Author: Saimat

साईमत बोदवड प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये मराठा आरक्षण मागणीच्या उपोषण करणाऱ्या मराठा समाजाचे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष हल्ला केल्याच्या निषेधार्थ सोमवारी ४ सप्टेंबर रोजी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती पासुन मराठा समाजाचा मुक मोर्चा काढत मलकापूर चौफुलीवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे आज राज्याच्या विविध भागांमध्ये संतप्त पडसाद उमटले. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रस्त्यांवर उतरून आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. जालना आणि धाराशिवमध्ये बंदला हिंसक वळण लागले. याला जबाबदार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. त्यामुळे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शिवमहापुराण कथेच्या शेवटच्या दिवशी माता गिरिजा यांनी वटवृक्षाची पूजा कशी केली, प्रभू पुरुषोत्तम श्री रामचंद्र यांना भगवान शिव शंकरांनी कसे दर्शन देऊन प्रणाम केला, गुरु शुक्राचार्य यांची उत्पत्ती आणि उद्धार कसा झाला, तसेच देवी सती यांच्या मनातील संशय कसा दूर झाला आणि रूद्राक्ष महिमा काय, रूद्राक्ष कसा ओळखणार, योग्य धारण केल्याने त्याचे फळ कसे मिळते, या सर्वविषयी महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजी (बापू) शास्त्री यांनी कथेत विषद केले. महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजींचे स्वागत ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी तर स्वरूप लुंकड व डी.डी.बच्छाव सर यांनी सपत्निक शिवमहापुराण ग्रंथाचे पूजन केले. पाचव्या दिवसाच्या कथाप्रारंभावेळी कथामंचावर माजी विधानसभा सदस्य स्मिताताई…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज जिल्हा दौऱ्यावर येत असून सागर पार्क मैदानावर त्यांची भव्य जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेच्या तयारीची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथराव खडसे,माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणीताई खडसे, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांची जळगावातील सागर पार्क मैदानावर भव्य अशी जाहीर सभा होणार आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कडून जोरदार तयारी केली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई संस्थेच्या इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्चच्या एमबीए आणि एमसीएच्या विद्यार्थ्यांसाठी आज आयबीएम ह्या जागतिक कंपनीच्यावतीने तीन तासांचा जॉब रेडीनेस ट्रेनिंग वर्कशॉप घेण्यात आला. आयबीएमच्या सीएसआर बोक्स तर्फे अहमदाबादच्या तन्वी शाह यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. या ट्रेनिंग वर्कशॉपला एमबीए आणि एमसीएचे एकूण २११ विद्यार्थी उपस्थित होते. वर्कशॉपमध्ये तन्वी शाह यांनी विद्याथ्यांना रेज्युमे काय असतो, एचआर किती वेळ एका रेज्युमेला देतात, तो कसा निवडला जातो, त्याला बनविण्याची योग पद्धत कशी असते, त्यानंतर इंटरव्यू मध्ये कसले प्रश्न विचारले जातात, त्यांची उत्तरे कश्याप्रकारे द्यावीत, परिधान कसा असावा, बॉडी लैन्ग्वेज कशी असावी, आत्मविश्वासाने उत्तर कसे द्यावे, स्वतःच्या क्षमतानुसार करिअर कसा निवडावा…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. ब.गो.शानभाग विद्यालय, सावखेडा येथे संस्कृतदिना निमित्त इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृतसप्ताह पाळण्यात आला. त्यानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत गप्पांचा कार्यक्रम चागांलाच रंगला होता. या संस्कृतसप्ताहासाठी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या संस्कृत गप्पांच्या कार्यक्रमात प्राध्यापक डॉ.अखिलेश शर्मा यांच्याशी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी अस्खलित संस्कृत भाषेत संवाद साधला. यात शैक्षणिक, राजकीय, चंद्रयान, आदित्य एल., संस्कृत वाङ्मय, संस्कृत काव्य, व्याकरण अश्या वेगवेगळ्या विषयावर सरांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तसेच संस्कृत विषयाचे ज्ञान वाढविण्यासाठी आणि गुणवत्तेसाठी कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा असतात यावर सविस्तर अशी चर्चा करण्यात आली. या चर्चेत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची सरांनी त्यांच्या दिलखुलास शैलीत समर्पक…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील योग मार्गदर्शन केंद्राच्या सहायक प्राध्यापिका डॉ. लीना चौधरी यांना मुंबई विद्यापीठाने योगशास्त्रात पीएच.