साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव येथे कै.बाबुरावजी काळे स्कूल मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी श्री रंगनाथ आढाव ,केंद्र प्रमुख फिरोज तडवी, संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डॉ. शिरिष पवार, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे ,कठोरे सर ,बावचे सर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रदर्शनात तालुक्यातील एकुण 24 शाळांनी सहभाग नोंदवला होता या प्रदर्शनात माध्यमिक गटातुन कै.बाबुरावजी काळे स्कूल च्या निकिता पाटील, प्राची पाटील, धनश्री वाघ या विद्यार्थींनींनी प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थांनींचे संस्थेचे अध्यक्षा ज्योती ताई रंगनाथ काळे, सचिव देवीना रंगनाथ काळे, ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेश यादव शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलीस विषय शिक्षक योगेश काळे, ज्योती जोशी, प्रणव कुलकर्णी, व्यवस्थापक एकनाथ कोलते तसेच शाळेचे शिक्षकांनी या विद्यार्थांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.