पाटणा ः अभिनेते प्रकाश राज यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत जेवढं नाव कमावलं आहे तेवढंच नाव त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही कमावलं आहे. सिंघम मधल्या जयकांत शिक्रेमुळे तर ते घराघरात पोहचले. त्यांच्या नकारात्मक भूमिका विशेष गाजल्या आहेत. त्यांच्या भूमिका जशा चर्चेत असतात तसेच त्यांचे ट्विट्सही चर्चेत असतात. चांद्रयान ३ च्या लँडिंगपूर्वी प्रकाश राज यांनी इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे नेटकरी त्यांच्यावर चांगलेच संतापले आहेत. भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी म्हणून देशभरातले खगोलप्रेमी हे आस लावून बसले आहेत तसेच अनेक लोकांकडून प्रार्थनाही केली जाते आहे.अशात प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन इस्रोचे माजी प्रमुख के सिवन हे चहा ओतत असल्याचे…
Author: saimat
मुंबई ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच केलेल्या भाषणातून मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक आणि कोकणातील रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर आता मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेकडून रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘जागर यात्रा’ काढली जाणार आहे. या ‘जागर यात्रे’वरून शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचले आहे. मनसेच्या ‘जागर यात्रे’ दरम्यान रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली तर मनसेचे एकाचे दोन आमदार होतील, असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला आहे. जागर यात्रेतून राष्ट्राच्या संपत्तीचे नुकसान नको, असेही त्यांनी म्हटले आहे. सय्यद यांनी ट्वीट करत ही टोलेबाजी केली आहे. दीपाली सय्यद ट्वीटमध्ये म्हणाल्या, “मनसेच्या ‘जागर यात्रे’ने…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे एक विचित्र घटना घडली आहे. आपली बायको माहेरी गेल्यानंतर आपल्या आई-वडिलांनीच त्याला फुस दिल्याच्या संशयातून सख्ख्या मुलाने त्यांची घर जाळून टाकले आहे. ही घटना मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात घडली आहे. सविस्तर असे की, या घटनेतील संशयित आरोपी समाधान भीमराव घोडकी याची बायको अलीकडेच तिच्या माहेरी गेली होती. आपले आई-वडील यांच्यामुळेच बायको माहेरी गेल्याचा संशय त्याच्या मनात बळावला. त्यावरून त्याने आई-वडिलांना धमकावलेही होते. त्यानंतर बापावरती संशय घेत दगड घेऊन तुम्हाला मारतो, असे धमकावत त्याने सर्व घरातील वस्तू जाळून टाकल्या. त्यात किमान आठ हजार रुपये किमतीचे संसार उपयोगी, कपडे, धान्य, गादी, पलंग आणि घरातील…
मलकापूर : प्रतिनिधी येथील सेठ बी.जे.संचेती लोकसेवा ट्रस्टद्वारा आणि साधू वासवाणी, पुणे यांच्या सहकार्याने रविवारी, २० ऑगस्ट रोजी मलकापूर येथील महावीर भवन येथे मोफत कृत्रीम हात, पाय शिबिराचे (आर्टिफिशियल लिम्ब कॅम्प) आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अमरसेठ संचेती होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.साहेबराव मोरे, भा.रा.काँ.चे शहराध्यक्ष राजूभाऊ पाटील, डॉ.विजय डागा, भा.रा.काँ.चे जिल्हा सचिव शिरीष डोरले, मनसेचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, हनुमान सेना प्रमुख अमोल टप, संजय श्रीमाळ, मेजर नामदेवराव पाटील, दिलीप गोळीवाले, अशोक संचेती, अमित संचेती, सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष पुरूषोत्तम राठी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी साधू वासवाणी यांच्या…
मलकापूर : प्रतिनिधी धाड येथील जिल्हा परिषदेच्या हायस्कूलला २०१३-१६ मध्ये खोटी व बनावटी माहिती देऊन दोन वेळा रजा प्रवास सवलतीचा लाभ घेऊन संगनमताने शासनाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भ्रष्ट शिक्षकांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग विषयक व फौजदारी कार्यवाही करावी, अन्यथा १५ ऑगस्टपासून बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर लक्ष्मण इंगळे (रा. बेलाड) यांनी निवेदन दिले होते. प्रभाकर इंगळे यांनी दिलेल्या निवेदन आणि दिलेल्या उपोषणाच्या इशाऱ्याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात याप्रकरणी १४ ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्यात आली. या दरम्यान जि.प. हायस्कूल धाड येथील २०१३-२०१६ मध्ये खोटी व बनावटी माहिती घेऊन दोन वेळा रजा…
