साईमत भुसावळ प्रतिनिधी भुसावळ येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर वांजोळा रोड रस्त्यालगत राजस्थान मार्बल जवळ सापाळा रचत चोरटी वाळू वातुक करणारे डंपर ताब्यात घेत कारवाई केली आहे. सदरची कारवाई शुक्रवारी दि. ४ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास तहसिलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. याबाबत माहिती अशी की, तहसिलदार निता लबडे यांना जोगलखेडा परिसरात वाघुर नदीपात्रातून डंपरमध्ये वाळुची चोरटी वाहतुक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहिती वरून तहसिलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनात पहाटे ५ वाजेच्या सुमारास कुऱ्हे प्र.न.मंडळातील तलाठी, कोतवाल यांनी सापाळा रचला होता. राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर राजस्थान मार्बल जवळ डंपर (क्रमांक एमएच-18-सीएम-1584 ) थांबवुन तपासणी…
Author: Saimat
साईमत भुसावळ प्रतिनिधी शहरातील संतोष माता हॉल जवळील शिवमुद्रा प्रतिष्ठान गणेश मंडळाचे भूमी पूजन उत्साहात संतांच्या हस्ते झाले. यावेळी शिवमुद्रा ढोलपथक व जय मातृभूमी क्रीडा मंडळ च्या स्मारकाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर प. पू. शास्त्री श्रीधर्मस्वरूपदासजी, महामंडलेशवर जनार्धन महाराज, शास्त्री भक्तीकिशोरदास, हभप धनराज महाराज , हभप दुर्गादास महाराज , महंत पवन कुमार दास , महंत भक्तीप्रकाश शास्त्री आदी उपस्थित होते. यावेळी महामंडलेशवर जनार्धन स्वामी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, आजच्या वातावरण मध्ये संतांचे चरणस्पर्श करणं चांगले लक्षण आहे. या देशाचा स्वाभिमान ,आत्मा असलेल्या प्रभू श्रीराम च्या मंदिराची प्रतिकृती तयार करणे ,स्वतः च ढोलपथक तयार करणं…
साईमत मलकापूर प्रतिनिधी अमृत भारत योजनेच्या अंतर्गत मलकापूर रेल्वे स्थानकाचा विकास होणार असल्याची माहिती खा. रक्षाताई खडसे यांनी दिली आहे. येत्या ६ ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे देशभरातील ५०६ रेल्वे स्टेशनसह या स्टेशनचे भूमिपूजन करणार आहेत. अमृत भारत योजनेंतर्गत रावेर लोकसभा क्षेत्रातील मलकापूर रेल्वे स्टेशनची निवड झालेली असून, स्टेशनवर विविध विकास कामे करणेसाठी रू.१८.५१ कोटी मंजूर झालेले असुन, ६ ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे देशभरातील ५०६ रेल्वे स्टेशनसह या स्टेशनचे भूमिपूजन करणार आहेत. यात मलकापूर स्टेशन वर खासदार रक्षाताई खडसे व माजी आमदार चैनसुख संचेती हे प्रमुख पाहुणे…
मणिपूरमधील हिंसाचार व त्यातही तेथे दोन महिलांवर झालेल्या अत्याचाराची केंद्रीय गुप्तचर विभागातर्फे (सीबीआय) चौकशी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे तसेच या संदर्भातील खटले मणिपूरबाहेर हलवण्यासाठी केंंद्राने सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मागितली आहे. या दोन्ही बाबी स्वागतार्ह आहे.मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंंसाचाराने सर्व देश चिंतेत आहे.तेथे दोन महिलांवर ज्या पद्धतीने अत्याचार झाले, त्यामुळे देशात संंतापाची लाट उसळली. तीन मे रोजी तेथे मोठ्या प्रमाणावार हिंसक घटना घडू लागल्या. महिलांची विवस्त्र धिंड काढणे व त्यांच्यावर अत्याचार होणे ही घटना चार मे रोजी घडली,असे स्थानिक पोलिसांनी सांगितले मात्र गुन्हा दाखल झाला 18 मे रोजी. त्या दुर्दैवी घटनेची चित्रफीत समोर आल्यानंतर, सुमारे अडीच महिन्यांनी पहिली अटक…
साईमत सोयगाव प्रतिनिधी पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी ट्विट द्वारे दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदत देण्यात आली होती. आजपर्यंत सोयगाव तालुक्यातील 23 हजार शेतकऱ्यांनी आपल्या 34 हजार हेक्टरवरील विविध पिकांसाठीचा एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपला विमा अर्ज भरलेला नाही, काही ठिकाणी…
