कजगाव येथे उपसरपंचपदी स्वीटी दिनेश धाडीवाल यांची बिनविरोध निवड

0
2

साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी

कजगाव ता भडगाव येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा पदभार नवनिर्वाचीत लोकनियुक्त सरपंच रघुनाथ विठ्ठल महाजन यांनी घेतला तसेच उपसरपंचपदी स्विटी दिनेश धाडीवाल यांची निवड करण्यात आली. सदरील निवड प्रक्रिया सरपंच रघुनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सदरील निवड प्रक्रियेत समाधान पवार व स्विटी धाडीवाल यांचे दोन अर्ज दाखल झाले होते, त्यात समाधान पवार यांनी माघार घेतल्याने स्विटी धाडीवाल यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित ग्रापंचायत सदस्य शफी मणियार,समाधान पवार, सत्यभामा चौधरी, मांगीलाल मोरे, सादिक मणियार,अक्षय मालचे, कविता महाजन, वैशाली मिस्तरी, शोभा बोरसे, अंजनाबाई सोनवणे, पुंडलिक सोनवणे, पल्लवी पाटील, विजय गायकवाड, सीताबाई सोनवणे, भिकुबाई पाटील, मंदाकिनी पाटील असे सर्व ग्राप सदस्य उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती एकनाथ महाजन, माजी सरपंच.निवृत्ती पवार, मनोज धाडीवाल माजी उपसरपंच भानुदास महाजन, गणी मणियार,हिलाल चौधरी, अनिल महाजन, विक्रम महाजन, शिवाजी बोरसे, पंढरीनाथ बोरसे, साहेबराव महाजन, अनिल टेलर, राजेंद्र चव्हाण, नाना मोरे, असिफ मणियार, दिनेश धाडीवाल, धर्मराज हिरे दिनेश टेलर, रामदास महाजन, सुरेश पहिलवान, गरबळ बोरसे भगवान सोनवणे, राजेंद्र मालचे, पोपट महाजन, रफिक बागवान, विनोद खैरनार व मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून पि.के.तायडे व चेतन बैरागी यांनी कामकाज पाहिले तर त्यांना ग्रामविकास अधिकारी, नारायण महाजन, पो. पा.राहुल पाटील, कोतवाल नितीन मोरे, ग्रा. प. कर्मचारी सुनील पवार,  संजय जाधव, रवींद्र मालचे, संजय पाटील, जाकीर मणियार, मनोज सोनवणे, रघुनाथ देसले,  देविदास पाटील, यांनी सहकार्य केले तर भडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे गणेश कुमावत यांनी बंदोबस्त ठेवला यावेळी ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here