Author: saimat

साईमत / नाशिक / प्रतिनिधी चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त सप्तशृंगगड येथे होणाऱ्या यात्रेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने व्यापक नियोजन केले असून, एकूण २५० जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी निमाणी बसस्थानकातून दर १५ मिनिटांनी, तर नांदुरी पायथ्यापासून दर ५ मिनिटांनी गडाकडे बस सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक या धार्मिक सोहळ्यासाठी गडावर येत असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी महामंडळाने विशेष व्यवस्था केली आहे. ३ एप्रिलपर्यंत ही अतिरिक्त बससेवा सुरू राहणार असून, निमाणी, नांदुरी पायथा आणि गड वाहनतळ येथे यात्रा वाहतूक केंद्र उभारण्यात आले आहे. तसेच मालेगाव, मनमाड, सटाणा आणि नांदगाव येथूनही जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.…

Read More

साईमत / यवतमाळ/ प्रतिनिधी पुसद शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरात अवैधरीत्या गॅस सिलिंडर साठवून त्यांची व्यावसायिक विक्री करणाऱ्या प्रकरणावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत २१ गॅस सिलिंडर जप्त केले. या कारवाईत सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मधुकरलाल जाट यांच्या निवासस्थानी घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलिंडर बेकायदेशीररीत्या साठवून ते व्यावसायिक वापरासाठी विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला. यावेळी १९ किलो वजनाचे १९ आणि पाच किलोचे २ असे एकूण २१ सिलिंडर जप्त करण्यात आले. कारवाईदरम्यान संबंधित व्यक्तीकडे आवश्यक परवानग्या व कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी सिलिंडर जप्त करून…

Read More

साप्ताहिक विशेष गाडी आता ११ जुलै (बिकानेर–शिर्डी) व १२ जुलै (शिर्डी–बिकानेर) २०२६ पर्यंत चालणार साईमत / जळगांव / प्रतिनिधी देशभरातून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या आणि राजस्थानकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने साईनगर शिर्डी–बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे सेवेचा कालावधी वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाविकांसह व्यावसायिक, पर्यटक आणि विद्यार्थी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. शिर्डी हे देशातील अत्यंत महत्त्वाचे धार्मिक तीर्थक्षेत्र असून, येथे दरवर्षी लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. सुट्ट्यांच्या काळात, सणासुदीच्या दिवसांत आणि गुरुवार-शनिवार या दिवशी गर्दी अधिक वाढते. अशा परिस्थितीत साईनगर शिर्डी–बिकानेर विशेष गाडी भाविकांसाठी अत्यंत सोयीची ठरते. याशिवाय, राजस्थानातील…

Read More

साईमत / मुंबई  / प्रतिनिधी अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या चिंतेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ‘पल्स’ या वैद्यकीय परिषदेनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी १० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम तेल कंपन्या आणि केंद्र सरकार स्वतः सहन करत असल्यामुळे सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही. त्यामुळे इंधन दरांमध्ये अनावश्यक वाढ होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. देशात पेट्रोल पंपांवर लागलेल्या रांगांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, सध्या कोणतीही टंचाई नाही. भारताकडे सुमारे एका महिन्याचा…

Read More

साईमत / ठाणे / प्रतिनिधी ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरात अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खासगी क्रिकेट प्रशिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचे वय ५९ वर्षे असून तो खासगी क्रिकेट कोच म्हणून कार्यरत होता. पीडित मुलींचे वय १२ ते १४ वर्षे दरम्यान आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास आरोपीने एका मुलीशी अयोग्य वर्तन करत चुकीचा स्पर्श केला होता. त्यानंतर अलीकडेच दुसऱ्या मुलीशीही अशाच प्रकारे विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. दुसऱ्या पीडित मुलीने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. स्थानिक पातळीवर चौकशी केल्यानंतर आरोपीने यापूर्वीही अशाच…

Read More

साईमत / जळगांव / प्रतिनिधी राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू झाले असून लाभार्थ्यांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. सामाजिक न्याय विभागाने फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सुमारे २२७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. त्यानुसार महिला व बालविकास विभागामार्फत निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण तांत्रिक प्रक्रियेद्वारे सुरू झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व…