पाहा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातून आपले मत मांडताना https://www.youtube.com/live/rIx6a0sui1c?feature=share
चालू आर्थिक वर्षात भारताचा (India) विकास दर ६.१ टक्के राहील असे भाकित आंंतरराष्ट्रीय नाणे निधीने केले आहे. गेल्या एप्रिलमध्ये अंंदाज व्यक्त करताना नाणेनिधीने हा दर ५.९ टक्के राहील असे म्हटले होते.जागतिक विकास दराबाबतचा अंदाजही अल्पप्रमाणात नाणेनिधीने उंंंचावला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक घडामोडींचा वेग अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे या वरून स्पष्ट होत आहे.जागतिक विकास दरात ०.२ टक्के वाढ होऊन तो या वर्षी तीन टक्के असेल, असा अंदाज नाणेनिधीने व्यक्त केला आहे. विकसित आणि विकसनशील देशांमध्ये बाजारपेठा व अर्थव्यवस्थांची स्थिती सुधारत असल्याचे हा वाढीव अंदाज एक निदर्शक आहे.गेले वर्ष-सव्वा वर्ष जग महागाईवाढीच्या उच्चदराने ग्रस्त होते.८.७ टक्क्यांवरून हा दर या…
साईमत जामनेर प्रतिनिधी जामनेर येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष शंकर राजपूत यांच्या नेतृत्वाखाली राजमाता जिजाऊ चौकात बेताल वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. येथून पुढे जात आंदोलक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, संभाजी भिडे हे शिवप्रतिष्ठान च्या नावाखाली महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन तरुण मुलांना मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली देशाचा चुकीचा इतिहास सांगत असून तरुणाईचे माथे फिरविणारे जातीय वादी भडकाऊ वक्तव्य करीत आहेत. नुकतेच अमरावती येथे बोलतांना त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी अक्षेपार्य वक्तव्य करुन गांधीजींचे वडील मुस्लीम असल्याचे बोलले आहे. तसेच या अगोदर…
साईमत जळगाव प्रतिनिधी नूतन मराठा महाविद्यालय हे मागास विद्यार्थ्यांच्या चळवळीचे माहेरघर असून प्रशिक विदयर्थी संघटनेची स्थापना याच महाविद्यालयात झाली आहे , सत्यशोधक समाज ही चळवळ सुद्धा याच महाविद्यालयातुन चालत असे , राज्यस्तरीय सत्यशोधकि साहित्य संमेलन यशस्वी करण्यात तसेच मागास व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना फक्त दहा रूपयात प्रवेश देवून एक नवी ओळख निर्माण केली असे प्रतिपादन प्रसिध्द साहित्तिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले . नूतन मराठा महाविद्यालयातिल माजी विदयर्थी मेळावा ३० जुलै रोजी प्राचार्य डॉ. पी. एल. देशमुख यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आला असता वाघ बोलत होते . या प्रसंगी अनिल पाटील , प्रा. सुनील गरुड़ , जयप्रकाश महाडिक ,…
साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी मुक्ताईनगर (Muktainagar) सह जिल्ह्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना आठवडा उलटूनही सानुग्रह अनुदान मिळाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत न मिळाल्यास शासन आपले दारी कार्यक्रमात घुसून जाब विचारणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. खासदार राजू शेट्टी यांनी शिंदे सरकारला दिला. मुक्ताईनगर सह जिल्ह्यात ढगफुटी,पुरामुळे शेतकऱ्यांची पूर्णता वाहतात झालेली असून शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या आहे, शेती वाहून गेलेली आहे पिकं पूर्णतः उध्वस्त झालेली आहे तसेच नदीपात्रालगत गावातही पुरामुळे मुक्ताईनगर सह जिल्ह्यातील हजारो शेतकरी बेघर झालेले असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी अधिवेशनात सानुग्रह अनुदान तात्काळ देण्याची घोषणा केली परंतु आठवडा उलटूनही शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही, त्यामुळे शिंदे सरकार हे…