साईमत, प्रतिनिधी, जळगाव, तालुक्यातील शिरसोली येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस सुरत येथे पळवून घेवून जाणाऱ्या व त्यास मदत करणाऱ्या अशा दोघांंना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीला पोलिसांनी पालकांच्या स्वाधिन दिले आहे . याबाबत माहिती अशी क ी, सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेदरम्यान शिरसोलीतील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. मात्र तिचा शोध घेऊनही ती आढळून न आल्याने सेंट्रिंग व हातमजुरीचे काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या पित्याने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यावरून भादंवि कलम 363 प्रमाणे दिनांक 25 जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस…
Author: Saimat
नवी दिल्ली – राहुल गांधींनी आपले भाषण संपवून सभागृहातून बाहेर जाताना फ्लाइंग किस दिल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला. तसेच, स्मृती इराणी यांनी याला असभ्यता म्हटले आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या या प्रतिक्रियेला विरोध दर्शवत भाजपच्या २२ महिला खासदारांच्या वतीने लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली आहे. राहुल गांधी भाषण संपवून सभागृहातून बाहेर जाताना अशी घटना घडली. त्यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या अविश्वास ठरावाविरोधात भाषण करत होत्या. मात्र, राहुल गांधींच्या प्रतिक्रियेचा तो क्षण कॅमेऱ्यात टिपता आला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या क्षणाचे साक्षीदार असलेल्या लोकांच्या मते, जेव्हा राहुल गांधी अविश्वास प्रस्तावाच्या भाषणानंतर सभागृहातून बाहेर पडत होते, तेव्हा त्यांच्या काही फाईल्स पडल्या. त्यांना घेण्यासाठी…
साईमत कासोदा ता ,एरंडोल प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील कासोदा शहरातील हजरत सादिक शाह सरकारच्या उर्स निमित्त सहा ऑगस्ट रोजी टी व्ही सिंगर अजीम नाजा कव्वाल यांची कव्वाली या कार्यक्रम उत्साहात पार पडला रसिकांनी कार्यक्रमाचे आनंद लुटले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पारोळा येथील समाजसेवक डॉक्टर संभाजी राजे पाटील, कासोदा सरपंच महेश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य बंटी चौधरी, दगडू चौधरी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे एरंडोल तालुकाप्रमुख रवींद्र चौधरी ,नंदू मोहिते, एरंडोल चे ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर, एडवोकेट अहमद सय्यद, मालेगाव चे नगरसेवक फरीद कुरेशी एपीआय योगिता नारखेडे मॅडम यांच्या उर्स कमिटी च्या वतीने सत्कार करण्यात आला.
साईमत सोयगाव प्रतिनिधी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भगवान बिरसा मुंडा,व आद्या कांतीकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.व सोयगाव शहरासह गलवाडा,काळेनगर,बाजार चौक,बसस्थानक परिसर येथे मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. यावेळी नायब तहसीलदार विठ्ठल जाधव,माजी मुख्याध्यापक आंनदा इंगळे,पोलीस कर्मचारी राजू बरडे,पांडुरंग दांडगे,चंद्रास बावस्कर,गजानन इंगळे,रघुनाथ टोकरे,जनार्दन जोहरे,डॉ. मोहितकुमार जोहरे,समाधान भिल,संजय माळी,परमेश्वर माळी,ईश्वर माळी,दीपक ठाकरे,रामेश्वर माळी,गोपीनाथ इंगळे,राजू इंगळे,अनिल ठाकरे,ईश्वर सोनवणे,विनोद तेली,रवींद्र कोळी,दीपक बावस्कर,रामचंद्र गायकवाड, राजेश सोनवणे,परमेश्वर राऊत,कडूबा सपकाळ,ज्ञानेश्वर सोनवणे,अक्षय इंगळे,राजेंद्र इंगळे,दत्तात्रय जोहरे,ऋषिकेश गवळे,सुरेश ठाकरे,देवराव गायकवाड,सुपडू इंगळे,संजय बावस्कर,राजू कुडके,अनिल मोरे,सागर राऊत,सुनिल ठाकरे,अशोक जाधव,गणेश जाधव,कचरू सोनवणे,श्रावण ठाकरे,ज्ञानेश्वर जाधव,हिरालाल माळी,अमरसिंग सोनवणे, करण माळी,विजय गंव्हाडे,राजू मोरे,श्रावण मोरे,अनिल सोनवणे,अजय…
