साईमत, जळगाव, प्रतिनिधी आजच्या काळात टेक्नॉलॉजी आत्मसात करणे अत्यावश्यक बाब बनली असून टेक्नोसेव्ही आणि टेक्नोस्नेही बनल्यास प्रशासकीय कामकाजात गती आणि सर्वांगीण प्रगती येते, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले. विद्यापीठात कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध टेक्नोसेव्ही सुविधांचे उद्घाटन कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात कुलगुरू माहेश्वरी पुढे म्हणाले की, माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर विविध क्षेत्रात वाढत आहे. प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर करणे अपरिहार्य आहे. तंत्रज्ञानापासून दूर न जाता तंत्रस्नेही बनल्यास आपण अधिक गती आणि प्रगती…
Author: Saimat
साईमत, जळगाव, प्रतिनिधी शहरातील गणपती नगरात शहरात सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या बाप-लेकाने मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम पसार केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री 2.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघा बाप- लेकांवर रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गणपती नगरातील संत सतरामदास मंदिरात शहरातील सिंधी कॉलनीतील श्याम वासुदेव करमचंदाणी हे सेवा करतात. त्यांचासोबत रात्रीच्या वेळ काही सहकारी सेवा करण्यासाठी येत असतात. मंदिराच्या परिसरात राकेश गोकुळ राठोड व त्याचे वडील गोकुळ हंसराज राठोड हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. शुक्रवारी रात्री 2.30 वाजेच्या सुमारास मंदिरात मोठा आवाज झाला. त्यामुळे मंदिरात झोपलेले श्याम करमचंदाणी, अविनाश कापडी, प्रकाश पासवाणी, जवाहर तलरेजा…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी शहरातील जोशी कॉलनीत रिक्षाचालकाला लुटल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शहर पोलिसांनी चौघांपैकी एका फरार आरोपीला अटक केली आहे. त्यास तपासकामी शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील जोशी कॉलनीत राहणारे रिक्षा चालक निलेश उर्फ रायबा शांताराम जोशी यांना दि.15 जुलै रोजी रात्री 9.45 च्या सुमारास चौघांनी बेंडाळे चौकाजवळ गल्लीत लुटले होते. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी उपनिरीक्षक प्रिया दातीर यांच्या पथकाने गुन्ह्यातील तिघांना अटक केली होती. तर एक संशयित अद्याप फरार होता. शहर पोलिसांना एक संशयित आरोपी रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेलमध्ये दारू पित असल्याची माहिती शनिवारी दुपारी मिळाली. शहर…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील रामानंद नगर परिसरात एका ५५ वर्षीय महिलेचे दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी ८५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रामानंदनगर परिसरात असणाऱ्या जीवन नगरमध्ये राहणाऱ्या आशा ज्ञानेश्वर महाले ( वय ५५ ) ह्या शुक्रवारी सायंकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास रस्त्याने पायी जात असताना एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ८५ हजार रुपये किमतीचे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून पळ काढला. आशा महाले यांनी आरडाओरड करूनही उपयोग झाला नाही. याबाबत आशा महाले यांनी तात्काळ रामानंदनगर पोलीस स्टेशन…
साईमत चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील रांजणगाव येथे शेळ्यांच्या शेडच्या जाळ्या तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन बकऱ्या आणि एक बोकड (पशुधन) अशा २५ हजारांच्या बकऱ्या चोरून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील रांजणगाव येथे बकऱ्यांसाठी असणाऱ्या शेडमधून अज्ञात चोरट्याने लोखंडी जाळी तोडून दोन बकऱ्या आणि एक बोकड असे २५ हजार रुपयांच्या शेळ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर जंजाळे करीत आहे.
