Author: Saimat

पुलावर मालट्रकला मागून आलेल्या मालट्रकनेच दिली धडक नवापूर/प्रतिनिधी धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडी गावातील सरपनी नदीच्या पुलावर रात्री दहा वाजता पुढे चालत असलेल्या ट्रकला मागुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने चालक, सहचालक जबर जखमी झाल्याची घटना घडली. सविस्तर असे की, रात्री दहा वाजता विसरवाडी येथील सरपनी नदीच्या पुलावर पुढे जात असलेल्या मालट्रकला नागपूरहुन बारडोली जाणारा मालट्रक हा भरधाव वेगाने येत असतांना मागून जोरात धडकला. अपघातात ट्रकची कॅबीन चक्काचूर झाली आहे. कॅबीनमध्ये दोन जण अडकुन पडले होते. घटनेची माहिती विसरवाडी पोलिसांना मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, हे.कॉ.प्रशांत पाटील, राजु कोकणी दाखल झाले. यावेळी पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना…

Read More

कार आणि ट्रेलरच्या अपघातात दोघे जखमी वरणगाव-भुसावळ तालुक्यातील वरणगाव-बोहर्डी गावादरम्यानच्या पेट्रोल पंपाजवळ कार आणि ट्रेलच्या धडकेत दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, राजेंद्र नथमल कोचर वय ६९ रा. भगवान महावीर मार्ग, मलकापूर जि.बुलढाणा हे वृध्द आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शाम पुंडलीक खैरे यांच्यासोबत कार क्र.(एम.एच.२८आर. ३६३७) ने मालेगाव येथे जात असतांना वरणगाव-बोहर्डी गावाच्या दरम्यान पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिली. या धडकेत राजेंद्र नथमल कोचर आणि त्यांच्या सोबतचे सुगमचंद उत्तमचंद आगड (दोन्ही रा. मलकापूर) हे जखमी झाले. जखमींना तातडीने वरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.…

Read More

चाळीसगावात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ३२ जणांवर कारवाई, २९ हजार रोकडसह साहित्य हस्तगत चाळीसगाव – शहरात गेल्या अनेक दिवसांपासून राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. यातच शहरातील शिवाजी घाट परिसर तसेच स्टेशन रोड परिसरात लपून-छपून अवैधरित्या चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक धाड टाकली. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या ३२ जणांना अटक करण्यात आली असून २९ हजार रोकडसह जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याबाबत चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांतर्फे मिळालेली अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील शिवाजी घाट परिसर तसेच स्टेशन रोड परिसरात लपून-छपून अवैधरित्या जुगार अड्डा सुरू आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना…

Read More

तोंडापूर-भारुडखेडा रोडवर आढळला मृत बिबट्या जामनेर – प्रतिनिधी तालुक्यातील मांडवे खुर्द शिवारातील भारुडखेडा-तोंडापूर रस्त्यावर सदाभाऊ रामभाऊ मोकासरे यांच्या गट नंबर ८२ मध्ये एक मादी बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती भ्रमणध्वनीद्वारे वनक्षेत्रपाल जामनेर, वनपाल, वनरक्षक गोद्री, वनरक्षक पठाड तांडा आणि वनरक्षक पिंपळगाव यांना परिसरातील नागरिकांकडून मिळाली असता वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यांनी सखोल चौकशी केली असता वनक्षेत्रापासून ३ ते ४ किलोमीटर अंतरावर असल्याचे आढळून आले. मृत बिबट्या वनपरिक्षेत्र कार्यालय, जामनेर येथे आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी संजय खाचणे आणि इतर दोन अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले असता मृत बिबट्या साधारण ३ वर्षाचे मादी जातीचे असल्याचे त्यांनी सांगीतले. मृत बिबटच्या शरीरावर…

