Author: Saimat

साईमत, नांदेड : वृत्तसंस्था एकीकडे समाजात वडील-मुलांमध्ये वाद विकोपाला जात असल्याच्या घटना वरच्या वर येताना दिसतात. पिता-पुत्रामधील वादांच्या घटना खूनापर्यंत गेल्याचंही पाहायला मिळतं. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत मुलीच आपल्या आई-वडिलांना साथ देतात, सांभाळ करतात, तर मुलं आई वडिलांची साथ सोडून आपल्याच संसारात व्यस्त होतात, अशी भावना अनेकांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. मात्र या समजाला नांदेडच्या एका 25 वर्षीय डॉक्टर मुलाने फाटा दिला आहे. जन्मदात्याला स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करुन मुलाने जीवनदान दिले आहे. डॉ मयुरेश गव्हाणे असं या मुलाचं नाव आहे. त्याने समाजापुढे ठेवलेल्या या आदर्शाचे सर्वत्र कौतुक होतं आहे. नांदेड शहरातील रहिवासी असलेले डॉ मयुरेश गव्हाणे यांचे वडील…

Read More

साईमत फैजपूर प्रतिनिधी भारत देश जागतिक स्तरावर महासत्ता होण्यासाठी देशातील गुणवंत विद्यार्थी व युवकांनी राष्ट्र कार्यासाठी महत्व देऊन राष्ट्र कार्यात स्वतःला झोकून दयावे असे आवाहन सातपुडा सोसायटी चेअरमन तथा विद्यापीठ सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांनी केले. सातपुडा सहकारी सोसायटीने गुणवन्त विद्यार्थी गौरव कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. नरेंद्र नारखेडे यांनी पुढे बोलतांना विद्यार्थी व युवकच उद्याच्या भारताचे आधारस्तंभ आहे यामुळे युवकच देशाला महासत्ता बनऊ शकतात असा आत्मविश्वास व्यक्त केला. यावेळी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सभेत सभासदांना 10 टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचा माजी नगराध्यक्ष…

Read More

साईमत बोदवड प्रतिनिधी येथील रांका विद्यालयात मुख्याध्यापक प्राध्यापक पी.एम .पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालक शिक्षक संघाची सहविचार सभा नुकतीच उत्साहात पार पडली. यावेळी उपप्राचार्य एम. टी. नेमाडे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष रामेश्वर कोळी, सहसचिव पारस जैन, विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक वृंद आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा अध्यक्षीय सूचना प्राध्यापक जे. एन. राऊळ यांनी तर अनुमोदन श्री व्यवहारे यांनी दिले. पालक शिक्षक संघाचे विभाग प्रमुख प्राध्यापक जी. व्हि. चौधरी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. नेमाडे यांनी पालक शिक्षक सभेच्या उद्दिष्ट याबद्दल चर्चा केली. शिक्षकीय मनोगतात प्राध्यापक के. एस. उबाळे यांनी वर्षभरातील शैक्षणिक उपक्रमाविषयी माहिती दिली तसेच शाळेच्या…

Read More

साईमत बोदवड प्रतिनिधी राष्ट्रीय विकलांग पार्टी च्या रेल रोको आंदोलनास व्यापारी संघटनेने पाठींबा जाहीर केला.दिनांक ६ रोजी राष्ट्रीय विकलांग पार्टी ची अग्रसेन भवन बोदवड येथे बैठक झाली. यावेळी पार्टी तर्फे ९ ऑगस्ट रोजी सुरत अमरावती, दादर सेवाग्राम, अहमदाबाद हावडा या गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा या साठी रेल रोको करण्यात येणार आहे. या आंदोलनास बोदवड व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांनी उपस्थिती देऊन पाठींबा जाहीर केला. बैठकीला राष्ट्रीय विकलांग पार्टीचे पदाधिकारी व इतर दिव्यांग बांधव, व्यापारी संघटना पदाधिकारी तसेच नगरपंचायत बोदवड नगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते. बैठकीच्या वेळी राष्ट्रीय विकलांग पार्टीच्या रेल रोको आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत शेवटपर्यंत सोबत राहू असे आश्वासन…

