Author: saimat

साईमत / अहिल्यानगर राज्यात अपघातांची मालिका सुरू असतानाच, अहिल्यानगर- जामखेड-कर्जत रोडवर शनिवारी एक भीषण अपघात घडला. नववी व दहावीत शिकणाऱ्या मित्रांची चारचाकी उलटली असून यात ७ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. अहिल्यानगरमधील विद्यार्थ्यांनी जामखेडकडे जाऊन अकलूज वॉटर पार्कला भेट देण्याचा निर्णय घेतला होता. वाहन चालवणाऱ्या चालकाचा ताबा सुटल्याने कार एका ठिकाणी उलटली आणि त्यानंतर एक ते दोन वेळा फिरली. अपघातातील सर्व विद्यार्थी हे नववी आणि दहावीतील मित्र असल्याचे समजते. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने हस्तक्षेप करून सर्व विद्यार्थ्यांना कारमधून बाहेर काढले. जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने जामखेड रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांचे कुटुंबीय देखील…

Read More

एकाच दोरीवर गळफास घेत दुहेरी आत्महत्येची घटना साईमत चाळीसगाव प्रतिनिधी: चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर शिवारात एका शेतकरी दांपत्याने आपले जीवन संपवले, अशी हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भगवान पोपट जाधव (वय ३८) आणि आशाबाई भगवान जाधव (वय २७) या दांपत्याने घराजवळील आपल्या शेतात एकाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन मृत्यू स्वीकारला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवापूर तांडा येथील जाधव दांपत्याने घरापासून अवघ्या ३०० फूट अंतरावर असलेल्या शेतातील उंबराच्या झाडाला दोरी बांधून हा टोकाचा निर्णय घेतला. शेतातच ही घटना घडली असली तरी, स्थानिकांनी तातडीने दोघांना खाली उतरवून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. दुर्दैवाने, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच दोघांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी…

Read More

साईमत / बाराबंकी (उत्तर प्रदेश) उत्तर प्रदेशमध्ये एका भयानक आणि निर्घृण घटनेमुळे समाज हादरला आहे. बाराबंकी जिल्ह्यातील सरयू नदीच्या पलीकडे वसलेल्या परसावल गावात शनिवारी दुपारी आईस्क्रीम खाल्ल्याचे पैसे मागितल्यावर संतप्त झालेल्या एका व्यक्तीने तरुणाची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, बेहटा गावातील बबलू राजभर (वय 26) हा आपल्या 12 वर्षांच्या चुलत भावासोबत घरापासून सुमारे 9 किलोमीटर अंतरावर परसावल गावात आईस्क्रीम विकायला गेला होता. तो माजरा नैपुरा परिसरात फिरून आईस्क्रीम विकत असताना, गावातील शंकर यादव (वय 52) यांनी 3 आईस्क्रीम खाल्ली. जेव्हा बबलूने त्याच्याकडून पैसे मागितले, तेव्हा शंकर यादव संतप्त झाले आणि त्याने जवळच्या घरातून विळा आणून बबलूवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात…

Read More

२२ टन कचरा हटवून महापौरांचा विक्रेत्यांना कडक इशारा साईमत जळगाव प्रतिनिधी: शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने महापालिकेकडून सुरू असलेल्या विशेष स्वच्छता अभियानांतर्गत रविवारी (२९ मार्च) गजबजलेल्या गोलाणी मार्केट परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी करत या मोहिमेला नेतृत्व दिल्याने प्रशासनासोबतच नागरिकांमध्येही मोठी जनजागृती निर्माण झाली. गोलाणी मार्केटमधील स्वच्छतेचा प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित होता. गाळेधारकांनी न्यायालयीन दाद घेतल्यामुळे स्वच्छतेच्या कामात अडथळे निर्माण झाले होते. मात्र, स्थानिक नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींची दखल घेत महापौरांनी विशेष स्वच्छता मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावत, “स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून दुकानदारांनीही…

