Author: saimat

दारूच्या बाटल्या गायब, लोखंडी ग्रील वाकवून चोरट्यांचा प्रवेश साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे स्पष्ट करत, चोरट्यांनी आता आपले लक्ष मद्यविक्री केंद्रांकडे वळवले आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आव्हाणे रोडवरील ‘हॉटेल न्यू नाईट किंग अँड वाईन पॅलेस’ या बिअर बारमध्ये मंगळवारी रात्री धाडसी चोरीची घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलचे मालक अमोल गोपाळ साळी (वय ३९, राहणार रा. राजराजेश्वरी अपार्टमेंट, जळगाव) यांचे बार मंगळवारी साडेअकरा वाजेपासून २५ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत बंद होते. या काळात अज्ञात चोरट्यांनी हॉटेलच्या खिडकीच्या लोखंडी ग्रीलला शिताफीने वाकवून आत प्रवेश केला. कोणाचेही लक्ष नसताना चोरट्यांनी काउंटर आणि स्टोअरमधून…

Read More

दुपारच्या उष्णतेमुळे जीवन विस्कळीत, ग्रामीण भागात भारनियमनाचा फटका साईमत / जळगाव / प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरीस उष्णतेची तीव्र लाट पसरली असून, नागरिकांचे जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळी रस्ते, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणे शांत दिसत आहेत; नागरिक आवश्यक कामांशिवाय बाहेर पडणे टाळत आहेत. शहरातील लोक घरात राहणे पसंत करत आहेत आणि बाहेर पडल्यास डोक्यावर कापड, टोपी किंवा छत्री घेऊन जात आहेत. थंड पेय, लिंबूपाणी, ताक आणि ऊसाचा रस याची मागणी वाढली असून रस्त्यावर विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी दिसत आहे. ग्रामीण भागातही परिस्थिती गंभीर आहे. उष्णतेमुळे शेतकरी आणि मजूर सकाळच्या गारव्याच्या वेळेतच कामे आटोपण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर दुपारी…

Read More

एलपीजीच्या तुलनेत ३०–४०% इंधन बचत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्याय साईमत / कोपरगाव / प्रतिनिधी वाढत्या महागाईमुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती व टंचाईने त्रस्त असलेल्या हॉटेल व्यवसायिक, केटरर्स आणि लघुउद्योजकांसाठी कोपरगावमधून दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मवीर शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि संजीवनी उद्योग समूहाने ‘इथेनॉल स्टोव्ह प्रणाली’ विकसित केली असून, ही प्रणाली स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून पुढे येत आहे. ही प्रणाली पारंपारिक एलपीजी गॅसप्रमाणेच कार्य करते, मात्र इंधन म्हणून द्रवरूप इथेनॉल वापरला जातो. टाकीतून इथेनॉल बर्नरपर्यंत पोहोचून ऑक्सिजनसोबत मिसळून निळ्या ज्वालेत जळते, ज्यामुळे स्वयंपाक वेगाने आणि सुरक्षितरीत्या करता येतो. तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार, व्यावसायिक गॅसच्या तुलनेत ३०–४०% खर्चात…

Read More

आग वेगाने पसरली; जुनी मारुती 800 कार जळून नष्ट साईमत भुसावळ प्रतिनिधी भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात आज दुपारी अचानक लागलेल्या आगीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नुरी बिल्डिंगजवळ कापून ठेवलेल्या झाडाला आग लागल्याने काही क्षणांतच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. बजाज बिल्डिंगसमोर असलेल्या या झाडाच्या ढिगाऱ्याला लागलेल्या आगेला सुरुवात लहान स्वरूपात झाली, पण काही वेळात ती भडकली. परिसरात धूर पसरल्याने नागरिकांनी घाबरून बाहेर धाव घेतली. स्थानिकांनी तात्काळ अग्निशामक दलाला घटना कळवली. आग वेगाने पसरत असल्याने घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाला युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागले. त्यांच्या वेळेत हस्तक्षेपामुळे आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, मात्र…

Read More

शोभायात्रा मार्ग सजावटीसाठी मनपा व नागरिक पुढाकारावर साईमत जळगाव प्रतिनिधी प्रभू श्रीराम नवमी आणि भगवे हिंदू संमेलनाच्या शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १६, आयोध्या नगर परिसरात स्वच्छता आणि सुशोभीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. मनपा आरोग्य विभागाच्या समन्वयाने रस्ते स्वच्छ व सुरक्षित करण्यासाठी विविध कामे हाती घेतली गेली. शोभायात्रेच्या मार्गावर सद्गुरु नगर दत्त मंदिरापासून सागर शॉपी, तृप्ती कॉर्नर ते श्रीराम मंदिरापर्यंतच्या रस्त्यांवर गटारांची साफसफाई, रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत काढणे आणि झाडू मारून परिसर स्वच्छ करण्यात आला. या कामामुळे शोभायात्रेसाठी मार्ग अधिक आकर्षक आणि सुरक्षीत झाला आहे. या मोहिमेसाठी भाजपचे नगरसेवक डॉ. विरण सुरेश खडके आणि भाजपचे कोषाध्यक्ष विजय वानखेडे यांनी…

