साईमत जळगाव प्रतिनिधी सत्संग जीवनाचा आधार आहे. नामस्मरण झाल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही. जितकी तुम्ही पूजा-अर्चा कराल तितके तुमचे जीवन उजळ होईल. शिवशंभू प्रभू हा एक ब्रँडेड साबण आहे, जो आतून आणि बाहेरून सर्व घाण आणि डाग धुतो. नामस्मरणासाठी म्हातारपणाची वाट पाहू नका. तारुण्यात देवाचे स्मरण करत राहा, आयुष्य पुढे जाईल. कोणाकडे कितीही संपत्ती असली तरी शिवकथा ऐकूनच आत्मिक शांती मिळते. ईश्वरप्राप्तीसाठी जीवनात सर्व सोयी असणे आवश्यक नाही, तर सत्कर्म आणि ईश्वरसेवा हेच आवश्यक आहे. असे महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजी (बापू) यांनी शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून शिवभक्तांना सांगितले. महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजींचे स्वागत दीपक साखरे यांनी केले तर शहराच्या प्रथम नागरिक तथा…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी युवा सेना जळगाव महानगर तर्फे यावर्षी निष्ठा दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडीप्रसंगी देण्यात येणाऱ्या ट्रॉफी चे अनावरण युवा सेना प्रमुख तथा राज्याचे माजी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच मुंबईत करण्यात आले. येत्या सात सप्टेंबर रोजी होणाऱ्या दहीहंडी महोत्सवाचे आयोजन यावर्षी युवा सेना जळगाव महानगर तर्फे करण्यात येत आहे. याची तयारी अंतिम टप्प्यात असून निष्ठा दहीहंडी ही मोठ्या दिमाखात साजरा करण्याची तयारी आयोजक युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी उपजिल्हाप्रमुख विशाल वाणी, महानगर समन्वयक महेश ठाकूर, महानगर प्रमुख अमोल मोरे, यश सपकाळे यांनी केली आहे. निष्ठा दहीहंडीचे हे पहिले वर्ष असून यात शिवगंध…
साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनात राज्यभरात जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, शहरात शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शाम तायडे यांच्या नेतृत्वात रविवारी ३ सप्टेंबर रोजी खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारकापासून जनसंवाद यात्रेची सुरुवात करण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारकापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, भोईटे नगर, रथ चौक, सोनार गल्ली, सुभाष चौक, घाणेकर चौक, टॉवर चौक, मार्गे जात कॉर्नर सभा घेऊन काँग्रेस भवन येथे यात्रेचा समारोप करण्यात आला. प्रसंगी भाजपा सरकारची कारकीर्द व जनतेचे होणारे हाल याचे लेखा जोखा असलेली माहिती असलेलीपत्रके वाटण्यात आले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे, उपाध्यक्ष विजय वाणी,…
साईमत जळगाव प्रतिनिधी भारतीय जैन संघटना ही खुप नियोजन करून प्रश्न सोडविते. आपल्याजवळ असलेला मनुष्यबळ, संसाधने याचा विचार करून ते पुढे जातात , देशाच्या विकासात या संघटनेचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. ते भारतीय जैन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात रविवारी ३ सप्टेंबर रोजी दुसरे राज्यस्तरीय सभेच्या आयोजन प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा अधिकारी पुढे म्हणाले, कोरोना काळात कोविड मुक्त गाव साठी जैन संघटनेचे योगदान मोठे आहे. १ हजार ३८५ ग्रामपंचायत होती. पैकी ३८ ग्राम पंचायतीत एक ही कोविड पेशंट मिळाला नाही. तसेच ६०० ग्रामपंचायतीत केवळ १० रूग्ण होते. त्यामुळे ऊर्जा निर्माण झाली.…
साईमत जळगाव प्रतिनिधी होय, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असून मी येणारी निवडणूक धनुष्यबाणावरच लढणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते , पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. ते धरणगाव तालुक्यातील पिंपळे गावातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन प्रसंगी आयोजित जाहीर सभेत बोलत होते. पिंपळे खु. ते धरणगाव हा मधला उर्वरित रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार असून पिंपळे व परिसरातील गावाच्या मागणीनुसार निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगून गाव विकासासाठी पिंपळे गावाची एकजूट कौतुकास्पद आहे. पिंपळेकरांनी कायमच माझ्यावर निवडणुकीतही भरभरून प्रेम केलं आहे. तुमचे आशीर्वाद आयुष्यभर विसरू शकणार नाही, अशा भावना ना. पाटील यांनी व्यक्त केल्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, कृ.…
साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल पूर्व प्राथमिक विभागात शनिवार दि .२सप्टेंबर रोजी नर्सरी ची सहल भाऊंचे उद्यान व ज्युनिअर व सीनिअर केजी ची सहल कुसुंबा येथील गो शाळेत आयोजित करण्यात आली. गोशाळा तील सहलीत विद्यार्थ्यांना सुरुवातीस गो शाळेमधील कबूतर खाना, वेगवेगळ्या जातीच्या गाई दाखवण्यात आल्या . गाई- म्हशीच्या दुधापासून दही, ताक,लोणी,तूप कसे बनते याची माहिती देण्यात आली. याठिकाणी उंट देखील बघावयास मिळाल्याने विद्यार्थी खुश झाले. परिसर भटकंती झाल्यानंतर विद्यार्थी निसर्गरम्य परिसरात मनसोक्त खेळले. नर्सरीच्या सहलीत”भाऊंचे उद्यान” येथे सुरवातीला विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रथम उद्यानातील निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हटली. विद्यार्थ्यांना उद्यानातील म्युझियम…
साईमत जळगाव प्रतिनिधी दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेचा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा रविवार दि. 3 सप्टेंबर रोजी यशवंतराव पाटील मुक्तांगण सभागृहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना बँकेचे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, ‘गुरुजी तु मला आवडला’ हे पुस्तक असा संच प्रत्येक विद्यार्थ्यास भेट देण्यात आला. 168 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, बँके तर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या गुणवंत विद्यार्थी सत्कारासाठी सर्व विद्यार्थी आतुर असतात, कारण त्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासाला व मेहनतीला कौतुकाची थाप मिळते. बँक गेल्या जवळपास 30 वर्षांपासून गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करत आहे. बँकेचे…
साईमत जळगाव प्रतिनिधी विचार, भावना आणि कृती ह्या एकमेकांशी बांधील आहेत आणि म्हणूनच मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ह्या तिघांचा योग्य संगम साधणे गरजेचे आहे. सतर्क राहून भावना ताब्यात ठेवता आल्या पाहिजेत. आपण काय करीत आहोत? त्याचा परिणाम काय होणार आहे? ह्याचा सतत विचार केला पाहिजे. चांगले विचार ऐकणे, चांगली पुस्तके वाचणे, रोजच्या दिवसाचे योग्य ते व्यवस्थापन करणे आणि विश्वातील अदम्य अश्या शक्तीवर श्रद्धा ठेवणे हे भावनिक व्यवस्थापनासाठी आणि एकूणच मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी महत्वाचे आहे, असा महत्वाचा सल्ला क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कॉऊन्सेलर डॉ. प्रतिभा हरनखेडकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. के. सी. ई. सोसायटीच्या मॅनॅजमेण्ट अँड रिसर्च जळगावच्या ‘बदलत्या युगातील मानसिक आरोग्य’…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट सदस्य व नेत्ररोग तज्ञ डॉ. दर्शना पंकज शाह यांची रोटरी मेडिकल मिशन अंतर्गत काश्मीर येथे होणाऱ्या मेगा सर्जिकल प्रोजेक्टसाठी निवड झाली आहे. काश्मीरचे राज्यपाल लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या पुढाकाराने काश्मीर सरकार व रोटरी यांच्या संयुक्त विद्यमाने या सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहे. 3 ते 13 सप्टेंबर असे दहा दिवस हे शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गतवर्षी नऊ दिवसात 2499 शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या होत्या. डॉ. दर्शना शाह यांचे पती रोटरी जळगाव इलाईटचे माजी अध्यक्ष डॉ. पंकज शाह यांनी देखील रोटरी मेडिकल मिशन मध्ये विदेशात जाऊन मोफत शस्त्रक्रिया करीत…
साईमत जळगाव प्रतिनिधी राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्याने कोरडया दुष्काळा सारखी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी पाऊस पडावा म्हणून सर्व शक्तिमान, निसर्ग चालवणारी शक्ती म्हणजे एकमेव ईश्वर – अल्लाह यांना साकडे घालण्यासाठी जळगाव शहरातील हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन नमाज ए ईस्तेस्का अदा करून दुआ केली. मौलाना उस्मान कासमी यांनी खास दुवा करत अल्लाह ला साकडे घातले की, आमच्याकडून झालेल्या चुका माफ कर, आम्ही कोणाचेही हक्कावर गदा आणणार नाही, एकमेका सहाय्य करू, कोणाची चेष्टा करणार नाही परंतु तू पाऊस दे अशी प्रार्थना करीत असताना उपस्थित हजारोच्या संख्येने उपस्थित समुदायाने आपले दोघी हात उलटे करून दुवा मागितली. उलटे हात…