Author: Saimat

साईमत मलकापूर प्रतिनिधी बनावट खोटी प्रतिज्ञापत्रे तयार करुन त्याआधारे ‘एलटीसी’चा लाभ गटवर्ष २०१३-२०१६ या एकाच गटवर्षात दोन वेळा घेऊन शासनाची फसवणुक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. काही शिक्षकांनी एल.टी. सी गटवर्ष २०१३ – २०१६ या एकाच गटवर्षात दोन वेळा बनावटी व खोटी प्रतिज्ञापत्रे कागदपत्रे तयार करुन त्याआधारे शासनाची फसवणुक केली होती. तर शासनाच्या तिजोरीतून लाखो रुपयांची लुट केली होती यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जि.प. हायस्कूल धाड येथील तत्कालीन मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे चौकशी अंती समोर आले होते. मात्र, शिक्षण विभागाकडून त्याच्यांविरुध्द कारवाई होत नसल्याने आरटीआय कार्यकर्ते प्रभाकर लक्ष्मण इंगळे (रा. बेलाड…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजवादी नेते, सामाजिक कार्यकर्ते तथा ख्यातनाम सनदी लेखापाल (सीए) शेखर सोनाळकर (वय ७२ )यांचे शुक्रवार दि. ४ रोजी पहाटे सव्वा वाजेच्या सुमारास निधन झाले. सत्तरच्या दशकातील लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून जडण-घडण झालेले शेखर सोनाळकर यांनी आणीबाणीत कारावास देखील भोगला. वासंती दिघे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. यानंतर गेल्या सुमारे चार दशकांपासून जास्त काळ हे दाम्पत्य राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत होते. शेखर सोनाळकर यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून ढासळली होती. शुक्रवारी पहाटे त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. जळगावातील अनेक चळवळींच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य व्यक्तीच्या हिताचे काम केले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी प्रसिद्ध निसर्गकवी, प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख असलेले जेष्ठ कवी पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित ना.धों.महानोर यांचे वयाच्या ८१व्या वर्षी दीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. युवाशक्ती फाऊंडेशनच्या वतीने पद्मश्री ना.धों.महानोर यांना काव्यरत्नावली चौक येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी पुष्पांजली वाहून व मेणबत्त्या लावून आदरांजली वाहण्यात आली. पद्मश्री महानोर यांनी लिहलेल्या गीतांनी वातावरण भारावून गेले होते. काही नागरिकांनी अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. कवी निवृत्ती कोळी, कवियत्री पुष्पलता सी.एय सी.ए. सुभाष लोढा, श्वेता मुले, राजपूत गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले. पद्मश्री ना.धों.महानोर यांच्या रूपाने एका प्रतिभाशाली आणि आपल्या शब्दांनी रसिकांना समृद्ध करणारा कवी आणि भूमिपुत्र हरपला याचे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे यांच्यासह चाईल्ड हेल्थ नर्सिंग विभाग प्रमुख तथा सहाय्यक प्रा.अश्विनी मानकर (हरित उपक्रम समितीचे प्रभारी) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात वड, कडूनिंब, आपटे, पिंपळ आदिं वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी एमएस्सीसह जीएनएम तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात सहकार्य केले. याप्रसंगी प्रा.पायल वाघमारे, प्रा.शिल्पा वैरागडे यांनी यशस्वीरित्या वृक्षारोपण कार्यक्रम घेतला. उपस्थीत मान्यवरांनी वृक्षारोपणाचे महत्व पटवून सांगितले, याप्रसंगी आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांना देखील एक रोप लावून ते जगविण्याचा सल्‍ला…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी खनिज विकास निधी अंतर्गत व्याज स्वरूपात महाराष्ट्र राज्य खनि कर्म महामंडळ मर्यादित नागपूर यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रकमेपैकी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रातील जळगाव जिल्ह्यात विविध विकास कामांकरिता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मंत्री द्वय व स्थानिक आमादारांच्या पाठपुराव्यामुळे 29 कोटी 87 लक्षच्या कामांना शासनाने नुकतीच प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिलेली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बसण्याकरिता बेंचेस खरेदी करणे यासाठी ०५ कोटी रुपये तसेच त्या- त्या तालुक्यात साहित्यसह व्यायाम शाळा बांधकाम, गाव अंतर्गत काँक्रिटीकरण , पेव्हिंग ब्लॉक बसविणे, कॉंक्रीट गटार बांधकाम , सुशोभीकरण ,रस्त्यांची सुधारणा, लहान मोठ्या पुलांचे बांधकाम ,व शौचालय बांधकाम…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव तालुक्यासह जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसाय फोफावला असून मोठा आर्थिक फायदा होत असल्याने अनेक जण या धंद्यात उतरून स्वतःला वाळू माफिया म्हणवून घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे या व्यवसायात अनेक जण गुंतले असून यात पोलिसही मागे नसल्याने एक पोलीस कर्मचारी स्वतः वाळूचा व्यवसाय चालवीत असल्याचा प्रकार पुढे आल्याने त्याच्यावर चौकशी सुरु असेपर्यंत निलंबनाची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी केली असून अशी माहिती पत्रकारांशी संवाद साधतांना दिली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अवैध वाळूप्रश्नी लक्ष घातले आहे. त्यामुळे अवैध वाळू कारवाईंना वेग येत आहे. तालुक्यातील दापोरा येथे पोलीस कर्मचारी स्वतःच वाळू ठेका चालवित असल्याची…

