साईमत फैजपूर प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन प्राविण्य मिळवावे व प्रशासकीय अधिकारी बनावे असे आवाहन फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी फैजपूर शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करताना आवाहन केले. या कार्यक्रमाचे आयोजन श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांनी केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पतसंस्थेचे चेअरमन नरेन्द्र नारखेडे होते तर प्रमुख पाहुणे माजी आ. अरुण पाटील, मसाका माजी चेअरमन शरद महाजन, फैजपूरचे ए पी आय निलेश वाघ, वरिष्ठ वन अधिकारी मुकेश महाजन, होमगार्ड माजी जिल्हा समादेशक पंडितराव कोल्हे यांची उपस्थित होते. या मान्यवरांचे हस्ते गुणवन्त विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक…
Author: Saimat
साईमत भुसावळ प्रतिनिधी येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण विभाग व एन. एस .एस विभागातर्फे जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर पी फालक, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर बी ढाके, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.जगदीश चव्हाण, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.आर डी भोळे, प्रा. डॉ.अनिल सावळे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा. डॉ.माधुरी पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी प्रा. अनिल नेमाडे, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा. डॉ.जयश्री सरोदे, प्रा. श्रेया चौधरी, प्रा. एस. एस. पाटील, प्रा.एस. डी. चौधरी, प्रा. जी.पी. वाघुळदे, प्रा. खिलचंद धांडे, विजय पाटील, प्रकाश सावळे, प्रसिद्धी प्रमुख डॉ. संजय चौधरी , प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व…
साईमत साकेगाव ता. भुसावळ वार्ताहर जळगाव जिल्हा कोतवाल संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी भुसावळ तालुक्यातील साकेगाव सजाचे कोतवाल जितेश चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जळगाव जिल्हा कोतवाल संघटनेची महत्त्वाची बैठक नुकतीच झाली. याबैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व प्रतिनिधी तसेच कोतवाल कर्मचारी उपस्थित होते. जळगाव जिल्हा कोतवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या पदावर भुसावळ तालुक्यातील साकेगाव सजाचे कोतवाल जितेश चौधरी यांची सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी राज्य उपाध्यक्ष प्रवीण चिखलकर, तालुका प्रतिनिधी अशोक पाटील, धनंजय महाजन, चंद्रकांत सरदार, सुनील खराटे, सुपडू कोळी, ईश्वर ठाकूर, शरद पवार आदिंची उपस्थिती होती.
साईमत भुसावळ प्रतिनिधी येथील रोटरी हॉलचे प्रांगण हिरवेगार सुशोभीकरण करण्याचा विडा क्लब ने उचलला आहे वृक्ष लावून उपस्थित महिलांनी प्रत्येक झाड तीन वर्षापर्यंत दत्तक घेऊन त्यांचं संगोपन करण्याचा निर्धार केला असल्याचे प्रेसिडेंट अलका भटकर तथा सेक्रेटरी सुनंदा भारुडे यांनी वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी सांगितले. सदर प्रसंगी वृक्षांचे महत्त्व वृक्षांवर कविता आणि पर्यावरण पूरक जागरण करण्यात आले. सदर कार्यक्रमास फेकरीच्या सरपंच चेतना भिरुड यांनी मोलाचे सहकार्य केले. यशस्वितेसाठी शितल भराडे, रुचिका शर्मा, व्हॉइस प्रेसिडेंट प्राची राणे, ट्रेझरर संगीता चांडक, आयएसओ नूतन फलक, कमल सचदेव, मनीषा काबरा , मनीषा तायडे, आशा पाटील , स्वाती देव , वंदिता पारे, एक्झिक्युटिव्ह मेंबर राजश्री कात्यांयानी ,पद्मजा…
साईमत बोदवड प्रतिनिधी बोदवड न्यायालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासींचा आत्मसन्मान, अस्मीता जपणारा दिवस असल्याचे यावेळी ॲङ अर्जुन पाटील यांनी सांगात, आदीवासी समाजासाठी असलेल्या विविध शासकीय योजना तसेच विविध कायदे, घटनेतील विविध कलमे याबाबत अभ्यासपुर्ण मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष न्या.क्यु.ए.एन. सरवरी होते. प्रमुख उपस्थिती ॲङ अर्जुन पाटील अध्यक्ष बोदवड तालुका वकील संघ, ॲङ के.एस.इंगळे हे होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन शैलेश पडसे,मनोगत ॲड. धनराज सी. प्रजापती, ॲड. के.एस.इंगळे, ॲङ संतोषकुमार कलंत्री यांनी व्यक्त केले. तर कार्यक्रमास ॲड.विजय मंगळकर न्यायालयीन कर्मचारी वर्ग, पक्षकार वर्ग, पो.कॉ. आर.एस.महाजन हे उपस्थित होते. याप्रसंगी ॲड. अर्जुन पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,…
