Author: saimat

फुलांची सजावट आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी शाळेचा परिसर शोभिवंत साईमत जळगाव प्रतिनिधी  बालविश्व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रामनवमीचा उत्सव गतिमान आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्दीष्ट विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजवणे तसेच भारतीय संस्कृतीची जाणीव निर्माण करणे होते. उत्सवाची सुरुवात प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन आणि विशेष प्रार्थना सभेने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी भक्तिगीत सादर करून संपूर्ण परिसर भक्तिमय केला. कार्यक्रमात पारंपरिक वेशभूषा स्पर्धा मुख्य आकर्षण ठरली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी रामायणातील विविध पात्रांची वेशभूषा साकारली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाळेच्या परिसराला फुलांची सजावट आणि आकर्षक रांगोळ्यांनी शोभा दिली गेली. शाळेच्या व्यवस्थापन समितीने या उपक्रमाचे कौतुक करत सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे…

Read More

277 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी; ई-केवायसी दुरुस्ती ३१ मार्चपर्यंत करण्याची अंतिम मुदत साईमत / जळगांव / प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता अद्यापही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला नाही. त्यामुळे या योजनेतील लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने योजनेच्या फेब्रुवारी हप्त्याच्या वितरणासाठी मोठा निर्णय घेतला असून, नवीन अपडेट समोर आला आहे. निधी मंजुरी आणि हप्त्याचे वितरण : सामाजिक न्याय विभागाने फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी २७७ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली असून, ही रक्कम महिला व बालविकास विभागाच्या निधी वितरण प्रणालीवर वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात लवकरच १५०० रुपयांचा हप्ता जमा होण्याची…

Read More

एक सिलिंडर असलेल्या ग्राहकांसाठी 25 दिवसांची प्रतीक्षा, दोन सिलिंडर असलेल्या 35 दिवस साईमत जळगाव प्रतिनिधी : देशभरातील LPG गॅस ग्राहकांसाठी मोठा बदल – आता बुकिंग करताना OTP आणि e-KYC अनिवार्य, सिलिंडर वितरणासाठी निश्चित कालमर्यादा लागू देशातील LPG गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची आणि तातडीची बातमी आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेमुळे, कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळे आणि वाढत्या वाहतूक खर्चामुळे गॅस वितरणावर दबाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या प्रमुख कंपन्यांनी नवीन LPG बुकिंग आणि वितरण नियम लागू केले आहेत. नवीन नियमांची मुख्य ठळक वैशिष्ट्ये सिलिंडर वितरण कालावधी: दोन सिलिंडर असलेल्या ग्राहकांना दर 35 दिवसांनी एकच…

Read More

मध्यरात्री उड्डाणपूलजवळ थार गाडीने अचानक कट, रोकड आणि मोबाईल हिसकावले साईमत / कोल्हापूर / प्रतिनिधी कोल्हापूरच्या व्यापारी दिलीप भागोजी पाटील यांच्या कारला मध्यरात्री अज्ञात चार जणांनी अडवून तब्बल अडीच लाख रुपयांची रोकड आणि दोन मोबाईल चोरून नेल्याची धक्कादायक घटना सांगोल्यात घडली आहे. या प्रकरणी पाटील यांनी सांगोला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस तपास करत आहेत. पाटील यांचे कोल्हापूरमध्ये वाहनांचे स्पेअर पार्टचे दुकान असून ते व्यवसायानिमित्त लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील घराच्या बांधकामासाठी पैसे घेऊन जात होते. त्यांच्या सोबत पत्नी सत्यकला आणि चालक रामचंद्र साळुंखे होते. रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवण करून ते पुढे निघाले. रात्री अकराच्या सुमारास सांगोला…

Read More

किरकोळ कारणावरून वाद, लोखंडी पाईपने प्रहार; पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला साईमत / भुसावळ / प्रतिनिधी भुसावळमधील आगाखान वाडा परिसरात पैशाच्या किरकोळ वादातून दोन्ही गटात झालेल्या भीषण हाणामारीत फिर्यादी तरुणासह त्याची पत्नी आणि वृद्ध वडील गंभीर जखमी झाले आहेत. बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. वादाचा तपशील : मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख शेख हसिद उर्फ मुन्ना (वय २८, रा. आगाखान वाडा) यांनी जमिना रउफ कुरेशीकडून ४ हजार रुपये घेतले होते. पैसे परत मागितल्यावर शाहरुख यांनी “मी तुमचे पैसे परत केले आहेत” असे सांगितले. यावरून संशयित आरोपी रहिम रउफ कुरेशी आणि जमिला रउफ कुरेशी यांनी…