Read More

साईमत फैजपूर प्रतिनिधी धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचे जागी प्रभारी प्राचार्य पदाची धुरा वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल भंगाळे यांच्या कडे सोपविण्यात आली आहे. डॉक्टर अनिल भंगाळे यांनी नुकताच पदभार स्विकारला. या निमित्ताने महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले.

Read More

साईमत फैजपूर ता यावल प्रतिनिधी मानवी जीवन अनपेक्षित चढउतार, सुखदुःख आणि अनगिणत आव्हानांनी ओतपोत भरलेले असतानाच भविष्यातील संकटांना धैर्याने सामना करण्यासाठी व्यक्तिमत्व विकासाचे धडे घेतले पाहिजेत व त्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रशिक्षण हे सर्वोत्तम माध्यम असल्याचे प्रतिपादन कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले. ते 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आयोजित वार्षिक प्रशिक्षण शिबिरात बोलत होते. दिनांक 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2023 दरम्यान विद्यापीठाच्या हिरवागार डोंगरराशीत एनसीसी चा कॅम्प सुरू आहे. या कॅम्पमध्ये सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवण्याच्या दृष्टिकोनातून कर्नल पवनकुमार, प्रशासकीय अधिकारी, 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव व त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने…

Read More

साईमत भुसावळ प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन सचिव आणि लिपिक यांनी बनावट कागदपत्रे तयार करून कर्जदार सभासदांकडून परस्पर कर्जाची रक्कम वसूल करून संस्थेत जमा न करता तब्बल ३५ लाख २१ हजार ८५९ रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आला आहे. या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील वराडसीम येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन सचिव भास्कर सिताराम पाटील राहणार जामनेर रोड भुसावळ आणि लिपिक तेजश्वर रामदास डाके राहणार वराड सिम भुसावळ यांनी २१ एप्रिल २०११ ते २० मे २०१९ दरम्यान संस्थेत कार्यरत असताना पदाचा दुरुपयोग करून…

Read More

साईमत बोदवड प्रतिनिधी रेल्वे बोर्ड एकीकडे आधुनिकतेची कास धरत असून दुसरीकडे ग्रामीण भागातील नागरिकांवर अन्याय करत आहे, एकी कडे भुसावळ विभाग विभागाच्या पंधरा रेल्वे स्थानक चा कायापालट करत आहे, त्यात बोदवड रेल्वे स्थानक ला वगळले असून त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे, बोदवड तालुक्यावर रेल्वे बोर्ड सतत अन्याय करत असून आधी ब्रिटिशकालीन व राष्ट्रपती च्या हस्ते सुरू झालेल्या गाड्यांचा थांबा कोरोना काळ पासून बंद करून तर आता स्थानकाच्या मॉडेल मधून नाव वगळून अन्याय केला जात आहे. याबाबत राष्ट्रीय दिव्यांग पार्टी ने नऊ ऑगस्ट क्रांती दिनी तालुक्यातील दिव्यांग बांधव बोदवड रेल्वे स्थानक वर पूर्वी ब्रिटिशकसलीन सुरू असलेली १) दादर सेवाग्राम, सेवाग्राम दादर,माजी…

Read More