन विभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील शेत शिवारात गट क्र. ७४१ मध्ये…
साईमत नाशिक प्रतिनिधी महाराष्ट्रातील मुंबई ते मनमाडदरम्यान धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये (Panchavati Express) धावत्या ट्रेनमध्ये एटीएम सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा देशातील रेल्वे इतिहासातील पहिली असून, प्रवाशांना प्रवासादरम्यान रोकड काढण्याच्या सोयीत मोठा बदल घडवून आणणार आहे. या नव्या सुविधेमुळे प्रवाशांना थांबावे लागत नाही, थेट रेल्वेतून रोख रक्कम काढण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आकस्मिक गरज असणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. ही सुविधा मंगळवारी पंचवटी एक्स्प्रेसच्या एका खास एसी कोचमध्ये बसवण्यात आली असून, सुरक्षेला पूर्ण प्राधान्य देत एटीएम शटरद्वारे संरक्षित ठेवण्यात आले आहे. तसेच, एटीएमवर सीसीटीव्हीद्वारे सतत लक्ष ठेवले जाईल. या ऑनबोर्ड…
साईमत जामनेर प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील पाळधी व लोंड्री प्रभागातील सावित्रीबाई फुले महिला प्रभाग संस्था आणि दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या संधारणाअंतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. या सभेत मंत्री गिरीश महाजन (Girish mahajan) श्री. आयुष प्रसाद, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि श्रीमती मिनल करणवाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत अनेक मान्यवरांनीही सभेत भाग घेतला. सदर सभेत गावोगावी महिलांना स्वयंसहायता समूहांतून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून संवाद साधला गेला आणि संवादातून येणाऱ्या नवीन विचारांना चालना देण्याचा प्रयत्न झाला. दीनदयाल अंत्योदय योजना व राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान: परिसर दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन…
साईमत सोयगाव प्रतिनिधी हवेने मुख्य लाईनचे वीज (Electricity) तार एकमेकांना स्पर्शून झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे शेतीला (Farm) आग लागल्याची घटना दुपारी एक वाजेच्या सुमारास जरंडी शिवारात घडली दरम्यान शेतातील आगीमुळे अंथरलेल्या तीन एकर क्षेत्र जळून खाक झाले आहे. राजेंद्र पांडुरंग चौधरी गट क्र-३०१ मध्ये तीन एकर क्षेत्रावर अंथरलेल्या ठिबक सिंचनाच्या नळ्या जळून खाक झाल्या तर या आगीत इतर शेती उपयुक्त साहित्यही खाक झाले आहे त्यामुळे शेतकऱ्याचे यामध्ये दोन लाख चाळीस हजार रु चे ठिबक सह इतर साहित्य कोळसा झाला आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांसह पंधरा जणांनी शेतातील आग विझविण्यासाठी प्रयत्न केले अखेर सायंकाळी चार वाजता ही आग नियंत्रणात…