Author: Saimat

साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सोयगाव येथे कै.बाबुरावजी काळे स्कूल मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी श्री रंगनाथ आढाव ,केंद्र प्रमुख फिरोज तडवी, संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डॉ. शिरिष पवार, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे ,कठोरे सर ,बावचे सर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात तालुक्यातील एकुण 24 शाळांनी सहभाग नोंदवला होता या प्रदर्शनात माध्यमिक गटातुन कै.बाबुरावजी काळे स्कूल च्या निकिता पाटील, प्राची पाटील, धनश्री वाघ या विद्यार्थींनींनी प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थांनींचे संस्थेचे अध्यक्षा ज्योती ताई रंगनाथ काळे, सचिव देवीना रंगनाथ काळे, ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेश यादव शाळेचे…

Read More

साईमत लाईव्ह चोपडा प्रतिनिधी मोबाईलमधील गाण्यांचा आवाज हळू कर तसेच व्यवस्थीत टिकीट घे बोलल्याचा राग आल्याने एका तरुणाने महिला महिला बस कंडक्टरसह भांडण सोडविण्यास आलेल्या बस चालकाला देखील मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी रतीक जुलाल बागुल (वय २३, रा. पिंप्री ता. चोपडा) या तरुणाला अडावद पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात ४५ वर्षीय महिला कंडक्टरने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ४ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कमळगाव बस स्थानकावर बसमध्ये बसल्यावर रतीक बागुल हा तरुण महिला कंडक्टरकडे बघून मोबाईलमध्ये जोर-जोराने गाणी वाजवत होता. महिला कंडक्टरने आवाज कमी कर, असे रतिकला सांगितले. तरी…

Read More

साईमत लाईव्ह भडगाव प्रतिनिधी भडगाव  तालुक्यातील कजगाव येथील अवैध धंद्याच्या बाबतीत तक्रारी अर्ज दिल्यामुळे चौघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक असे की, एका २६ वर्षीय तरुणाने कजगावातील अवैध धंद्यांबाबत तक्रारी अर्ज दिला होता. यामुळे पीनू महाजन, राजू चव्हाण, विजू चव्हाण, धर्मा माळी (पूर्ण नाव माहित नाही, सर्व. कजगाव ता. भडगाव) या सर्वांनी मिळून दि. ४ जानेवारी रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास कजगाव बस स्थानकाजवळील धनश्री कॉम्प्लेक्स मधील एका झेरॉक्स दुकानाजवळ पिडीत तरुणाला अवैध धंद्या बाबत तक्रारी अर्ज दिल्याचा…

Read More

Central Railway Recruitment 2023 : तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच आहे. मग भारतीय रेल्वेत नोकरीची करण्याचं स्वप्न असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय रेल्वेने देशभरात 10वी पास उमेदवारांसाठी जवळपास 2422 जागांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. भारतीय रेल्वे (Indian Railway) ने मध्य रेल्वेच्या अंतर्गत अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आपला अर्ज दाखल करु शकतात. भारतीय रेल्वेच्या rrccr.com या अधिकृत वेबसाईटवरुन इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज दाखल करु शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2023 आहे. तसेच https://rrccr.com/Home/Home या लिंकवर क्लिक करुन तुम्ही…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी राज्यात अमृत महाआवास अभियानाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील सर्व लाभार्थींना घरे मिळणार आहेत. या अभियानात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून गतिमानतेने व गुणवत्तापूर्ण, दर्जेदार घरांची निर्मिती होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य शासनाच्या योजनांतून 13.14 लाख घरकुले पूर्ण करण्यात आली असून 5.61 लाख घरे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये राज्याला आतापर्यंत 14.26 लाख उद्दिष्ट प्राप्त झाले असून त्यापैकी 13.60 लाख (95%) मंजुरी दिली आहे. उर्वरित लाभार्थींच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मंजूर घरकुलांपैकी 9.48 लाख घरकुले विविध योजनांच्या कृतीसंगमातून…