Read More

अनुच्छेद २५ अंतर्गत धार्मिक स्वातंत्र्य आहे; सुट्ट्या जाहीर करणे सरकारचा धोरणात्मक निर्णय साईमत / नवी दिल्ली / प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे की, धर्माचे पालन हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार असला तरी त्याच्या आधारावर सरकारकडून सार्वजनिक सुट्टीची मागणी करता येणार नाही. खंडपीठाने सांगितले की, भारतीय संविधानातील अनुच्छेद २५ अंतर्गत धार्मिक स्वातंत्र्यामुळे एखाद्या धार्मिक प्रसंगासाठी सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार येत नाही. सुनावणी ‘ऑल इंडिया शिरोमणी सिंह सभा’ संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर झाली होती, ज्यात गुरु गोविंद सिंग यांची जयंती (प्रकाश पर्व) देशभर ‘राजपत्रित सुट्टी’ म्हणून जाहीर करावी, तसेच सार्वजनिक सुट्ट्यांविषयी एकसमान मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत, अशी मागणी करण्यात आली होती.…

Read More

कमी वापर करणाऱ्या ग्राहकांना विशेष लाभ, ०–१०० युनिटसाठी ९.७% आणि ३०१–५०० युनिटसाठी १४% दर कपात साईमत / मुंबई / प्रतिनिधी महाराष्ट्रातील घरगुती वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन आर्थिक वर्ष २०२६–२७ च्या सुरुवातीलाच राज्यभर वीज दरात कपात करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून हे नवीन दर लागू होतील. महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर यांसारख्या प्रमुख वीज वितरण कंपन्यांनी घरगुती वीज दर कमी करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केला होता. आयोगाने प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर राज्यभरात नवीन दर लागू करण्यात येणार आहेत. विशेषतः कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना याचा अधिक फायदा होणार आहे. नवीन वीज दर (२०२६–२७ आर्थिक वर्षासाठी): ०–१०० युनिट:…

Read More

उमाळा-गाडेगाव पुलाजवळ भीषण दुर्घटना, दोन जणांचा मृत्यू साईमत जळगाव प्रतिनिधी बुधवारी, २५ मार्च रोजी दुपारी सुमारे ४ वाजता जळगाव तालुक्यातील उमाळा-गाडेगाव मार्गावर घडलेला अपघात एका कुटुंबाच्या जीवनावर शोककळा कोसळवणारा ठरला. पिंप्राळा हुडको येथील मुझफ्फर अली सैय्यद बबन (वय-६०) आणि त्यांची पत्नी ताहेराबी मुजफ्फर अली (वय-५५) या दोघांचा दुचाकी क्रमांक एमएच १९ इजे ३८९८ या दुचाकीवरून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. स्थानीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फर अली हे आपल्या पत्नीसह आणि दोन मुलांसह पिंप्राळा हुडको परिसरात वास्तव्य करत होते. ते मसाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. या बुधवारी त्यांच्या चुलतभावाच्या मुलीच्या लग्नामुळे ते फर्दापूरला गेले होते. लग्नानंतर…

Read More

साईमत / नवी दिल्ली एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अनेक माध्यमांमध्ये अशी अफवा पसरली होती की, केंद्र सरकारने एलपीजी रिफिल बुकिंगचा कालावधी २५ दिवसांवरून ३५ दिवसांपर्यंत वाढवला आहे. या वृत्तांनुसार, प्रधानमंत्री उज्ज्वला योजने (PMUY) अंतर्गत कनेक्शनसाठी ४५ दिवस आणि PMUY नसलेल्या सिंगल-सिलेंडर व डबल-सिलेंडर कनेक्शनसाठी २५ आणि ३५ दिवसांपर्यंत बुकिंगची मुदत वाढवली जात आहे, असा दावा केला जात होता. सरकारने फेटाळले अफवे पण केंद्र सरकारने या वृत्तांना फेटाळून स्पष्ट केले आहे की, एलपीजी रिफिल बुकिंगच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शहरी भागात २५ दिवसांच्या आत आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांच्या आतच एलपीजी रिफिल बुक करता येईल. सरकारने जनतेला आवाहन केले…

Read More

करवाढ न करता आर्थिक वर्ष २०२६-२७ ची तयारी पूर्ण साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला स्थायी समितीच्या विशेष सभेत अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. करवाढ न करता तब्बल १५२५ कोटी १२ लाख रुपये या विकासाभिमुख अर्थसंकल्पाची सादरीकरणे नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरली आहेत. महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी यापूर्वी १४५२ कोटी १० लाख रुपयांचे मूळ अंदाजपत्रक सादर केले होते, ज्यामध्ये कोणतीही करवाढ नव्हती. त्यानंतर स्थायी समितीने महसुलात सुधारणा आणि खर्चात आवश्यक बदल सुचविले. बुधवारी (दि. २५) पार पडलेल्या विशेष सभेत या दुरुस्तींसह अंतिम मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात पार पडलेल्या बैठकीला स्थायी समितीचे सभापती डॉ.…

Read More