Author: Saimat

साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी भगवंत पांडुरंगाच्या दरबारी भेट घेऊन आलेल्या संत मुक्ताई पालखी सोहळ्याच्या साक्षीदार असलेल्या आषाढी वारीतील वारकरी आणि मुक्ताई ची पालखी चे आज शहरात जल्लोशात स्वागत करण्यात आले.तब्बल ९५ दिंड्यांनी मुक्ताईनगर मध्ये आगमन केले होते पंचक्रोशीतील नागरिकांनी मनोभावे सेवा करून आई मुक्ताईच्या गजरामध्ये तल्लीन होऊन हजेरी लावत संत श्रद्धेचा मन मुराद आनंद घेतला. सकाळी १० वाजता पासून पालखी सोहळ्याचे प्रस्थान नवे मुक्ताई मंदिरावरून मूळ स्थानी श्रीक्षेत्र कोथळी कडे झाले प्रसंगी पालखी पूजन करण्यात आले प्रसंगी संस्थान चे अध्यक्ष ऍड रवींद्र पाटील (Ravindra Patil) , विश्वस्त पंजाबराव पाटील संदीप पाटील,ऍड रोहिणी खडसे (Adv.Rohini Khadse), निवृत्ती पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभारी…

Read More

साईमत ओझर प्रतिनिधी मुंबई आग्रा हायवेवर मालेगाव येथुन मुंबईला घेवुन जाणा-या छोटा हाथी गाडीत असलेले गोवंश जनावरांचे मांस पकडले. ४,६१,०००/-रु. चा मुद्देमाल जप्त. मा. श्री शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी नाशिक ग्रामीण जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याचे आदेश पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व विशेष पथकास दिलेले आहे. सदर आदेशानुसार ओझर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दुर्गेश एम तिवारी यांनी गुप्तबातमीदारामार्फत दिनांक २१.७.२०२३ रोजी २३.०० वाजता बातमी मिळाली की, मालेगाव येथून मुंबईकडे ईसम नामे सैय्यद मसुद रा. गांधीनगर मालेगाव हा त्याचे ताब्यातील TATA ACE छोटा हाथी गाडी क्र.एम एच ४६ वी एफ २९३२ हीचे मध्ये गोवंश जनावरांचे मांस घेवुन…

Read More

साईमत चोपडा प्रतिनिधी समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या आणि स्वकल्याणाबरोबर परकल्याणासाठी तदवत सर्वप्राणीमात्रांचे कल्याण व्हावे अशी भावना मुनिश्रींची सदैव असते असे अहिंसा पालन करणारे जैन मुनिश्रींची समाजकंटकांनी आचार्य प.पू श्री 108 कामकुमार नंदिजी महाराज कर्नाटक राज्यात बेळगांव जिल्ह्यात चिकोडी तालुक्यात नंदी पर्वत स्थित जैन तीर्थावरती स्थित असलेले आचार्य पूज्य श्री कामकुमार नंदीजी महाराज यांची निर्घुन हत्या करण्यात आली . हत्याऱ्यांनी मृत शरीराचे तुकडे तुकडे करून बोरवेल मध्ये फेकून क्रूरतेची सर्व सीमा ओलांडलेल्या होत्या. स्वतंत्र भारतात ह्या हत्या कांडने देशाच्या गौरवशाली इतिहासावर लांझन लागले. या घटनेमुळे भारतातील नाही तर जगातील संपूर्ण जैग समाजात असंतोष पसरला आहे. चोपडा सकल जैन समाजातर्फे दि. २०…

Read More

साईमत जामनेर प्रतिनिधी तालुक्यातील टाकळी व पळासखेडा बू. येथे डाॅ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा द्वारे तालुक्यातील श्री सदस्यांनी वृक्षारोपण करण्याचे आयोजन केले होते. या प्रसंगी आमदार तथा मंत्री मा.ना.गिरीष महाजन (Girish Mahajan) सोबत जे के चव्हाण,चंद्रकांत बाविस्कर,जितेंद्र प्रल्हाद माळी सरपंच टाकळी,विजय रतिलाल चौधरी उपसरपंच व सर्व ग्रा.सदस्य टाकळी हजर राहून प्रतिष्ठान चे श्री बैठक टाकळी येथील श्रीसदस्य 245 यांनी निंबाची रोप 100, करंज रोप 25 व शिसम रोप 25, पिंपळ 25 तसेच प्रकाशचंद जैन मेडीकल काॅलेज येथे श्री बैठक मधुबन कॉलनी जामनेर येथील 30 श्रीसदस्यानी कडुनिंब रोप 70, करंज रोप 15, सिसम रोप 15 वृक्षारोपण प्रसंगी भिका राजाराम तायडे (सरपंच) ग्रा.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अपर मुख्य सचिव (महसुल) नितीन गद्रे यांनी दिले आहेत. जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या नियुक्तीबाबत कोणतेही आदेश नाहीत. तथापि, आयुष प्रसाद यांच्या जागेवर पुण्याचे आर.एस. चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची देखील बदली झाली आहे त्यांना आता यवतमाळ येथील जिल्हाधिकारीपदाची धुरा मिळाली आहे. यामुळे ते देखील जळगावातून जात आहे. तर त्यांच्या जागा गडचिरोली येथील श्री अंकित या आयएएस अधिकाऱ्यांची…

