खुनातील आरोपी पकडला; १.१५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत साईमत /जळगाव / प्रतिनिधी खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत आरोपीला त्याच्या साथीदारासह जिल्हापेठ पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक करत मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरातील संभाव्य गुन्हेगारी कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून १५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल, ६० हजार रुपये किमतीची दोन गावठी पिस्तुले आणि ४० हजार रुपये किमतीच्या ८ तलवारी असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी धनंजय उर्फ धिरज दत्तू कोळी (वय २०, रा. पाळधी) हा जळगाव…
Author: saimat
भरदिवसा चौकात शाळकरी मुलीची छेडछाड आरोपीवर गुन्हा दाखल साईमत / चाळीसगाव / प्रतिनिधी शहरातील गजबजलेल्या नेताजी चौकात भररस्त्यावर एका अल्पवयीन शाळकरी मुलीची छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध विनयभंगासह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १५ वर्षीय पीडित मुलगी ही शहरातील एका नामांकित हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. मंगळवारी (दि. २४) दुपारी सुमारे १२:३० वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ती पायी आपल्या ओझर गावाकडे निघाली होती. दरम्यान, नेताजी चौकातील महादेव मंदिराजवळ ती पोहोचताच, तेथे आधीपासून दबा धरून बसलेल्या संशयिताने तिचा पाठलाग करत तिला गाठले. राजेंद्र…
मारहाण प्रकरणात आठ जणांविरुद्ध एफआयआर साईमत / भुसावळ / प्रतिनिधी तालुक्यातील साकरी गावात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर बेरकी मारहाण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील सुरेश तायडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २३ मार्च रोजी सकाळी सुमारे ९.३० ते १० वाजेच्या सुमारास साकरी गावातील खोकली माता मंदिरासमोर त्यांचा मुलगा हेमराज कार घेऊन आल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. यानंतर संशयित आरोपी प्रवीण जयराम बाविस्कर, दिनेश जयराम बाविस्कर, मोहन जयराम बाविस्कर, विकास कौतिक काकडे, सागर प्रभाकर सोनवणे, संजु आत्माराम तोंडे, माधुरी प्रवीण…
जिल्ह्यातील केटरिंग व्यावसायिकांनी जिल्हाधिकारींकडे निवेदन सादर केले साईमत / जळगाव / प्रतिनिधी – ऐन लग्नसराईच्या मुहूर्त काळात जळगाव जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने केटरिंग व्यवसाय गंभीर संकटात आहे. शहरातील १०० हून अधिक कॅटरिंग व्यावसायिकांनी याबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे निवेदन देऊन व्यवसायिक सिलेंडर पुरवठा नियमित करण्याची मागणी केली आहे. लग्नाची ऑर्डर रद्द, आर्थिक फटका केटरिंग व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांचा रोजगार धोक्यात आला आहे. रतन सारस्वत, अध्यक्ष, खान्देश केटरिंग असोसिएशन यांच्या माहितीनुसार, अनेक लग्नांच्या ऑर्डर घेतल्या असून सिलेंडर न मिळाल्याने त्या रद्द कराव्या लागत आहेत, ज्यामुळे व्यवसायाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. रोजगार आणि गावाकडे जाण्याची वेळ…
नागरिकांची मागणी प्रशासनाने तातडीने कचरा निर्मूलन केले पाहिजे साईमत / जळगाव / प्रतिनिधी शहरातून शिरसोलीकडे जाणारा मुख्य मार्ग आता ‘कचरा डेपो’मध्ये परिवर्तित झाल्याचे चित्र समोर आले आहे. श्रीकृष्ण लॉनपासून ते जुन्या जकात नाक्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ढिगारे टाकले गेले असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मेहरुण तलावाच्या निसर्गरम्य परिसरात स्थित हा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणामुळे सुरकुत्या व अडथळ्यांपासून मुक्त झाला असला, तरी सध्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे त्याचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट झाले आहे. या मार्गावर अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, जैन हिल्ससारख्या महत्त्वाच्या संस्था तसेच अनेक मंगल कार्यालये असल्याने सतत वर्दळ राहते. पाचोरा, चाळीसगाव तसेच नाशिक-पुण्याकडे जाण्यासाठीही हा मार्ग अत्यंत महत्वाचा आहे.…