Read More

महापालिकेवर सवाल; MPCB अधिकारी कॉल उचलले नाहीत साईमत जळगाव प्रतिनिधी: लक्ष्मी नारायण नगर कॉलनी आणि अयोध्या नगर परिसरात पुन्हा एकदा नाल्यात रासायनिक व ऑईलयुक्त पाणी सोडल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना काही पहिल्याच प्रकाराची नसून मागील तीन वर्षांत चार-पाच वेळा अशाच प्रकारची घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये संताप, भीती आणि आरोग्याबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. नाल्यात सोडण्यात आलेल्या रासायनिक पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, पाण्याचा रंग बदललेला दिसतो. नाल्याजवळील हवा आणि पाणी दूषित झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा…

Read More

शॉर्टसर्किटचा फटका बोदवडच्या जिनिंगमध्ये भीषण आग साईमत बोदवड प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील जामनेर रोड परिसरात असलेल्या अरिहंत जिनिंगमध्ये अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरिहंत जिनिंगमध्ये अचानक धूर व ज्वाळा उसळू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात येताच तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत जिनिंगमधील साठवून ठेवलेला कापूस पूर्णपणे जळून खाक झाला असून नुकसान…

Read More

साईमत / अयोध्या अयोध्या येथे शनिवारी शरयू नदीच्या तीरावर सुरू असलेल्या महायज्ञादरम्यान अचानक भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. आगीच्या ज्वाळांनी काही क्षणांतच वेग घेत मंडप जळून खाक झाला. या घटनेमुळे उपस्थित भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. या महायज्ञासाठी सुमारे ५० हजार भाविक उपस्थित होते. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार, यज्ञात आहुती म्हणून अर्पण केलेला नारळ अचानक फुटल्याने ठिणगी पडून आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही क्षणांतच आग मोठ्या प्रमाणात पसरली आणि संपूर्ण मंडप…

Read More

गप्पांच्या मैफलीत घडली शोकांतिका कट्ट्याने घेतला बळी साईमत अमळनेर प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात गावठी कट्टा हाताळताना झालेल्या मिसफायरमुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अरुण महाजन असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील माळीवाडा परिसरात मंडप व्यवसाय करणारा अरुण महाजन हा आपल्या काही मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. यावेळी त्याचा मित्र भूषण महाजन याने त्याच्याकडे असलेल्या गावठी कट्ट्याबाबत माहिती देत असताना अचानक बंदुकीतून गोळी सुटली. ही गोळी थेट अरुणच्या छातीत घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर उपस्थित मित्रांनी तत्काळ अरुणला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही…

Read More

साईमत / मुंबई / प्रतिनिधी सण-उत्सवांच्या सुट्ट्यांमुळे पुढील आठवड्यात शेअर बाजाराच्या व्यवहारावर स्पष्ट परिणाम दिसून येणार आहे. National Stock Exchange (NSE) आणि Bombay Stock Exchange (BSE) हे दोन्ही प्रमुख शेअर बाजार महावीर जयंतीनिमित्त ३१ मार्च रोजी आणि Good Friday निमित्त ३ एप्रिल रोजी बंद राहणार आहेत. त्यानंतर शनिवार-रविवारी नियमित सुट्टी असल्याने सलग चार दिवस व्यवहार ठप्प राहणार आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीलाही Ram Navami निमित्त गुरुवारी बाजार बंद होता, त्यामुळे व्यवहाराच्या वेळेत घट झाली होती. परिणामी, गुंतवणूकदारांच्या व्यवहारांवर मर्यादा आल्या होत्या. दरम्यान, Multi Commodity Exchange of India (MCX) वर महावीर जयंतीदिवशी पूर्ण बंद राहणार नाही. सकाळचे सत्र बंद राहील, मात्र सायंकाळचे…

Read More

मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सची जोरदार धडक २९ प्रवासी जखमी साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरजवळ मुंबई–नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी भीषण अपघात घडला. सुरतहून अमरावतीकडे प्रवासी घेऊन निघालेल्या ट्रॅव्हल्सने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने २९ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रॅव्हल्स सुरत येथून अमरावतीकडे जात होती. दरम्यान, मुक्ताईनगरजवळील महामार्गावर एका ट्रकने काही कारणास्तव थांबले असताना ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाने ट्रकला मागून धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की ट्रॅव्हल्समधील अनेक प्रवासी जागीच जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत…

Read More