साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव तालुक्यासह जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसाय फोफावला असून मोठा आर्थिक फायदा होत असल्याने अनेक जण या धंद्यात उतरून स्वतःला वाळू माफिया म्हणवून घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे या व्यवसायात अनेक जण गुंतले असून यात पोलिसही मागे नसल्याने एक पोलीस कर्मचारी स्वतः वाळूचा व्यवसाय चालवीत असल्याचा प्रकार पुढे आल्याने त्याच्यावर चौकशी सुरु असेपर्यंत निलंबनाची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी केली असून अशी माहिती पत्रकारांशी संवाद साधतांना दिली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अवैध वाळूप्रश्नी लक्ष घातले आहे. त्यामुळे अवैध वाळू कारवाईंना वेग येत आहे. तालुक्यातील दापोरा येथे पोलीस कर्मचारी स्वतःच वाळू ठेका चालवित असल्याची…
Author: Saimat
साईमत फैजपूर प्रतिनिधी धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचे जागी प्रभारी प्राचार्य पदाची धुरा वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल भंगाळे यांच्या कडे सोपविण्यात आली आहे. डॉक्टर अनिल भंगाळे यांनी नुकताच पदभार स्विकारला. या निमित्ताने महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले.
साईमत फैजपूर ता यावल प्रतिनिधी मानवी जीवन अनपेक्षित चढउतार, सुखदुःख आणि अनगिणत आव्हानांनी ओतपोत भरलेले असतानाच भविष्यातील संकटांना धैर्याने सामना करण्यासाठी व्यक्तिमत्व विकासाचे धडे घेतले पाहिजेत व त्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रशिक्षण हे सर्वोत्तम माध्यम असल्याचे प्रतिपादन कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले. ते 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आयोजित वार्षिक प्रशिक्षण शिबिरात बोलत होते. दिनांक 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2023 दरम्यान विद्यापीठाच्या हिरवागार डोंगरराशीत एनसीसी चा कॅम्प सुरू आहे. या कॅम्पमध्ये सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवण्याच्या दृष्टिकोनातून कर्नल पवनकुमार, प्रशासकीय अधिकारी, 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव व त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने…
साईमत भुसावळ प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन सचिव आणि लिपिक यांनी बनावट कागदपत्रे तयार करून कर्जदार सभासदांकडून परस्पर कर्जाची रक्कम वसूल करून संस्थेत जमा न करता तब्बल ३५ लाख २१ हजार ८५९ रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आला आहे. या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील वराडसीम येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन सचिव भास्कर सिताराम पाटील राहणार जामनेर रोड भुसावळ आणि लिपिक तेजश्वर रामदास डाके राहणार वराड सिम भुसावळ यांनी २१ एप्रिल २०११ ते २० मे २०१९ दरम्यान संस्थेत कार्यरत असताना पदाचा दुरुपयोग करून…
साईमत बोदवड प्रतिनिधी रेल्वे बोर्ड एकीकडे आधुनिकतेची कास धरत असून दुसरीकडे ग्रामीण भागातील नागरिकांवर अन्याय करत आहे, एकी कडे भुसावळ विभाग विभागाच्या पंधरा रेल्वे स्थानक चा कायापालट करत आहे, त्यात बोदवड रेल्वे स्थानक ला वगळले असून त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे, बोदवड तालुक्यावर रेल्वे बोर्ड सतत अन्याय करत असून आधी ब्रिटिशकालीन व राष्ट्रपती च्या हस्ते सुरू झालेल्या गाड्यांचा थांबा कोरोना काळ पासून बंद करून तर आता स्थानकाच्या मॉडेल मधून नाव वगळून अन्याय केला जात आहे. याबाबत राष्ट्रीय दिव्यांग पार्टी ने नऊ ऑगस्ट क्रांती दिनी तालुक्यातील दिव्यांग बांधव बोदवड रेल्वे स्थानक वर पूर्वी ब्रिटिशकसलीन सुरू असलेली १) दादर सेवाग्राम, सेवाग्राम दादर,माजी…
