साईमत यावल प्रतिनिधी शहरालगतच्या विरावली शिवारातील विहीरीत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला असून याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. याबाबत माहिती अशी की, शहरा पासुन सुमारे दोन किलोमिटर अंतरावर चोपडा मार्गा वरील दरबारसिंग शांताराम पाटील यांच्या विरावली शिवारातील शेत गट क्रमांक१७५ च्या शेतातील सुमारे १३० फुट खोल असलेल्या विहीरीतीत पडून पाण्यात बुडून ३०ते ३५ वर्ष वयाचा अज्ञात तरूण मरण पावल्याची घटनासमोर आली आहे. दि ५ ऑगस्ट रोजी शेतात कामास गेलेल्या महीलांना विहीरीतुन दुर्गंधीचा वास आल्याने त्यांनी शेतमालकास सदरची माहिती दिल्याने शेतमालक दरबारसिंग यांनी सदरची माहीती दिली. त्यांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. या अनुषंगाने मृतदेह विहिरीतून काढण्यात आला आहे.
Author: Saimat
साईमत यावल प्रतिनिधी यावल नगरपरिषदे पासून काही अंतरावर आणि यावल तहसील पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या हडकाई खडकाई नदी पात्रात मृत जनावरे आणून टाकली जात असल्याने याकडे यावल नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे, पर्यायी यावल शहरात साथीचे रोग फैलावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यावल नगरपरिषद कार्यालयाला लागून असलेल्या नदीपात्रात आणि यावल तहसील कार्यालयापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीपात्रात यावल शहरात मृत झालेल्या गाई- म्हशी, कुत्रे,डुकरे, इत्यादी प्राणी नदीत आणून टाकले जात आहेत, पावसाळ्याचे दिवस असल्याने या मृत प्राण्याचे अवशेष नदीतून उत्तरेकडे म्हणजे यावल शहराकडे नगरपालिका कार्यालयाकडे वाहत येऊन साथीचे मोठे रोग फैलावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मृत जनावरे फेकून…
साईमत भुसावळ प्रतिनिधी शहरातील घरगुती वापराच्या गॅसची विक्री कशी होत आहे. गॅस धारकांना गॅस एजंसिज कश्या सुवीधा पुरवीतात, ग्राहकांच्या काही तक्रारी आहेत का ? आदी बाबी जाणून घेण्यासाठी भारत पेट्रोलीयमच्या अधिकाऱ्यांनी शहरातील गॅस एजंसिजला सदीच्छा भेट देत माहिती जाणून घेतली. यावेळी भारत पेट्रोलियम चे मुख्यअधिकारी व्ही.नागराजन स्टेट हेड (महाराष्ट्र आणि गोवा राज्य) अधिकारी तसेच जळगाव एलपीजी टेरीटोरीचे मॅनेजर कमलेश कुमार , विक्री अधिकारी पवन भारती, अकोला येथील विक्री अधिकारी गौतम झा यांनी भुसावळातील धनश्री गॅस एजन्सीला नुकतीच भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी धनश्री गॅस एजन्सीचे संचालक रविंद्र शिंदे यांच्याशी चर्चा केली. व धनश्री गॅस एजंसीच्या भारत गॅस च्या सुरक्षा…
साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या अटकेतील संशयित आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी मुक्ताईनगर येथे मनसेतर्फे पोलीस स्टेशन मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई, शहराध्यक्ष मंगेश कोळी, उचंदे गण अध्यक्ष गजानन पाटील, प्रहारचे दिव्यांग क्रांती सेनेचे तालुकाध्यक्ष उत्तम जुबळे, दीपक पाटील, कल्पेश पाटील, रोशन पाटील आदींसह मनसे पदाधिकारी उपस्थिती होते. सदर निवेदन मुक्ताईनगर पोलीस स्थानकात देऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी मुक्ताईनगर बस स्टँड येथे तालुक्यातील प्रवाशांची मोठी वर्दळ असते परंतु काही टवाळखोर व रोड रोमिओ मुलांमुळे त्या ठिकाणी वाद होत असून मोठा घातपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिक्षणासाठी खेड्या – पाड्यातून येणारी शाळकरी, कॉलेजच्या मुली तसेच प्रवाशी महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यामध्ये शाळा, कॉलेज, तहसील, पोलीस स्टेशन दवाखाना,हॉस्पिटल, पीडब्ल्यूडी ऑफिस, बँका, वीज वितरण असे विविध प्रकारचे मोठे मोठे ऑफिस या ठिकाणी येत असून आर्थिक देवाणघेवाण कागदोपत्री असा व्यवहार मुक्ताईनगर शहरांमध्ये होत असतो त्या अनुषंगाने मुक्ता नगर शहरांमध्ये रहदारीचे प्रमाण खूप असून खेड्यापाड्यातील लोक एसटी बसचा प्रवास करत असतात व बस स्टैंड वर येत असतात…
