बोदवड प्रतिनिधी दिनेश समाधान लोखंडे( वय २४) यांचे अल्पशा आजारामुळे २९-१२-२०२२ रोजी सकाळी ११वाजता सरकारी हॉस्पिटल कोल्हापूर येथे दुखद निधन झाले. ते श्री समाधान निंनू लोखंडे यांचे मोठे पुत्र होते. त्याच्या पश्चात .आई-वडील व एक भाऊ एक बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा दिनांक ३० – १२- २०२२ रोजी सकाळी ९ वाजता येवती ता बोदवड येथून राहत्या घरापासून निघेल.
Author: Saimat
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल पोलिस खासगी पटंरच्या माध्यमातून गाड्यांना अडवून कागद पत्रांची चौकशी करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आणणार व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. खासगी पंटरसह होमगार्ड कडून तपासणीच्या नावाने पैसे घेतले जात असल्याचे परिसरातील नागरिकांकडून आरोप होत आहे. या व्यक्तींना गाडी अडवून कागद पत्रांच्या तपासणीचा अधिकार दिला कुणी असे सदरील व्हिडिओती व्यक्ती पोलिसांला विचारणा करत असल्याचे त्यात दिसत असून यावल चोपडा रोडवरील हा प्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे. डीवायएसपी कुणाल सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र, या व्हिडिओने यावल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह…
साईमत लाईव्ह कजगाव प्रतीनिधी कजगाव ता भडगाव येथील नवीनच तयार करण्यात आलेला पारोळा कजगाव रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुलावर पडलेल्या मोठमोठ्या खड्यांमुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. श्री चक्रधर स्वामी कजगाव गोंडगाव रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पूल नव्यानेच बनवण्यात आला आहे. मात्र ह्या पुलाच्या लोकार्पणाला चार महिने उलटत नाहीत तोच खराब झालेल्या कामामुळे पुलाचे मात्र बारा वाजल्याचे दिसून येत आहे. पुलाच्या अगदी मधोमध भागावर मोठमोठी खड्डे पडली आहेत, व अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्यातील दगडे(खडी) मोठ्या प्रमाणावर दिसून येतात तर अनेक ठिकाणी मोकळे पडलेले खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत, यापूर्वी ह्या पुलाला अनेक ठिकाणी मोठमोठी खड्डे पडली होती मात्र त्यावर तात्पुरती…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी तालुक्यात यावल वन विभागात पूर्व आणि पश्चिम भागात वन कर्मचाऱ्यांच्या अपूर्ण संख्येमुळे वनक्षेत्रपालासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत ठराविक लोकप्रतिनिधीचे काही समर्थक आडजात व सागवानी लाकडाची तसेच वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात लूट करीत मोठी तस्करी करीत आहेत. यावल पूर्व व पश्चिम वनक्षेत्रपाल यांचे कार्यालय व निवासस्थानापासून पासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर यावल शहर परिसरात व संपूर्ण वन क्षेत्रात अनधिकृतपणे बिना परवानाधारक आड़जात व सागवानी लाकडाचा गोरख धंदा रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात सर्रासपणे करीत आहे. शनिवार दि.24 डिसेंबर 2022 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वनक्षेत्रपाल यांच्या कार्यालयापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर महेलखेड़ी गावच्या स्मशानभूमी जवळ आडजात लाकडाचा साठा…
साईमत लाईव्ह पारोळा प्रतिनिधी कॅप्सूल टँकर व कार यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. कॅप्सूल टँकर व कारचा अपघाताची घटना पारोळ्यानजीक विचखेडा गावाजवळ सोमवारी सकाळी ७ वाजता घडली. मृतांमध्ये पारोळा नगरपालिकेचे अभियंता कुणाल सौपुरे (३५, रा. गोंधळ वाडा, पारोळा ) आणि डॉ. निलेश मंगळे (३५ रा. डी. डी. नगर, पारोळा) यांचा समावेश आहे. या अपघातात संदीप पवार ३७, रा.आर. एल. नगर, पारोळा) हे जखमी झाले आहेत. शनिवार, रविवार सुट्टी असल्याने तिघे मित्र मुंबई येथे गेले होते. परतीचा प्रवास करत असताना पारोळ्यापासून काही अंतरावर असतानाच काळाने घाला घातला.
साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथील रहिवासी व पोलीस दलात कार्यरत असलेले सुनील दत्तात्रय सोनार यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. जळगाव पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील सोनार यांना पोलीस उपनिरीक्षक ह्या पदावर सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नतीवर नियुक्ती मिळाली आहे. सोनार यांनी यापूर्वी जळगाव. भुसावळ. मेहुनबारे. नगरदेळा. चाळीसगाव. अश्या विविध ठिकाणी सेवा दिली आहे पोलीस प्रशासनातील एक शिस्तप्रिय पोलीस कर्मचारी म्हणून त्यांची सर्वदूर ओळख आहे यापूर्वी पोलीस प्रशासनात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल त्यांचा अनेक वेळा सन्मान झाला आहे. राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या प्रयत्नाने व जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम रामकुमार यांच्या आदेशाने सदरील नियुक्ती…
साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी मेहुणबारे ता. चाळीसगाव परिसरातील एका गावातील विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पिडीत विवाहितेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २३ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शाळेच्या डयुटीवर जात असतांना निखील वसंत कोळी याने तुम्हाला गाडीवरून सोडून देतो, असे बोलून तू माझ्या सोबत लव्हशिप कर, असे बोलून विनयभंग केला. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. अनवर कलींदर हे करीत आहेत.
साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथील रहिवासी अमोल सुभाष देवरे हा एकतीस वर्षीय तरुण दिनांक १२ डिसेंबर पासून कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला आहे. त्यामुळे त्याचा आता पर्यंत सर्वत्र शोध घेतला असून तो कुठेही मिळून आला नसल्याने भडगाव पोलीस स्टेशनला त्याची बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. त्याचे वर्णन शरीराने सळपातळ. उंची पाच फूट. रंगाने सावळा.उजव्या हाताच्या पंजाजवळ A असे गोंधले आहे. केस काळे पांढरे. चेहरा लांबट. अंगात राख्या कलरचा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट.पायात काळ्या रंगाची चप्पल.असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे वर्णन आहे.बेपत्ता झालेल्या तरुणाचे भाऊ अनिल सुभाष देवरे यांनी भडगाव पोलीस स्टेशनला जाऊन हरवल्याची नोंद केली…
साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी आपल्या लेखणीच्या बळावर सतत समाजासाठी अहोरात्र झटणारे बहुतांश पत्रकार वेळेवर स्वतःसह आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे बहुतांश वेळी किरकोळ व्याधी अथवा आजारांकडे दुर्लक्ष होत जाते. त्याचे वेळेवर निदान केले जात नाहीत.त्यामुळे मोठे आजार वाढण्याची शक्यता असते.या परिस्थितीची जाणीव ठेवत पहिल्यांदाच चाळीसगाव बापजी जीवनदीप हॉस्पिटलच्यावतीने डॉ. संदीप देशमुख व त्यांचे मित्र परिवारातील तज्ञ डॉक्टरांनी पत्रकारांसाठी राबविलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा उपक्रम प्रेरणादायी असल्याच्या भावना ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर यांनी व्यक्त केल्या. डॉक्टरांनी राबवलेल्या उपक्रमाचे त्यांनी तोंड भरून कौतुकही केले. पत्रकारांनी आपले संघटन वाढवून आर्थिक सक्षमीकरणावर देखील भर द्यावा सल्ला त्यांनी यावेळी दिला.त्याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्यासह आपल्या…
साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी झारखंड राज्यातील गिरीडीह जिल्ह्यात असलेल्या ‘सम्मेदशिखर’ तसेच गुजरात राज्यातील ‘शत्रुंजय तीर्थ’ (पालिताना) अर्थात गिरनार या ठिकाणी संबंधित सरकारतर्फे पर्यटन स्थळ घोषित करण्यात आले असून झारखंड राज्यातील सम्मेदशिखर येथे वीस तीर्थकारांची मोक्षस्थळी असून समस्त जैन समाजाचे आस्थेचे केंद्र आहे. झारखंड राज्याने पर्यटन स्थळ घोषित केल्यामुळे तेथे येणाऱ्या पर्यटकांमूळे मांस, मद्याचा वापर केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येते. तरी जैन समाज अनादीकाळापासून अहिंसेचा पूजारी असून अशा पवित्र स्थळाची पावित्र्यता नष्ट होईल हे विश्वातील जैन समाजास मान्य नाही. ही बाब लक्षात घेता संबंधित राज्य सरकारने अध्यादेश त्वरित रद्द करावा या मागणीसाठी आज चाळीसगाव जैन समाजाच्या वतीने शहरातील अरिहंत मंगल कार्यालय…