Read More

९  बाटल्या विदेशी दारु जप्त  चोरी पकडली गुन्हा दाखल  साईमत / भुसावळ/ प्रतिनिधी – सावदा येथील सहकारी दुध उत्पादक संस्थेत विदेशी दारु विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर सावदा पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत संस्थेच्या मागील रुममधून ७५० एमएलच्या ९ बाटल्या विदेशी दारु जप्त करण्यात आल्या आहेत. सावदा पोलिस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील यांनी गोपनीय माहितीच्या आधारे अंमलदारांसह दोन पंचासमक्ष छापा टाकला. तपासात आढळले की, दारु विक्रीसाठी ठेवलेली ही ९ बाटल्या संस्थेतील क्लर्क नितीन रामकृष्ण बेंडाळे यांनी आणले होत्या. पोलिसांनी बेंडाळे विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ई नुसार गुन्हा नोंदवला आहे. सध्या तपासात हेही पाहिले जात आहे की, या दारु…

Read More

कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे ७६ वर्षीय महिला रुग्णालयात दाखल साईमत भुसावळ प्रतिनिधी सुनसगाव येथील खंडेराव मंदिर परिसरात बुधवारी (दि. २६ मार्च) एका गंभीर घटनेत ७६ वर्षीय चंद्रभागाबाई चावदस पाटील यांना भटक्या कुत्र्यांच्या अचानक हल्ल्यात गंभीर जखमा झाल्या. महिला आपल्या घराजवळ जात असताना अचानक काही भटक्या कुत्र्यांच्या गटाने त्यांच्यावर हल्ला केला. स्थानिकांच्या माहितीनुसार, महिलेला उजव्या पायावर अनेक ठिकाणी चावा लागल्यामुळे गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर तातडीने स्थानिक रहिवाशांनी प्राथमिक उपचार केले व नंतर जळगाव येथील सामान्य रुग्णालयात त्यांना दाखल केले गेले. महिलांच्या प्रकृतीची वैद्यकीय तपासणीनंतर परिस्थिती स्थिर असल्याचे रूग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. स्थानिकांनी सांगितले की, सुनसगाव परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या गेल्या काही महिन्यांपासून वाढत…

Read More

शिधापत्रिका धारकांना प्रति कुटुंब ३ लिटर; एलपीजी तुटवडा हाताळण्यासाठी तात्पुरता उपक्रम साईमत / जळगांव / प्रतिनिधी देशातील मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून, नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त आहेत. व्यावसायिक गॅस पुरवठा काही नियमावलींमुळे बंद असताना, राज्य सरकारने तात्पुरते उपाय म्हणून घरगुती ग्राहकांसाठी केरोसीन वितरण सुरू करण्याचे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारकडून राज्याला 37 लाख 44 हजार लिटर केरोसीन वाटपासाठी मंजुरी मिळाली असून, प्रत्येक शिधापत्रिका धारक कुटुंबाला ३ लिटर केरोसीन मिळणार आहे. राज्यातील जिल्हानिहाय केरोसीनचे वितरण मार्च-एप्रिल २०२६ मध्ये सरकारी तेल कंपन्यांकडून केले जाणार आहे. एकूण वाटपाचे ८५ टक्के केरोसीन पहिल्या पंधरवड्यात वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिधापत्रिका…

Read More

महापौर दीपमाला काळे नेतृत्वाखाली प्रशासनाची कडक कारवाई सुरू; वाहने हटवली नाहीत तर थेट जप्ती! १ एप्रिलपासून प्रशासनाची कडक कारवाई साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील वाहतुकीच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या महामार्गावरील अतिक्रमणावर महापौर दीपमाला काळे यांनी कडक पाऊल उचलले आहे. खेडी ते खोटे नगर दरम्यानच्या महामार्गावर दुतर्फा लावण्यात आलेली वाहने हटवण्यासाठी संबंधित वाहनधारकांना ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. १ एप्रिलपासून वाहने हटवली नाहीत तर जप्तीची कठोर कारवाई केली जाणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. बुधवारी महापौरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त धनश्री शिंदे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले, ‘नही’चे अधिकारी राहुल पाटील…

Read More