Read More

लाकडी दांडक्याने १९ वर्षीय तरुणावर मारहाण  तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल साईमत जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात चोरीच्या संशयावरून एका १९ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला झाला. ही धक्कादायक घटना २४ मार्च रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी रात्री ९ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानिया पार्क परिसरातील रहिवासी हम्मिद अब्बास खाटीक (वय ४९) यांचा मुलगा अबरार उर्फ चिरक्या (वय १९) या रात्री पिंप्राळा हुडको भागात संशयित आरोपी पंकज, सुपड्या (पूर्ण नाव माहित नाही) आणि किरण अशोक सपकाळे यांनी अडकवला. त्यानंतर त्यांनी अबरारवर शिवीगाळ करत दमदाटी केली…

Read More

इराण – अमेरिकेबरोबर चर्चा फेटाळली; प्रदेशातील देशांना एकजुटीसाठी आवाहन साईमत / वृत्तसंस्था / प्रतिनिधी ताजा घडामोडींमध्ये इस्लामिक रिव्हॉल्युशन गॉर्ड कोअर (IRGC)च्या खातम अल-अंबिया सेंट्रल हेडक्वार्टर्सच्या प्रवक्त्याने अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे. “तुमच्या पराभवाला कराराचे नाव देऊ नका,” असे स्पष्ट करत त्यांनी अमेरिकेला सांगितले की, चालू संघर्षादरम्यान अमेरिकेच्या धोरणात्मक आणि आर्थिक स्थितीला पुन्हा गाठता येणार नाही. अमेरिका-इस्रायल धोरणांवर टीका : IRGCच्या प्रवक्त्याने प्रदेशातील देशांना ‘अमेरकन, झायोनिस्ट राजवटीच्या’ विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांनी अमेरिकेबरोबर सुरक्षा भागीदारीच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित करत प्रश्न विचारला, “आम्हाला अशा दूर अंतरावर असलेल्या देशाची गरज नाही, जो इस्रायलला प्राधान्य देतो आणि तुम्हाला गुरांसारखी वागणूक देतो.” त्यांनी अमेरिकेच्या…

Read More

‘करोडपती’ कर्मचाऱ्यांचा गौरव इतरांसाठी प्रेरणादायी साईमत भुसावळ  प्रतिनिधी : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये अपूर्व कामगिरी करत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यंदा विभागातील एकूण १० कर्मचारी तिकीट तपासणीद्वारे ₹१ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळवून ‘करोडपती’ बनले आहेत, ज्यामुळे विभागाची प्रतिष्ठा आणि महसुलात मोठा वाढ दर्शविण्यात आली आहे. अलीकडेच सात कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला होता, परंतु आता विभागाने आणखी तीन कर्मचाऱ्यांचा या विशेष श्रेणीत समावेश केला आहे. या नव्या ‘करोडपती’ कर्मचाऱ्यांमध्ये अल्विन गायकवाड (टीटीआय, भुसावल), पी. के. सिंग (सीटीआय, भुसावल) आणि आर. के. गुप्ता (सीटीआय, भुसावल) यांचा समावेश आहे. त्यांच्या मेहनतीमुळे चालू आर्थिक वर्षात…

Read More

वाघूर पुलावर तीन ट्रक जप्त वाळू वाहतुकीवर पोलिसांचा जोर साईमत भुसावळ प्रतिनिधी : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी भुसावळ तालुक्यात मंगळवार, दि. २४ रोजी कडक नाकाबंदी राबविण्यात आली. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या आदेशानुसार या विशेष कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी नियोजनबद्ध पद्धतीने वाहनांची तपासणी केली आणि संशयित वाहने रोखली. नाकाबंदी दरम्यान सुनसगावजवळील वाघूर नदीच्या पुलावर MH-19 Z-0932 क्रमांकाचा वाळूने भरलेला ट्रक आढळला. चालक अनिल सुपडू सोनवणे (वय २४, रा. बांभोरी) याच्याकडे वाळू वाहतुकीसाठी आवश्यक कोणतेही वैध कागदपत्र नव्हते. त्यानंतर UP-53 GT-1171 क्रमांकाचा डंपरही तपासण्यात आला, ज्याचे चालक आकाश सुरेश पारधी (वय…

Read More

प्रभू श्रीरामांच्या जीवनावर आधारित भजने व अभंगांची मेजवानी साईमत जळगाव प्रतिनिधी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त रामनवमीचे औचित्य साधून जळगाव शहरात ‘रामरंग : भक्तीचा आणि सुरांचा संगम’ या भव्य भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. २६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता अयोध्यानगर येथील राममंदिर मित्र मंडळाच्या वतीने हा भक्तीमय स्वरसोहळा रंगणार आहे. औद्योगिक वसाहत परिसरातील अयोध्यानगर येथे होणाऱ्या या कार्यक्रमात जळगावातील प्रसिद्ध ‘भक्तीनाद’ ग्रुपकडून भजन संध्याचे सादरीकरण केले जाणार असून, भक्ती आणि संगीताची सुंदर मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध भजन गायक पं. नारायणभाई ओझा आणि प्रसिद्ध गायिका भानूप्रियाजी यांचे सुमधुर गायन. प्रभू श्रीरामांच्या…

Read More