साईमत बोदवड प्रतिनिधी तालुक्यातील जामठी येथे भडगाव तालुक्यातील गोंडगाव या गावच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवार सायंकाळी भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. जामठी होडी मैदानापासून कॅन्डल मार्चची काढण्यात आले होते. जामठी येथील गायत्री विष्णू मंदिराच्या प्रांगणापासून ते संपूर्ण गावभर हा मोर्चा काढण्यात आला होता. या मूकमोर्चा दरम्यान गावातील नागरिकांच्या हातामध्ये या घटनेच्या निषेधाचे फलक तसेच प्रत्येक नागरिकांच्या छाती वरती काळे रिबीन लावून घटनेचा निषेध करण्यात आला. दरम्यान सायंकाळी पाच वाजता या मूक मोर्चा ची सुरुवात करण्यात आली.या मूक मोर्चामध्ये गावातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. दरम्यान मूक मोर्चात जामठी सरपंच शांताबाई पाटील, दिनेश कोठारी, भागवत तेली, विजय शर्मा , ईश्वर रतवेकर,…
साईमत बोदवड प्रतिनिधी नाभिक कन्या निलिमा सुधाकर चव्हाण (ओमळी गाव,चिपळूण जि.रत्नागिरी )हिच्या हत्तेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नाभिक महामंडळ या संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार बोदवड यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी लवकरात लवकर गुन्हेगारांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी व निलिमा चव्हाण हिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा नाभिक समाज राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला. यावेळी बोदवड तालुकाध्यक्ष धनराज शेळके, संत सेना महाराज संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र डापसे, जिल्हा कर्मचारी कार्याध्यक्ष संजय वाघ, दुकानदार संघटना अध्यक्ष गणेश सोनोने, विवेक वखरे, युवक अध्यक्ष सोपान महाले, योगेश वखरे, प्रमोद कुंवर, ममता प्रमोद कुंवर व समाज बांधव उपस्थित होते.
साईमत यावल प्रतिनिधी येथील जे. टी.महाजन इंग्लिश स्कूल मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या उपस्थितीत मंगळवार दि.८ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष जयंत चौधरी , सरस्वती विद्या मंदिर मुख्याध्यापक जी.डी. कुलकर्णी उपस्थित होते. तालुका विज्ञान अध्यक्ष तथा समन्वयक डॉ.नरेंद्र महाले, विषय तज्ञ संदीप मांडवकर, भूषण वाघुळदे , सह समन्वयक सचिन भंगाळे , जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल शाळेतील प्राचार्या रंजना महाजन, डॉ.किरण खेट्टे उपस्थित होते. डॉ.नरेंद्र महाले बोलतांना म्हणाले की, आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे होत असताना सर्व समाजापर्यंत भरड धान्याची आवश्यक ती…
साईमत बोदवड प्रतिनिधी येथील सेवा फाउंडेशनतर्फे मुक्ताई मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, जळगाव येथील शासकीय महाविद्यालय व रक्तपेढी रुग्णालय कडून रक्तदात्यांचे रक्त संकलित करण्यात आले. सेवा फाउंडेशन कडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विशाल चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील मान्यवरांनी डॉ. विशाल चौधरी यांच्यावर अभीनंदनाचा वर्षाव केला. यावेळी ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यशस्वीतेसाठी सेवा फाउंडेशनचे डॉ.विशाल चौधरी, डॉ.वैभव पाटील, डॉ.दिलीप तेली, विवेक वखरे, डॉ.योगेश राजपूत, डॉ.प्रशांत पाटील, डॉ.प्रल्हाद पाटील, योगेश घनोकार, नितीन धांडे, कृष्णा माळी ,संजय गंगतीरे, निलेश देशमुख व सेवा फाउंडेशनचे सहकारी यांनी परिश्रम घेतले.
साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी येथील स्माईलिंग स्टोन फाउंडेशनतर्फे अल्फला उर्दू हायस्कूलच्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता पाचपांडे, पाचपांडे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. प्रवीण पाचपांडे यांची उपस्थिती होती. पहिली ते आठवी पर्यंतच्या अभ्यासक्रमाचे पुस्तके सरकार कडून वाटप केली जातात. पण इयत्ता ९ नंतर मुलांना बाहेरून पुस्तके घेण्याची वेळ येते. या परिस्थितीत काही गरीब घरातील मुलांना ते परवडत नाही, म्हणून मुक्ताईनगर येथील अल्फला उर्दू शाळेतील शिक्षक काही दिवसआधी पाचपांडे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, मुक्ताईनगरचे संचालक डॉ. प्रवीण पाचपांडे यांना भेटायला आले. शाळेची पुस्तके महाग असल्यकारणाने त्यांनी गरीब कुटुंबातील मुलींची यादी दिली व आपल्या स्माइलिंग स्टोन फाउंडेशन मधून मदत करावी,अशी…