Read More

साईमत / जळगाव / प्रतिनिधी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील उमेदवारीवरून असणारा तिढा सुटला असून या मतदारसंघातून माजी महापौर जयश्री महाजन यांना शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरेंची मशाल घेऊन त्या विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असताना सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरु केली आहे. मात्र महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने माविआच्या जळगाव शहर व जळगाव ग्रामीण च्या उमेदवारांबाबत उत्सुकता शिगेला लागली असतांना जळगाव शहरामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी महापौर जयश्री महाजन विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान जळगाव शहर…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी चोपडा मतदारसंघाचे आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या निवासस्थानी गार्ड ड्युटीवर कर्तव्यावर असलेले साहित्यिक पोलीस विनोद अहिरे यांचा शॉल, बुके देऊन सत्कार केला. सदर प्रसंगी यावल कृषी उत्पन्न समितीचे संचालक सूर्यभान पाटील तसेच महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे सदस्य विकास पाटील यासह आदी मान्यवर उपस्थित होते जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद अहिरे यांचे नुकतेच ‘काळजातील पोलीस महासंचालक’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. सदर पुस्तकाला महाराष्ट्रभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यानच्या काळात अहिरे यांची चोपडा मतदारसंघाचे आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानी गार्ड ड्युटी लागली…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शेती हा आपला फक्त परंपरागत व्यवसाय नाही तर त्या बरोबर जोडलेल्या परंपरा आणि संस्कृती आपल्या रक्तात आहेत. त्या संस्कृतीतला बैलपोळा हा अत्यंत महत्वाचा सण आहे. त्यानिमित्ताने आज आपण जो बैलांसाठी साज देत आहोत ती एकप्रकारे बैलांप्रतीची कृतज्ञता आहे. आज यांत्रिकीकरण आलं तरी शेती मातीशी इमान असलेल्या आपल्या सारख्या बळी राजांनी आजही बैल राखून ठेवले आहेत. हीं आपल्या परंपरेची श्रीमंती आहे, ती श्रीमंती राखू या असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. आसोदा येथे तुषार महाजन यांच्या संकल्पनेतून गणपती मित्र मंडळ व विविध कार्यकारी सोसायटी मार्फत आयोजित बैलांना साज वाटप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोदा येथील…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिट व होप फाउंडेशन यांच्यातर्फे छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये नवजात बालकांच्या श्रवणशक्तीची स्क्रीनिंग तपासणी करण्यात आली. बालरोगतज्ज्ञ डॉ.अविनाश भोसले यांनी हॉस्पिटलमधील नवजात बालकांची व अतिदक्षता विभागातील बालकांची ओएई तपासणी केली. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दर दहा हजार मुलांमागे पाच नवजात शिशु जन्मतः श्रवणदोषाने ग्रस्त आहेत. जन्माच्या पहिल्या २४ ते ४८ तासात नवजात बालकाची ओएई किंवा एबीआर स्क्रीनिंग तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटचे अध्यक्ष ओमप्रकाश सिंग, सचिव संजय तापडिया, डॉ. मूर्तजा अमरेलीवाला, मेडिकल कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत मणियार, डॉ. शीतल भोसले, डॉ. गोविंद…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी अनुसूचित जाती , जमातीचे उपवर्गिकरण करणे , त्यांना क्रिमिलेयर लावणे संदर्भात सर्वोच्य न्यायालयाने दिलेला निर्णय पूर्णतः संविधान विरोधी असल्याने आम्ही प्रसंगी राज्यभर आंदोलन करू कारण सर्वोच्य न्यायालया पेक्षा संसद व संविधान श्रेष्ठ आहे असे प्रतिपादन आरक्षण बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केले . जिल्हाधिकारी कार्यालया समोर समिती तर्फे जोरदार निदर्शने करण्यात आले असता निदर्शकांना संबोधित करतांना सपकाळे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अनुसूचित जाती, जमाती या स्वतंत्र म्हणून नाही तर समूह म्हणून संविधान सभेने नमूद केले आहे. त्यामुळे त्यांचे वर्गीकरण, उपवर्गिकरण करणे, त्यांना क्रिमिलेयर लावण्याचा प्रश्नच येत नाही . न्यायालयीन निर्णयामुळे या जात समूहावर…

Read More

साईमत भुसावळ प्रतिनिधी तालुक्यातील वरणगाव आचेगाव,तळवेल व पिंपळगाव येथील यात्रेकरुंची एक खाजगी ट्रॅव्हल बस नेपाळमधील तानाहुं जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरातील मोर्सरयांनी नदीत कोसळल्याने झालेल्या दुर्दैवी अपघातात 16 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त हाती आल्याने तालुक्यासह जिल्हयावर शोककळा पसरली आहे. भुसावळ तालुक्यातील 39 यात्रेकरू पोखराहुन काठमांडूकडे निघाले होते. त्यातील जवळपास 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजते. भुसावळ तालुक्यातील तळवेल,पिंपळगाव,आचेगाव आणि परिसरातील 39 यात्रेकरुंना देवदर्शन आणि पर्यटनासाठी घेऊन जाणारी खाजगी बस नेपाळ येथील पोखरानजीकच्या नदीत कोसळली.या घटनेत 17 भाविकांवर मृत्यू ओढवला आहे. याबाबतची माहिती मिळाल्यावर याबाबत मदत कार्यावर केंद्रीय राज्यमंत्री ना.रक्षाताई खडसे व आ.एकनाथराव खडसे हे वरणगाव येथे पोहचले व मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत.…

Read More