साईमत, प्रतिनिधी, जळगाव पिंप्राळा येथे बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मंगळवारी दिवसभरात ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टीकरून पूजन केले. बँन्ड व डि. जेच्या तालावर वराड फाट्यापासून ते पिंप्राळ्यापर्यंत शिवरायांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली होती. दुपारी 12 वाजेपासून मिरवणुकीला सुरुवात झाली असून रात्री 9 वाजेला पुतळा पिंप्राळ्यात दाखल झाला होता. वराड फाट्या जवळील श्री राम फ्रुटर्सच्या गोडावूनपासून मंगळवारी दुपारी 12 वाजता शिवरायांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील व श्री राम फ्रुटर्सचे मालक अविनाश काबरा यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन झाले. त्यानंतर पाळधी येथील साईबाबा मंदिरासमोर पाळधी ग्रामस्थांकडून शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तेथून पुढे आल्यानंतर जैन उद्योग समुहातर्फे स्वागत करण्यात…
Author: Saimat
साईमत, प्रतिनिधी, जळगाव शहरातील का. ऊ. कोल्हे विद्यालयात आज दुपारी तीन दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून त्वरित कारवाई करीत एका दहशवाद्याला ठार केले. तर दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडल्याची कारवाई केली. यावेळी गोळीबार झाला. या अचानक झालेल्या चकमकीमुळे विद्यालयात विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र, हे पोलिसांचे मॉक ड्रिल असल्याचे समजताच सर्वानी सुटकेचा निःश्वास सोडला. का. ऊ. कोल्हे शाळेत मंगळवारी दुपारी 12 वाजून 10 मिनिटाला तीन दहशतवादी घुसले. त्यांनी थेट आपला मोर्चा मुख्याध्यापिकांच्या दालनाकडे वळवला. यावेळी त्यांनी मुख्याध्यापिका गोसावी यांना ओलीस ठेवले. शाळेत दहशतवादी घुसल्याच्या घटनेमुळे शाळेत खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस…
साईमत, मुंबई ः प्रतिनिधी आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ोकर हे पुढील आठवड्यात सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे आता आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होईल. ठाकरे गटाच्या १४ आमदारांपासून सुनावणीला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान मिळालेल्या एका खात्रीलायक माहितीनुसार दररोज एका आमदाराची सुनावणी घेतली जाणार आहे. ठाकरे गटाच्या आमदारांनी आपले उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ोकर यांच्याकडे सुरूवातीला सादर केले. त्यामुळे आधी त्यांची सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष प्रत्येक आमदाराचे म्हणणे ऐकूण घेणार आहेत. शिंदेच्या आमदारांना मुदतवाढ मुख्यमंत्री एकनाथ िंशदे यांच्या शिवसेनेच्या ४० आमदारांना अपात्रेसंदर्भात उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ोकर यांनी दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे. यासंदर्भात…
साईमत, पुणे : प्रतिनिधी कै विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ सनीज वर्ल्ड येथे आयोजित केलेल्या ५७ व्या राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना अतिशय अटीतटीचा झाला. तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत मुंबईच्या महम्मद घुफ्रानने पुण्याच्या रहिम खानला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत १५-२५, २५-१२, २३-१६ असे हरवून अंतिम विजेतेपद पटकाविले तर महिलांच्या एकेरीत अंतिम फेरीत मुंबईच्या अंबिका हरिथने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरला १५-१३, ०-२५, २५-५ असे तीन सेटमध्ये पराभूत करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ठाण्याच्या झैद अहमदने मुंबईच्या प्रफुल मोरेवर २३-१७, २१-६ अशी मात केली. तर महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या काजल कुमारीने मुंबईच्या सिमरन शिंदेंवर…
