Author: Saimat

साईमत, जळगाव ः प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अशात पुढील सहा दिवस तरी राज्यात पावसाची शक्यता नाही. त्यानंतर मात्र, राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. राज्यात १६ ते ३० ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस कोसळणार आहे. त्यानंतर सप्टेंबर व ऑक्टोबरमध्येही जोरदार पाऊस पडेल. राव्ोर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. याव्ोळी जळगाव जिल्ह्यात ११ व १२ ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाजही त्यांनी वर्तवला. अडीच महिने पावसाचे पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना यावेळी हवामाना संदर्भात मार्गदर्शन केले. पुढील अडीच महिने…

Read More

साईमत, धुळे ः प्रतिनिधी शरद पवार गटाचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपप्रदेश अध्यक्ष, माजी आमदार अनिल गोटे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे आज जाहिर केले. इतकेच नाही तर आपण कोणत्याच पक्षात जाणार नसल्याचे अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे. अनिल गोटे हे अजित पवार यांना पािंठबा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी अनिल गोटे यांनी आपल्या समर्थकांची बैठक बोलावली होती. पक्षाच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सोपविला असून सध्यातरी कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे. धुळ्यात पत्रकार परिषद घेऊन गोटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माजी आमदार अनिल गोटे यांनी पक्षांतर्गत…

Read More

साईमत, मुंबई ः प्रतिनिधी ज्येष्ठ विचारवंत, लेखक हरी नरके यांचे निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. हरी नरके यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी अचानक त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. समता परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे.  हरी रामचंद्र नरके यांची लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर अशी बहुआयामी ओळख होती. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. हा आयोग महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या गटात एखाद्या जातीचा…

Read More

साईमत, जळगाव ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना-भाजप युती तोडण्यासंदर्भात केलेले विधान असत्य आहे. पंतप्रधान मोदी खोटे बोलत आहे, युती तोडण्याचा निर्णय भाजपने एकमुखाने घेतला होता. तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस होते. खरेतर त्यांनी ही घोषणा करायला हवी होती. मात्र, तेव्हा ही जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आणि मी स्व:त उद्धव ठाकरेंना फोन करुन आपली युती आजपासून तुटली असे सांगितले होते.असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे पुढे म्हणाले की, २०१४ ला शिवसेनेने युती तोडली आम्ही स्वत:हून युती तोडली नाही, हे संपूर्ण असत्य आहे. भाजप म्हणून प्रत्येकाने तो निर्णय एकमुखाने घेतला होता. काय म्हणाले पंतप्रधान ?…

Read More

साईमत प्रतिनिधी जळगाव  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाच्या सांगता कार्यक्रमाची आजपासून जिल्ह्यात ‌‘माझी माती माझा देश‌’ या उपक्रमात पंच प्रण प्रतिज्ञा घेऊन सुरूवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हातात माती घेऊन पंच प्रण प्रतिज्ञा घेतली. यावेळी जळगाव उपविभागीय अधिकारी महेश सुधलकर, तहसीलदार पंकज लोखंडे, जितेंद्र कुंवर, विजय बनसोडे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मी अशी शपथ घेतली आहे की, भारताला विकसित देश बनवायचे आहे तसेच 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्या समृध्द वारसाचा अभिमान बाळगायचा आहे. एकता…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव पिंप्राळा येथे बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मंगळवारी दिवसभरात ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टीकरून पूजन केले. बँन्ड व डि. जेच्या तालावर वराड फाट्यापासून ते पिंप्राळ्यापर्यंत शिवरायांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली होती. दुपारी 12 वाजेपासून मिरवणुकीला सुरुवात झाली असून रात्री 9 वाजेला पुतळा पिंप्राळ्यात दाखल झाला होता. वराड फाट्या जवळील श्री राम फ्रुटर्सच्या गोडावूनपासून मंगळवारी दुपारी 12 वाजता शिवरायांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील व श्री राम फ्रुटर्सचे मालक अविनाश काबरा यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन झाले. त्यानंतर पाळधी येथील साईबाबा मंदिरासमोर पाळधी ग्रामस्थांकडून शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तेथून पुढे आल्यानंतर जैन उद्योग समुहातर्फे स्वागत करण्यात…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव शहरातील का. ऊ. कोल्हे विद्यालयात आज दुपारी तीन दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून त्वरित कारवाई करीत एका दहशवाद्याला ठार केले. तर दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडल्याची कारवाई केली. यावेळी गोळीबार झाला. या अचानक झालेल्या चकमकीमुळे विद्यालयात विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र, हे पोलिसांचे मॉक ड्रिल असल्याचे समजताच सर्वानी सुटकेचा निःश्वास सोडला. का. ऊ. कोल्हे शाळेत मंगळवारी दुपारी 12 वाजून 10 मिनिटाला तीन दहशतवादी घुसले. त्यांनी थेट आपला मोर्चा मुख्याध्यापिकांच्या दालनाकडे वळवला. यावेळी त्यांनी मुख्याध्यापिका गोसावी यांना ओलीस ठेवले. शाळेत दहशतवादी घुसल्याच्या घटनेमुळे शाळेत खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस…