Read More

साईमत मलकापूर प्रतिनिधी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, रतन उर्फ गंगाराम जगन्नाथ दाभाळकर वय ४५ वर्ष व्यवसाय-पानपटी दुकान रा. एकता नगर यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला येवुन तक्रार दाखल केली की, माझा लहान भाऊ रमन दाभोळकर यांचे १२ वी नापास पर्यंत शिक्षण झाले असून माझी १९९४ पासून रेल्वे स्टेशन जवळ, पानपट्टीचे दुकान आहे. अजय प्रभाकर सावळे रा. आंबेडकरनगर, मलकापुर यास मी पूर्वी पासून ओळखतो. आशिष सुभाष हाताळकर व आम्ही एकतानगर मलकापूर येथे राहत असुन माझा लहान भाऊ रमन दाभाळकर व आशिष हाताळकर यांचे सोबत शिक्षण…

Read More

साईमत, जळगाव, प्रतिनिधी पारोळा विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटलांच्या गाडीला अमळनेर शहराजवळ असलेल्या अंबर्षी महाराज टेकडी जवळ अपघात झाला. आमदार चिमणराव पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस सुरक्षा रक्षकांच्या पोलीस व्हॅननेच त्यांच्या कारला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात सुदैवाने चिमणराव पाटलांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र पोलीस व्हॅन आणि चिमणराव पाटलांच्या कारचे मात्र नुकसान झाले आहे.

Read More

साईमत, पाचोरा, प्रतिनिधी  शहरातील मानसिंगका कॉलनी येथील २१ वर्षीय तरुण व पुरुषोत्तम नगर येथील २१ वर्षीय तरुणी यांनी आज दुपारी वेगवेगळ्या भागात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही घटना ह्या परस्पर वेगळ्या असुन आत्महत्यांचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. शहरातील मानसिंगका कॉलनी येथील रहिवाशी ललित राजाराम पाटील (वय २१) या तरुणाचा रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पंचायत समितीच्या पडक्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, पोलिस कॉन्स्टेबल संतोष राजपुत, गुणवंत पाटील हे घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा करुन ललित यास तातडीने ग्रामीण…

Read More

साईमत, पुणे ः प्रतिनिधी येथील ५७ व्या वरिष्ठ राज्य कॅरम स्पर्धेत महिला गटात पुणे तर पुरुष गटात मुंबई संघास विजेतेपद मिळाले.इतिहासात पुणे येथे प्रथमच स्पर्धा झाल्या व पुणे महिला संघाने विजेतेपद पटकाल्याने पुणेकरांच्यादृष्टीने ही अनोखी भेट ठरली.सांघिक गटात साखळी सामन्यांमध्ये पुणे व मुंबईचे प्रत्येकी ८ सामने झाले होते त्यामुळे कोण बाजी मारणार,याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली होती.अंतिम सामन्यात पुणे संघाने बाजी मारली.पुणे संघाने मुंबईला २-१ असे नमवून पहिल्यांदाच विजेतेपदाचा बहुमान मिळवला. मुंबईच्या काजल कुमारीने पहिल्या एकेरीच्या सामन्यात पुण्याच्या तुलिका चौरसियाला २०-०,१९-१६ असे हरवून आपल्याला संघाला आघाडी मिळवून दिली होती परंतु दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात पुण्याच्या मेधा मठकरीने मुंबईच्या अंबिका हरियवर १४-१३, २५-१३…

Read More

साईमत मुंबईः प्रतिनिधी  मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं होतं. याविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सुनावली झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेस स्थगिती दिली आहे. यापेक्षा कमी शिक्षा सुनावता आली असती, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता राहुल गांधी पुन्हा एकदा लोकसभेत दिसतील असे बोलले जात होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊन 72 तास होत आले तरी अद्याप लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींना त्यांचं संसद सदस्यत्व दिलेले नाही. यावरून आता टीका-टिप्पणी सुरू झाली…

Read More

साईमत, पाळधी, प्रतिनिधी येथील कासट ग्रुपच्या कार्यालयाची ग्रील तोडून कॅबिनमधून 2 लाख 60 हजारांची रक्कम रात्री चोरट्यांनी लांबवल्याची घटना रविवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. येथील प्रसिद्ध उद्योगपती कासट ग्रुपचे संचालक अशोक व शरद कासट यांचे महामार्गावर घर असून घराच्या आवारात त्यांचे व्यावसायिक कार्यालय आहे. तेथूनच त्यांचे सर्व व्यवहार होत असतात. ते वीटभट्टीच्या व्यवसायाबरोबरच ते सरकारी कंत्राटदार आहेत. त्यांच्या कार्यालयात जवळपास सहा कॅबिन आहेत. रविवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास कार्यालयातील खिडकीचे ग्रिल तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व त्यांनी प्रत्येक कॅबेिनमध्ये जावून ड्रॉवरमधून पैसे काढले. यात शरद कासट यांचे 40 हजार, शैलेश कासट…

Read More