साईमत भुसावळ प्रतिनिधी भुसावळ येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर वांजोळा रोड रस्त्यालगत राजस्थान मार्बल जवळ सापाळा रचत चोरटी वाळू वातुक करणारे डंपर ताब्यात घेत कारवाई केली आहे. सदरची कारवाई शुक्रवारी दि. ४ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास तहसिलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. याबाबत माहिती अशी की, तहसिलदार निता लबडे यांना जोगलखेडा परिसरात वाघुर नदीपात्रातून डंपरमध्ये वाळुची चोरटी वाहतुक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहिती वरून तहसिलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनात पहाटे ५ वाजेच्या सुमारास कुऱ्हे प्र.न.मंडळातील तलाठी, कोतवाल यांनी सापाळा रचला होता. राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर राजस्थान मार्बल जवळ डंपर (क्रमांक एमएच-18-सीएम-1584 ) थांबवुन तपासणी…
साईमत भुसावळ प्रतिनिधी शहरातील संतोष माता हॉल जवळील शिवमुद्रा प्रतिष्ठान गणेश मंडळाचे भूमी पूजन उत्साहात संतांच्या हस्ते झाले. यावेळी शिवमुद्रा ढोलपथक व जय मातृभूमी क्रीडा मंडळ च्या स्मारकाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर प. पू. शास्त्री श्रीधर्मस्वरूपदासजी, महामंडलेशवर जनार्धन महाराज, शास्त्री भक्तीकिशोरदास, हभप धनराज महाराज , हभप दुर्गादास महाराज , महंत पवन कुमार दास , महंत भक्तीप्रकाश शास्त्री आदी उपस्थित होते. यावेळी महामंडलेशवर जनार्धन स्वामी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, आजच्या वातावरण मध्ये संतांचे चरणस्पर्श करणं चांगले लक्षण आहे. या देशाचा स्वाभिमान ,आत्मा असलेल्या प्रभू श्रीराम च्या मंदिराची प्रतिकृती तयार करणे ,स्वतः च ढोलपथक तयार करणं…
साईमत मलकापूर प्रतिनिधी अमृत भारत योजनेच्या अंतर्गत मलकापूर रेल्वे स्थानकाचा विकास होणार असल्याची माहिती खा. रक्षाताई खडसे यांनी दिली आहे. येत्या ६ ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे देशभरातील ५०६ रेल्वे स्टेशनसह या स्टेशनचे भूमिपूजन करणार आहेत. अमृत भारत योजनेंतर्गत रावेर लोकसभा क्षेत्रातील मलकापूर रेल्वे स्टेशनची निवड झालेली असून, स्टेशनवर विविध विकास कामे करणेसाठी रू.१८.५१ कोटी मंजूर झालेले असुन, ६ ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे देशभरातील ५०६ रेल्वे स्टेशनसह या स्टेशनचे भूमिपूजन करणार आहेत. यात मलकापूर स्टेशन वर खासदार रक्षाताई खडसे व माजी आमदार चैनसुख संचेती हे प्रमुख पाहुणे…
मणिपूरमधील हिंसाचार व त्यातही तेथे दोन महिलांवर झालेल्या अत्याचाराची केंद्रीय गुप्तचर विभागातर्फे (सीबीआय) चौकशी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे तसेच या संदर्भातील खटले मणिपूरबाहेर हलवण्यासाठी केंंद्राने सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मागितली आहे. या दोन्ही बाबी स्वागतार्ह आहे.मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंंसाचाराने सर्व देश चिंतेत आहे.तेथे दोन महिलांवर ज्या पद्धतीने अत्याचार झाले, त्यामुळे देशात संंतापाची लाट उसळली. तीन मे रोजी तेथे मोठ्या प्रमाणावार हिंसक घटना घडू लागल्या. महिलांची विवस्त्र धिंड काढणे व त्यांच्यावर अत्याचार होणे ही घटना चार मे रोजी घडली,असे स्थानिक पोलिसांनी सांगितले मात्र गुन्हा दाखल झाला 18 मे रोजी. त्या दुर्दैवी घटनेची चित्रफीत समोर आल्यानंतर, सुमारे अडीच महिन्यांनी पहिली अटक…
साईमत सोयगाव प्रतिनिधी पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी ट्विट द्वारे दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदत देण्यात आली होती. आजपर्यंत सोयगाव तालुक्यातील 23 हजार शेतकऱ्यांनी आपल्या 34 हजार हेक्टरवरील विविध पिकांसाठीचा एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपला विमा अर्ज भरलेला नाही, काही ठिकाणी…