रात्रीच्या डंपरवर कारवाई, ग्रामस्थांचे समाधान व्यक्त साईमत /शिरसोली / प्रतिनिधी – तालुक्यातील शिरसोली ते कुऱ्हाडदा रस्त्यावर रात्री बेफाम अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरविरोधात सोमवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने ठोस कारवाई केली. नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देत तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबवण्यात आली आहे. शिरसोली परिसरातील ग्रामस्थांनी रात्री वाळू माफियांचे डंपर बेफामपणे धावत असल्याने झालेल्या त्रासाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या वाहतुकीमुळे नुसती झोप खंडित होत नाही तर नदीतील वाळू उपशामुळे खड्डे पडत असून महसूलही बुडत असल्याचे ग्रामस्थांनी तक्रार केली होती. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या तक्रारी गंभीरपणे घेत तहसीलदारांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सोमवारी रात्री १० वाजता झुलेलाल वॉटर पार्कजवळ एका डंपरला शिरसोली…
नगरपालिकेच्या अग्निशमन दलामुळे आग आटोक्यात; मोठे नुकसान टळले साईमत / भुसावळ / प्रतिनिधी भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनसमोर रेल्वे रुळांच्या अगदी जवळ टाकण्यात आलेल्या कचऱ्याला अचानक आग लागल्याने आज परिसरात मोठी खळबळ उडाली. आग वेगाने पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, मात्र भुसावळ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मते, रेल्वे रुळांच्या जवळ मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्यामुळे हा भाग आधीपासूनच धोकादायक होता. आज लागलेल्या आगीने कचऱ्याला अधिक भडकवले. सुदैवाने त्या वेळी कोणतीही रेल्वे गाडी त्या मार्गावरून जात नव्हती, अन्यथा मोठा अपघात होऊ शकला असता. आग लागल्यानंतर परिसरात दाट धूर पसरल्याने रस्त्याने…
‘देवदूत’ ठरलेल्या ओमच्या शिक्षणाची जबाबदारी जैन इरिगेशनकडे साईमत / चोपडा / प्रतिनिधी अनेर नदीत बुडणाऱ्या चौघा अल्पवयीन मुलांचे प्राण वाचवणाऱ्या उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील (वय १४) या धाडसी मुलाच्या कार्याला समाजातून मोठी दाद मिळत आहे. ओमच्या या अतुलनीय धाडसाची दखल घेत जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनने त्याच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. चोपडा तालुक्यातील गणपूर येथील चार मुलं अनेर नदीत आंघोळीसाठी उतरली होती. मात्र त्यांना पोहता येत नसल्याने ते बुडू लागले. याचवेळी तेथून जात असलेल्या ओम पाटीलने क्षणाचाही विलंब न करता नदीतील डोहात उडी घेत चारही मुलांना सुरक्षित बाहेर काढले. स्वतःला…
३२ बॅनर हटवले आणि गाड्या जप्त रिंग रोड व आंबेडकर उद्यान परिसरात विशेष मोहीम साईमत / जळगाव / प्रतिनिधी – शहरातील रस्त्यांवर होणाऱ्या अतिक्रमणाविरोधात महापालिकेने सोमवारी (दि. २३ मार्च) मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. शहरातील विविध भागांत राबविलेल्या या विशेष मोहिमेत अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासोबतच बेकायदेशीर बॅनर काढण्यात आले, तर काही गाड्या आणि काऊंटरही जप्त करण्यात आले. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या वतीने ह्या कारवाईत रिंग रोड परिसर, आंबेडकर उद्यान परिसर, कन्या शाळा परिसर आणि मुलींची आयटीआय परिसर यांचा समावेश होता. या ठिकाणी रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या गाड्या आणि एक अनधिकृत काऊंटर जप्त करण्यात आला, ज्यामुळे वाहतुकीला होणारा अडथळा कमी झाला. याशिवाय, शहरात विविध…
६६ वर्षीय वृद्धाचा कासोदा नाक्यावर ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू, साईमत /एरंडोल / प्रतिनिधी रविवारी दुपारी कासोदा नाक्यावर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मंगेश शिवदास पाटील (रा. पाटीलवाडा, एरंडोल) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, एरंडोल पोलीस स्थानकात गुन्हा नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. २२ मार्च रोजी दुपारी पाटील हे आपल्या मोटारसायकलने (क्र. एम एच १९ डीएक्स १०९४) शेताकडे जात होते. जळगावकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर ट्रकने (क्र. डीडी ०१५ ९१०३) त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत पाटील यांना डोक्याला आणि हात-पायांना गंभीर दुखापत झाली, तसेच मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. घटनेनंतर स्थानिक नातेवाईक…