Read More

साईमत अमळनेर प्रतिनिधी अमळनेर (Amalner) लायन्स क्लब ने २०२२-२३ या वर्षभरात सामाजिक,शैक्षणिक तसेच आरोग्यविषयक केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल क्लब ला विविध पुरस्कारांनी मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.यावेळी माजी अध्यक्ष तथा विद्यमान झोन चेअरमन योगेश मुंदडा यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. मुंबई (Mumbai) येथील सहारा स्टार हॉटेल येथे लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४H२ यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात माजी प्रांतपाल एमजेएफ पुरुषोत्तम जयपुरीया,माजी आंतरराष्ट्रीय संचालक डॉ.नवलजी मारू,ग्याट एरिया लीडर विनोद वर्मा,प्रसिद्ध गजलकार अशोकजी कोसला यांच्या हस्ते अमळनेर लायन्स क्लब ला एकूण ६ पुरस्कारांनी गौरविण्यात आले.यात २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या भव्य एक्स्पो साठी डिस्ट्रिक्ट इमेज बिल्डिंग अवॉर्ड,आजादी का अमृत महोत्सव उपक्रमातअंतर्गत शहरातून १ कि.मी. लांब काढण्यात आलेल्या…

Read More

साईमत प्रतिनिधी अखेर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांना सुप्रीम दिलासा मिळाला आहे. पुणे येथील भोसरी जमीन घोट्याळ्या प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले मा. मंत्री आणि राष्टवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आ .एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सुप्रीम कोर्टाकडून जमीन मंजूर झाला आहे. गेल्या दीड वर्षांपासून ते ईडीच्या ताब्यात होते. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीच्या कारवाईनंतर ते ७ जुलै २०२१ ला त्यांना जेल झाली होती. भाजप-शिवसेना सरकारमध्ये असताना मा . मंत्री एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसीत प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप होता. या आधी मंदाकिनी…

Read More

साईमत मलकापूर प्रतिनिधी  मिरज तालुक्यातील बेडग गावातील ग्रा.पं.ने बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar)नावाची कमाल प्रवेशद्वार उभारले व नंतर स्वतः बांधलेली कमान बेकायदेशिर ठरवुन तोडुन टाकण्यात आली ही घटना निंदनीय असुन सदर घटनेचा आम्ही निषेध करतो. अश्या पध्दतीने बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करून व आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावणारे लोकांवर कठोर कायदेशिर कारवाई करण्यात यावी व सन्मानपूर्वक पूर्ववत उभारण्यात यावी. अलीकडे दोन दिवसा मध्ये झालेल्या अतिवृष्टीने नागरीकांचे घराचे नुकसान होवुन अनेकांच्या घरांची पडझड,शेतीचे नुकसान व पिकांची हानी झालेली आहे, तसेच व्यापारांच्या दुकानांमध्ये, व्यापारी संकुलना मध्ये बेसमेंट मध्ये पाणी शिरून प्रचंड नुकसान झालेले असून सदर नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून त्यांना अर्थसहाय करावे. भूमिहीन…

Read More

साईमत शेंदुर्णी प्रतिनिधी जामनेर (Jamner) तालुक्यातील शेंदुर्णी येथे संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडली. सकाळी माळी समाज मंगल कार्यालय येथे गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी व समाज बांधव यांच्या हस्ते संत सावता महाराज यांच्या मुर्तीला अभिषेक प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच पुण्यतिथी निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. व गावातील समाज बांधव व महिला मंडळाची उपस्थिती लक्षनीय होती. तसेच श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी निमित्त माळी समाज मंगल कार्यालयात ह.भ.प.अमृत महाराज गाढे बेटावदकर यांचे सुश्राव्य किर्तन झाले. त्यांना साथसंगत वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळी यांनी केली. यावेळी शेंदुर्णीच्या नगराध्यक्षा सौ.विजयाताई खलसे, गोविंद अग्रवाल,…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत आज दरळ कोसळून त्यात 200 ते 250 लोक दाबले गेले. त्यात 17 ते 18 लोकांचा मृत्यू झाला. सरकारने यापूर्वीच या लोकांचे पुनर्वसन करणे गरजेचे होते. यापूर्वी घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होते. याचा अर्थ सरकांर फोडाफोडीत व्यस्त होते. अन्यथा अशा घटना टाळता आली असती, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे गुरुवारी शहरात विद्यार्थी सेनेच्या बैठकीसाठी आले होते.यावेळी हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये पत्रकारांनी त्यांना रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी हे सरकारचे अपयश असल्याचे सांगितले. पावसाळ्यापूर्वी त्यांना इतरत्र हलवता आले…

Read More