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील रामानंद नगर परिसरात एका 55 वर्षीय महिलेचे दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी 85 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र धूमस्टाईल लांबवल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रामानंदनगर परिसरात असणाऱ्या जीवन नगरमध्ये राहणाऱ्या आशा ज्ञानेश्वर महाले ( वय 55 ) ह्या शुक्रवारी सायंकाळी 7.45 वाजेच्या सुमारास रस्त्याने पायी जात असताना एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील 85 हजार रुपये किमतीचे 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून पळ काढला. आशा महाले यांनी आरडाओरड करूनही उपयोग झाला नाही. याबाबत आशा महाले यांनी तात्काळ रामानंदनगर पोलीस स्टेशन…
साईमत , जळगाव, प्रतिनिधी सहकार चळवळीचे जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 123 व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य व नाट्य पुरस्कारांची घोषणा पुरस्कार निवड समितीने केली आहे. यात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार जळगाव येथील ख्यातनाम लेखक व रंगकर्मी शंभू पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे . निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी पुरस्कार निवड समितीचे निमंत्रक प्रा. डॉ. राजेंद्र सलालकर उपस्थित होते. शंभू पाटील यांच्या सोबत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत निशिकांत ठकार यांना तर शैलजा बापट, तमाशा कलावंत वसंत अवसरीकर, विश्वास…
साईमत भुसावळ प्रतिनिधी सुरक्षा बलाचे सहायक फौजदार संजय पाटील व जितेंद्र इंगळे श्वान वीरूसोबत अकोला ते भुसावलदरम्यान गांधीधाम एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी दि. ४ रोजी तपासणी करीत होते. रेल्वेच्या मागील जनरल डब्यामध्ये श्वान वीरूला दोन संशयित बॅग आढळून आल्या. एका बॅगमध्ये कपडे, तर दुसऱ्या बॅगमध्ये प्लास्टिक पिशवीमध्ये २४ किलो गांजा आढळून आला. दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरक्षा बळाचे निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी गांजा जप्त केला. मलकापुरवरून भुसावळ रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक चारवर गांधीधाम रेल्वे पोहचली असता, भुसावळ स्थानकाचे निरीक्षक राधा किशन मीना, उपनिरीक्षक नंदलाल राम, उपनिरीक्षक विनोद खरमाटे, गोपनीय विभागाचे सुरेश भगत, अवधेश कुमार, अमोल पाटील, यांनी जनरल डब्यात प्रवेश केला. सीट क्रमांक २२ ते…
साईमत धानोरा ता चोपडा वार्ताहर धानोरा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त प्रतिमेला माल्यर्पण व पुजन करून गावात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सरपंच रज्जाक तडवी उपसरपंच विजय चौधरी, माजी प . स . उपसभापती माणिकचंद महाजन ग्रा.स गजानन कोळी, मुक्तार शेख, रविन्द्र शिरसाठ, पढंरीनाथ कुभार, चंद्रशेखर साळुके, प्रविण कोळी,गोकुळ साळूके, ज्ञानेश्वर सोनवणे आदी उपस्थित होते. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीचे औचित्य म्हणून मोहरदचे सरपंच अंजुम रमजान तडवी व हाजी रमजान तडवी यांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना शेकडो वह्याचे वाटप केले अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनपटावर प्रा भरत शिरसाठ, फारुख शेख यांनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमसाठी भारतीय बहुजन मांतग संघ…
साईमत, मुंबई, प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार यांनी खिंडार पाडल्याने राज्यातील राजकारणात मोठे बदल घडून आले होते. पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दुसरा जबर हादरा लवकरच बसणार आहे. शरद पवारांच्या जटातीले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह त्यांचे भाचे आमदार प्राजक्त तनपुरे, राजेश टोपे आणि मानसिंग नाईक हे अजित पवार गटात लवकरच प्रवेश करणार असल्याचे समजते. शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटासोबत घेण्यास तत्कालीन भाजपा नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांच्या नावावर फुली मारली होती. आता तोच प्रकार कळवा मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबाबतीत घडल्याची चर्चा आहे. फडणवीस यांनीच आव्हाड यांच्या प्रवेशाला विरोध केल्यामुळे जयंत पाटील यांच्यासोबतच्या ‘लॉट’मध्ये त्यांचा समावेश…