साईमत मलकापूर प्रतिनिधी बनावट खोटी प्रतिज्ञापत्रे तयार करुन त्याआधारे ‘एलटीसी’चा लाभ गटवर्ष २०१३-२०१६ या एकाच गटवर्षात दोन वेळा घेऊन शासनाची फसवणुक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. काही शिक्षकांनी एल.टी. सी गटवर्ष २०१३ – २०१६ या एकाच गटवर्षात दोन वेळा बनावटी व खोटी प्रतिज्ञापत्रे कागदपत्रे तयार करुन त्याआधारे शासनाची फसवणुक केली होती. तर शासनाच्या तिजोरीतून लाखो रुपयांची लुट केली होती यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जि.प. हायस्कूल धाड येथील तत्कालीन मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे चौकशी अंती समोर आले होते. मात्र, शिक्षण विभागाकडून त्याच्यांविरुध्द कारवाई होत नसल्याने आरटीआय कार्यकर्ते प्रभाकर लक्ष्मण इंगळे (रा. बेलाड…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजवादी नेते, सामाजिक कार्यकर्ते तथा ख्यातनाम सनदी लेखापाल (सीए) शेखर सोनाळकर (वय ७२ )यांचे शुक्रवार दि. ४ रोजी पहाटे सव्वा वाजेच्या सुमारास निधन झाले. सत्तरच्या दशकातील लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून जडण-घडण झालेले शेखर सोनाळकर यांनी आणीबाणीत कारावास देखील भोगला. वासंती दिघे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. यानंतर गेल्या सुमारे चार दशकांपासून जास्त काळ हे दाम्पत्य राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत होते. शेखर सोनाळकर यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून ढासळली होती. शुक्रवारी पहाटे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. जळगावातील अनेक चळवळींच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य व्यक्तीच्या हिताचे काम केले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार…
साईमत जळगाव प्रतिनिधी प्रसिद्ध निसर्गकवी, प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख असलेले जेष्ठ कवी पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित ना.धों.महानोर यांचे वयाच्या ८१व्या वर्षी दीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. युवाशक्ती फाऊंडेशनच्या वतीने पद्मश्री ना.धों.महानोर यांना काव्यरत्नावली चौक येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी पुष्पांजली वाहून व मेणबत्त्या लावून आदरांजली वाहण्यात आली. पद्मश्री महानोर यांनी लिहलेल्या गीतांनी वातावरण भारावून गेले होते. काही नागरिकांनी अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. कवी निवृत्ती कोळी, कवियत्री पुष्पलता सी.एय सी.ए. सुभाष लोढा, श्वेता मुले, राजपूत गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले. पद्मश्री ना.धों.महानोर यांच्या रूपाने एका प्रतिभाशाली आणि आपल्या शब्दांनी रसिकांना समृद्ध करणारा कवी आणि भूमिपुत्र हरपला याचे…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे यांच्यासह चाईल्ड हेल्थ नर्सिंग विभाग प्रमुख तथा सहाय्यक प्रा.अश्विनी मानकर (हरित उपक्रम समितीचे प्रभारी) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात वड, कडूनिंब, आपटे, पिंपळ आदिं वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी एमएस्सीसह जीएनएम तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात सहकार्य केले. याप्रसंगी प्रा.पायल वाघमारे, प्रा.शिल्पा वैरागडे यांनी यशस्वीरित्या वृक्षारोपण कार्यक्रम घेतला. उपस्थीत मान्यवरांनी वृक्षारोपणाचे महत्व पटवून सांगितले, याप्रसंगी आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांना देखील एक रोप लावून ते जगविण्याचा सल्ला…
साईमत जळगाव प्रतिनिधी खनिज विकास निधी अंतर्गत व्याज स्वरूपात महाराष्ट्र राज्य खनि कर्म महामंडळ मर्यादित नागपूर यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रकमेपैकी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रातील जळगाव जिल्ह्यात विविध विकास कामांकरिता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मंत्री द्वय व स्थानिक आमादारांच्या पाठपुराव्यामुळे 29 कोटी 87 लक्षच्या कामांना शासनाने नुकतीच प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिलेली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बसण्याकरिता बेंचेस खरेदी करणे यासाठी ०५ कोटी रुपये तसेच त्या- त्या तालुक्यात साहित्यसह व्यायाम शाळा बांधकाम, गाव अंतर्गत काँक्रिटीकरण , पेव्हिंग ब्लॉक बसविणे, कॉंक्रीट गटार बांधकाम , सुशोभीकरण ,रस्त्यांची सुधारणा, लहान मोठ्या पुलांचे बांधकाम ,व शौचालय बांधकाम…