Read More

साईमत लाईव्ह प्रतिनिधी भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या कारला झालेल्या अपघाताच्या चर्चा अजूनही सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या अपघातामध्ये धनंजय मुंडेंना किरकोळ दुखापत झाली असल्याचंही समोर आलं आहे. मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास परळीमध्ये अपघात झाल्याची माहिती धनंजय मुंडेंच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली असून स्वत: धनंजय मुंडेंनी हे ट्वीट रीट्वीट केलं आहे. धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मतदारसंघातील कार्यक्रम आटोपून रात्री परळीकडे परत येताना हा अपघात झाला. चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यामुळे छोटासा अपघात झाला असून धनंजय मुंडेंना किरकोळ दुखापत झाली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये धनंजय मुंडे…

Read More

साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा पदभार नवनिर्वाचीत लोकनियुक्त सरपंच रघुनाथ विठ्ठल महाजन यांनी घेतला तसेच उपसरपंचपदी स्विटी दिनेश धाडीवाल यांची निवड करण्यात आली. सदरील निवड प्रक्रिया सरपंच रघुनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सदरील निवड प्रक्रियेत समाधान पवार व स्विटी धाडीवाल यांचे दोन अर्ज दाखल झाले होते, त्यात समाधान पवार यांनी माघार घेतल्याने स्विटी धाडीवाल यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित ग्रापंचायत सदस्य शफी मणियार,समाधान पवार, सत्यभामा चौधरी, मांगीलाल मोरे, सादिक मणियार,अक्षय मालचे, कविता महाजन, वैशाली मिस्तरी, शोभा बोरसे, अंजनाबाई सोनवणे, पुंडलिक सोनवणे, पल्लवी पाटील, विजय गायकवाड, सीताबाई सोनवणे, भिकुबाई पाटील,…

Read More

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी हद्दपार आरोपीला ताब्यात घेण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालत धक्काबुक्की केल्याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय भानुदास पाटील (वय २५,रा.लक्ष्मी नगर, चाळीसगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. या संदर्भात अधिक असे की, अक्षय पाटील हा उपविभागीय दंडाधीकारी यांच्या आदेशाचा भंग करुन कोणतीही पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीररित्या चाळीसगावात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पो.कॉ दीपक चौधरी हे चाळीसगाव बसस्टॅण्डच्या मागील बाजूस एका टपरीजवळ गेले असता तेथे अक्षय पाटील हा आढळून आला. पो.कॉ चौधरी हे अक्षयला ताब्यात घेण्यास गेले असता त्याने हुज्जत घालून, तुमच्याकडून माझे जे होईल ते करुन घ्या. मी पोलीस…

Read More

साईमत लाईव्ह पाळधी प्रतिनिधी क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विनम्र अभिवादन केलं. क्रांतिज्योति सावित्रीबाई सत्यशोधक विचारांच्या क्रांतिकारी समाजसुधारक होत्या. स्त्री शिक्षणासाठीचं त्याचं योगदान चिरंतन आहे. प्रत्येकाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार आत्मसात केले पाहिजे असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी बु. येथिल ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, डॉ. कमलाकर पाटील, सचिन पाटील, सरपंच प्रकाशनाना पाटील , ग्रामविकास अधिकारी दिपक पाठक, उपसरपंच चंदन कळमकर, ग्रा. पं. सदस्य प्रकाश ठाकूर, तुषार मोरे, यशवंत पाटील, गोकुळनाना पाटील, बबलू पाटील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन…

Read More

साईमत लाईव्ह ठाणे प्रतिनिधी  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. “देशातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचा वारसा जपून आजच्या महिलांनी विविध क्षेत्रात आणखी भरारी घ्यावी, हेच सावित्रीबाई फुले यांना खरे अभिवादन असेल”, अशा शब्दात मुख्यमंत्री महोदयांनी अभिवादन केले. यावेळी तहसीलदार राजाराम तवटे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Read More