यावल : प्रतिनिधी येथील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर शेखर पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्या आमरण उपोषणाचा रविवारी सातवा दिवस होता. उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असून उपोषणकर्त्यांनी औषधोपचार घेण्यास मात्र नकार दिला आहे. गटविकास अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि प्रशासनाच्या दिरंगाईने कळस गाठला आहे. त्यामुळे उपोषणकर्त्यांच्या जिवावर बेतले आहे. सविस्तर असे की, तालुक्यातील सावखेडासिम येथील ग्रामपंचायतमधील २०२० ते २०२२ या कालावधीत दरम्यान प्राप्त पंधराव्या वित्त आयोग निधीमध्ये ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांकडून झालेल्या अपहार संदर्भात तसेच ग्रामनिधी व पाणीपुरवठा निधी अंतर्गत बँकेत पैसे जमा न करता परस्पर खर्ची झाले असल्याची तक्रार करण्यात आली आहे. रावेर, यावल आ.शिरीष चौधरी, उपोषणकर्ते माजी पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांनी…
वरणगाव : प्रतिनिधी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्या आदेशान्वये जिल्ह्याभरात अवैधरित्या होत असलेल्या दारू विक्री विरोधात ‘वॉश आऊट’ मोहीम राबविली जात आहे. मात्र, या मोहिमेतंर्गत वरणगाव व परिसरात अवैधरित्या विक्री होणारी दारू केव्हा बंद होणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जळगाव जिल्ह्यात अवैधरित्या रासायनिक गावठी दारु विक्रेत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा दारू विक्रेत्यांमुळे नशेखोरांचेही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे समाजामध्ये अशांतता निर्माण होत आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत असल्याच्या कारणास्तव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षकांनी कायद्याच्या कठोर अंमल बजावणीसाठी…
फैजपूर, ता. यावल : वार्ताहर येथील प्रा. चेतन वसंत चौधरी यांना ‘कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरिंग’ शाखेत पी.एचडी. मिळाली. त्यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यापीठात “प्रतिमा प्रक्रिया वापरून विविध परिस्थितीमध्ये पृष्ठभाग दोष शोधणे” या विषयावर शोधनिबंध सादर केला. शोधनिबंध सादर करण्यासाठी डॉ. रवींद्र कुमार गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. डॉ. चेतन चौधरी हे व्ही.डी.चौधरी (सेवानिवृत शिक्षक आदर्श विद्यालय, दहिगाव) याचे चिरंजीव तर गिरीजा हॉस्पिटलचे डॉ. निलेश चौधरी (भुसावळ) यांचे लहान बंधू आहेत.
नवीदिल्ली ः मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे दर गगनाला भीडत आहेत. आता काही प्रमाणात दर उतरले आहेत मात्र मधल्या काळात टोमॅटोचा दर २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो इतका होता. त्यामुळे टोमॅटो खाणे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेर गेले होते. यावरून देशभर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. वाढत्या महागाईविरोधात आंदोलनेही झाली. दरम्यान, एका हिंदी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने टोमॅटोच्या वाढत्या दराबाबत प्रश्न विचारला असता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अजब प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा टोमॅटोचा दर २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो इतका झाला तेव्हा तुमच्या घरात यावर चर्चा होत होती का? असा प्रश्न विचारला असता स्मृती इराणी यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी टिव्ही पत्रकार सुधीर चौधरींना प्रतिप्रश्न…
मुंबई ः प्रतिनिधी ‘आई कुठे काय करते’ या छोट्या पडद्यावरील मालिकेच्या माध्यमांतून अभिनेत्री राधा सागर घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत राधाने ‘अंकिता’ हे पात्र साकारले होते. आता अभिनेत्री खऱ्या आयुष्यतही आई होणार आहे. तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. राधाने लग्नाच्या १० वर्षानंतर आई होण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. या वेळी राधाने गर्भधारणा, पती आणि कुटुंबाकडून मिळणारा पाठिंबा याबद्दल बरेच काही सांगितले. राधा सागर गरोदरपणाबद्दल सांगताना म्हणाली, सध्या माझ्या गरोदरपणाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आमच्या घरी नवा पाहुणा येण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवसापासून मी…