Read More

साईमत, मुंबई ः प्रतिनिधी आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ोकर हे पुढील आठवड्यात सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे आता आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होईल. ठाकरे गटाच्या १४ आमदारांपासून सुनावणीला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान मिळालेल्या एका खात्रीलायक माहितीनुसार दररोज एका आमदाराची सुनावणी घेतली जाणार आहे. ठाकरे गटाच्या आमदारांनी आपले उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ोकर यांच्याकडे सुरूवातीला सादर केले. त्यामुळे आधी त्यांची सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष प्रत्येक आमदाराचे म्हणणे ऐकूण घेणार आहेत. शिंदेच्या आमदारांना मुदतवाढ मुख्यमंत्री एकनाथ िंशदे यांच्या शिवसेनेच्या ४० आमदारांना अपात्रेसंदर्भात उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ोकर यांनी दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे. यासंदर्भात…

Read More

साईमत, पुणे : प्रतिनिधी कै विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ सनीज वर्ल्ड येथे आयोजित केलेल्या ५७ व्या राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना अतिशय अटीतटीचा झाला. तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत मुंबईच्या महम्मद घुफ्रानने पुण्याच्या रहिम खानला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत १५-२५, २५-१२, २३-१६ असे हरवून अंतिम विजेतेपद पटकाविले तर महिलांच्या एकेरीत अंतिम फेरीत मुंबईच्या अंबिका हरिथने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरला १५-१३, ०-२५, २५-५ असे तीन सेटमध्ये पराभूत करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ठाण्याच्या झैद अहमदने मुंबईच्या प्रफुल मोरेवर २३-१७, २१-६ अशी मात केली. तर महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या काजल कुमारीने मुंबईच्या सिमरन शिंदेंवर…

Read More

साईमत, चेन्नई : वृत्तसंस्था कमालीच्या व्ोगवान झालेल्या सामन्यातील अखेरच्या सत्रात प्रतिस्पर्धी दक्षिण कोरियाचा प्रतिकार मोडून काढत भारताने सोमवारी आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत ३-२ असा विजय मिळवून उपांत्य फेरीतील प्रव्ोशावर शिक्कामोर्तब केले. भारत आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांत अपराजित राहिला असून, तीन विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह १० गुणांनी गुणतालिकेत आघाडीचे स्थान मिळवले आहे. भारताचा अखेरचा सामना बुधवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. अन्य एका सामन्यात मलेशियाने जपानचा ३-१ असा पराभव करून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. कोरियाविरुद्ध सहाव्याच मिनिटाला निलकांत शर्माने मैदानी गोल करून भारताला आघाडीवर नेले. या पहिल्याच सत्रात किम सुंगह्युनने कोरियाला बरोबरी करून दिली. कोरियाला यानंतर गोलसाठी ५८व्या…

Read More