साईमत धुळे प्रतिनिधी नुकतंच झालेल्या सरकार स्थापनेच्या खेळामध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड पुकारला, यामध्ये अजित पवार यांच्यासह अनेक आमदार व नेत्यांनी भाजप – शिवसेनेला आपला पाठिंबा दिल्याने राष्टवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडली आहे. या झालेल्या बंडामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलाच मोठा धक्का बसला असून शरद पवार यांनी पक्ष वाचवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. एकाबाजूला शरद पवार आपला पक्ष सावरण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असतानाच राष्टवादीला अजून एक धक्का बसला आहे. पक्ष्याच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून धुळ्यातील नेत्याने पक्षाला सोडचिठी दिली आहे. धुळ्याचे माजी आमदार तथा राष्टवादीचे काँग्रेस पक्षचे उपप्रदेश अध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) यांनी राष्टवादीला…
साईमत, जळगाव ः प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अशात पुढील सहा दिवस तरी राज्यात पावसाची शक्यता नाही. त्यानंतर मात्र, राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. राज्यात १६ ते ३० ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस कोसळणार आहे. त्यानंतर सप्टेंबर व ऑक्टोबरमध्येही जोरदार पाऊस पडेल. राव्ोर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. याव्ोळी जळगाव जिल्ह्यात ११ व १२ ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाजही त्यांनी वर्तवला. अडीच महिने पावसाचे पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना यावेळी हवामाना संदर्भात मार्गदर्शन केले. पुढील अडीच महिने…
साईमत, धुळे ः प्रतिनिधी शरद पवार गटाचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपप्रदेश अध्यक्ष, माजी आमदार अनिल गोटे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे आज जाहिर केले. इतकेच नाही तर आपण कोणत्याच पक्षात जाणार नसल्याचे अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे. अनिल गोटे हे अजित पवार यांना पािंठबा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी अनिल गोटे यांनी आपल्या समर्थकांची बैठक बोलावली होती. पक्षाच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सोपविला असून सध्यातरी कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे. धुळ्यात पत्रकार परिषद घेऊन गोटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माजी आमदार अनिल गोटे यांनी पक्षांतर्गत…
साईमत, मुंबई ः प्रतिनिधी ज्येष्ठ विचारवंत, लेखक हरी नरके यांचे निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. हरी नरके यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी अचानक त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. समता परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. हरी रामचंद्र नरके यांची लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर अशी बहुआयामी ओळख होती. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. हा आयोग महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या गटात एखाद्या जातीचा…
साईमत, जळगाव ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना-भाजप युती तोडण्यासंदर्भात केलेले विधान असत्य आहे. पंतप्रधान मोदी खोटे बोलत आहे, युती तोडण्याचा निर्णय भाजपने एकमुखाने घेतला होता. तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस होते. खरेतर त्यांनी ही घोषणा करायला हवी होती. मात्र, तेव्हा ही जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आणि मी स्व:त उद्धव ठाकरेंना फोन करुन आपली युती आजपासून तुटली असे सांगितले होते.असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे पुढे म्हणाले की, २०१४ ला शिवसेनेने युती तोडली आम्ही स्वत:हून युती तोडली नाही, हे संपूर्ण असत्य आहे. भाजप म्हणून प्रत्येकाने तो निर्णय एकमुखाने घेतला होता. काय म्हणाले पंतप्रधान ?…
साईमत प्रतिनिधी जळगाव भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाच्या सांगता कार्यक्रमाची आजपासून जिल्ह्यात ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमात पंच प्रण प्रतिज्ञा घेऊन सुरूवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हातात माती घेऊन पंच प्रण प्रतिज्ञा घेतली. यावेळी जळगाव उपविभागीय अधिकारी महेश सुधलकर, तहसीलदार पंकज लोखंडे, जितेंद्र कुंवर, विजय बनसोडे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मी अशी शपथ घेतली आहे की, भारताला विकसित देश बनवायचे आहे तसेच 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्या समृध्द वारसाचा अभिमान बाळगायचा आहे. एकता…