डी प्रदान केली आहे. डॉ. लीना चौधरी यांनी डॉ. तबस्सुम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली “इफेक्ट ऑफ योगिक प्रॅक्टीसेस अॅड नस्य ऑन मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स अमंग अॅडालसन्स गर्ल्स : आयुर्वेद अॅण्ड सायकॉलॉजी अॅप्रोच” या विषयावर प्रबंध सादर केला. मौखिक परीक्षेनंतर त्यांना पीएच.डी प्रदान करण्यात आली. त्याबद्दल कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, योग मार्गदर्शन केंद्रप्रमुख व विद्यापीठ उपअभियंता इंजि. राजेश पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य नंदकुमार बेंडाळे तसेच विभागातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी मुंबई येथे उपचार घेतअसतांना वयाच्या 89 व्या वर्षी गुलजार आजमी यांचे देहांत झाले असून त्यांना जमियत उलमा जळगाव तर्फे श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी मुफ्ती हारून नदवी, मुफ्ती अतिकउर रहमान, करीम सालार, फारुख शेख यांनी गुलजार आजमी यांच्या कारकिर्दीची माहिती विशद केली. यावेळी मुफ्ती हारून नदवी, मुक्ती अफजल, हाफिज रहीम पटेल, कारी पटेल, कारी मुस्ताक, मौलाना अब्दुल रहमान, ईकराचे अध्यक्ष करीम सालार, मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख आदींची उपस्थिती होती.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील रस्त्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी शिवकॉलनी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले. शहरातील रस्त्यांसह इतर कामांना तात्काळ गती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील आकाशवाणी चौक, इच्छादेव चौक आणि अजिंठा चौकात याठिकाणी प्रस्तावित उड्डाणपुल मंजूर झालेले असतांना सुध्दा उड्डाण पुल होत नाही. यामुळे महामार्गावर निष्पाप नागरीकांचा अपघातात बळी जात आहे. याबाबत मनसेने वेळोवळी निदर्शने, आंदोलन, मोर्चा आणि उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतू प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाप्रशासन, महापालिका प्रशासन, आमदार, खासदारांसह तिन मंत्र्यांचे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी सारांश फाऊंडेशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्त्यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून आ. राजुमामा भोळे, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकूंद सपकाळे , छावा मराठा युवा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अमोल कोल्हे, सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा निलू इंगळे , उपाध्यक्षा इंदू मोरे , संजय इंगळे आदीउपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते छत्रपती शिवाजी , राजर्षी शाहू , महात्मा फुले, सावित्रीबाई फुले , बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलू इंगळे…

Read More

        स्वयंंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरच्या किंमतीत दोनशे रुपयांची कपात नुकतीच जाहीर करण्यात आली.त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरची किंमत सरासरी ९०५ रुपये किंवा त्याच्या आसपास झाली.उज्ज्वला योजनेत सिलिंडरमागे अनुदान असतेच त्यात वाढ झाल्याने आता या योजनेतील सिलिंडरसाठी साधारणपणे ७०३ रुपये मोजावे लागतील. ही घोषणा करण्यासाठी मोदी सरकारने मुहूर्त चतुराईने निवडला. देशातील कोट्यवधी भगिनींना आपली ही रक्षा बंधनाची भेट आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जाहीर केले. इतरांना नावे ठेवण्याबरोबरच, योजनांना नावे देणे, घोषणा करणे यात संघ व परिवार कुशल आहे. मोदी हे तर प्रचारकच आहेत. लोकसभेत मांडल्या गेलेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेस दिलेले प्रदीर्घ उत्तर, नंतर स्वातंत्र्यदिनी केलेले दीर्घ…

Read More