साईमत, चेन्नई : वृत्तसंस्था कमालीच्या व्ोगवान झालेल्या सामन्यातील अखेरच्या सत्रात प्रतिस्पर्धी दक्षिण कोरियाचा प्रतिकार मोडून काढत भारताने सोमवारी आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत ३-२ असा विजय मिळवून उपांत्य फेरीतील प्रव्ोशावर शिक्कामोर्तब केले. भारत आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांत अपराजित राहिला असून, तीन विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह १० गुणांनी गुणतालिकेत आघाडीचे स्थान मिळवले आहे. भारताचा अखेरचा सामना बुधवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. अन्य एका सामन्यात मलेशियाने जपानचा ३-१ असा पराभव करून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. कोरियाविरुद्ध सहाव्याच मिनिटाला निलकांत शर्माने मैदानी गोल करून भारताला आघाडीवर नेले. या पहिल्याच सत्रात किम सुंगह्युनने कोरियाला बरोबरी करून दिली. कोरियाला यानंतर गोलसाठी ५८व्या…
साईमत, मुंबई ः प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. शर्लिन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. मात्र, सध्या शर्लिन आपल्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. शर्लिनने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे मात्र, यासाठी तिने एक अटही ठेवली आहे. शर्लिनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शर्लिनला पैपराजींनी राहुल गांधींबरोबर लग्न करशील का? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देत शर्लिन म्हणाली, हो मी राहुल गांधींशी लग्न करु शकते पण लग्नानंतर मी माझे अडनाव बदलणार नाही.शर्लिनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार…
साईमत, नवीदिल्ली ः वृत्तसंस्था शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्याकरता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीवरून राजकारणातून अनेक तर्क वितर्क लढवले जात असताना संजय राऊतांनी याबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. आज ते दिल्लीत प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले की, ते दोघे भाऊ आहेत. दोन भाऊ एकमेकांना कधीही भेटू शकतात, चर्चा करू शकतात. यामध्ये तिसऱ्या माणसाला पडण्याची गरज नाही. मी दोघांनाही ओळखतो, दोघांशीही माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत पण राजकीय विषय येतो, तेव्हा मी मनापासून माझे पूर्ण कुटूंब आणि सहकारी कायम बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव…
साईमत यावल प्रतिनिधी गोंडगावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याच्या निषेधार्थ यावल शहरातील सर्वधर्मीय व सर्वपक्षिय मुक मोर्चा काढण्यात आला. अटकेतील संशयित आरोपीला न्यायालयाने कठोरात कठोर कारवाई करावी अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावल येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसर ते यावल तहसील कार्यालयापर्यंत मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सर्वधर्मीय व सर्वपक्षीय मुकमोर्चा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, पुरवठा निरिक्षण अधिकारी अर्चना भगत यांच्या उपस्थितीत चिमुकल्या मुलींच्याहस्ते मागण्यांचे निवेदन देण्यात आले. असंख्य नागरीकांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन देण्यात आले. तहसीलच्या आवारात जमलेल्या सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नागरीक मोर्चात सहभागी लहान…
साईमत, जळगाव ः प्रतिनिधी एक आई म्हणून मला विचाराल तर मी नक्की हे सांगेन की, अशा नराधमांना भर चौकात फाशी द्यायला पाहिजे, असे कृत्य त्याने केले आहे. मात्र कायद्याच्या चौकटीत राहून त्याला फाशीची शिक्षा मिळेल, असा विश्वास भाजप महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे. भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे एका आठ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी पीडित मुलीच्या परिवाराची मंगळवारी सांत्वनपर भेट घेतली. त्यांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन मुलीच्या आरोपीस कठोर शिक्षा केली जाईल, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडले जाणार नाही, असे आश्वासन…
साईमत, मुंबई ः प्रतिनिधी गेली काही दिवस कोरोनाचे नाव ऐकू येत नसताना राज्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचे 109 रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. जुलैच्या शेवटापर्यंत राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या70 इतकी होती. पण 6 ऑगस्टला नोंदवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 115 इतकी होती. तर आज नोंदवण्यात आलेल्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 109 इतकी आहे.