मलकापूर : प्रतिनिधी येथील भीमनगर येथे त्रिरत्न महिला बचत गटातर्फे ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान राबविण्यात आले. अभियानाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून नगरसेवक तथा ‘समतेच निळ वादळ’ या सामाजिक संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष अशांत वानखेडे, नगरपरिषदेचे प्रकल्प अधिकारी दीपक खोडे आदी उपस्थित होते. यावेळी ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानाला काशाच्या कलशाचे पूजन अशांत वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे कर्मचारी मीना चोपडे, संतोष पाटील, अंगणवाडी सेविका राजकन्या वानखेडे, नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीसाठी त्रिरत्न महिला मंडळाचे अध्यक्ष रेखा सरदार, सचिव कविता अंजने, उपाध्यक्ष ज्योती दांडगे, शोभा पानपाटील, लक्ष्मी सरदार, निर्मला इंगळे, सुनिता शेगोकार यांच्यासह महिला मंडळाच्या महिला उपस्थित होत्या.
Author: saimat
मुक्ताईनगर : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील ८१ हजार ६४२ हेक्टर क्षेत्रासाठी ७७ हजार ९२० शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे. १८ जून २०२१ च्या शासन निर्णयानुसार पीक विम्याचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम कमी व जास्त तापमानाची हेक्टरी ६० ते ७० हजार रुपये ३ आठवड्यांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे बंधनकारक आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम तात्काळ जमा करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. जानेवारी महिन्यात तापमान सलग पाच दिवस ८ डिग्री सेल्सिअसच्या कमी राहिल्याने जिल्ह्यातील ४७ महसूल मंडळातील शेतकरी पात्र झाले आहे. त्यांना हेक्टरी २६५०० रक्कम…
सोयगाव : प्रतिनिधी शहरापासून काही अंतरावरील गलवाडा येथील गरीब घरातील युवकाची भारतीय सैन्यात निवड झाली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून गलवाडा येथील एका गरीब कुटूंबातील धर्मदास आनंदा गायकवाड यांची भारतीय सैन्यात निवड झाली. ट्रेनिंग पूर्ण करून गावात आल्यानंतर गलवाडा गावच्या माजी सरपंच सुरेखा भारत तायडे यांनी व इतर महिलांनी जवानाचा सत्कार केला. यावेळी सुरेखा तायडे यांच्यासह सीआरपी सोनाली मोरे, अंगणवाडी सेविका करुणा सोनवणे, सुनीता साळवे, सुनीता मोरे, सविता सोनवणे, सुपरवायझर सोनवणेबाई, शोभाबाई मंडवे, पवार बाई यांच्यासह बचत गटाच्या इतर महिला, सुरेश घन, विशाल घन, राहुल भिवसणे, जयदीप बिरारे यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
बोदवड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलचे तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोपाल माळी, महाकाल फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल गंगतिरे यांनी सहकार्ऱ्यांसह हैदराबाद येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या हस्ते भारत राष्ट्र समिती पक्षात नुकताच प्रवेश केला आहे. बोदवड तालुक्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर. यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाचा प्रवेश झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पँनलमधुन निवडून आलेले हमाल मापाडी मतदारसंघातून निवडून आलेले संचालक गोपाळ माळी यांनी महाकाल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष अनिल गंगतिरे यांच्या सोबत हैदराबाद येथे मुख्यमंत्री के.सी.आर. यांच्या हस्ते पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती पक्षाच्या विस्तारासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ठिकठिकाणच्या सक्रिय कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांना पक्षात ऐकण्यासाठी आमंत्रित केले…
बोदवड : प्रतिनिधी शहरातील गांधी चौक येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सुरुवातीला आ.चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत अग्निशामक बंब, ट्रॅक्टर व दोन घंटागाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर माजी सैनिक, सफाई कर्मचारी २३ पुरुष, १६ महिला व घनकचरा कंत्राटदार यांच्या ३५ सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करत त्यांना गौरविण्यात आले. अग्निशामकची आवश्यकता पडावी अशी वेळ येऊ नये. परंतु, दुर्दैवाने अशी वेळ आलीच तर खेड्यापाड्यापर्यंत गाडी पोहोचून उपाययोजनेसाठी सुविधा उपलब्ध असायला पाहिजे. त्यामुळे हानी टाळता येणार असल्याचे आ.चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विकास कामे करत असताना समोरचा वेगळेच भारुड गातो. परंतु, आम्हीही ग्रामीण भागातील असल्याने बोलू शकतो. परंतु, आमच्यावर तसे संस्कार नाही, असा टोला माजी मंत्री…
मलकापूर : प्रतिनिधी तालुक्यातील शिराढोण येथील भारतीय सैन्यदलात सैनिक म्हणून तुषार वसंत ईखारे मागील कित्येक वर्षांपासून कार्यरत आहे. ते घरी सुट्टीवर आले होते. ध्वजारोहणाच्या दिवशी सरपंच आणि उपसरपंच यांनी जातीय द्वेष भावनेतून भारतीय सैनिकाला आमंत्रित न करताच ध्वजारोहण केले. त्यामुळे भारतीय जवान मागासवर्गीय असल्याने ध्वजारोहणापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सर्व पदाधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. जेणेकरून यापुढे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कोणत्याही भारतीय सैन्याचा अवमान होणार नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. निष्ठापूर्वक देशाची सेवा करीत भारतीय सैनिक तुषार वसंत ईखारे हे शिराढोण येथे रजेवर आले होते. १५ ऑगस्ट रोजी शिराढोण गावात ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता. शिराढोण…
फैजपूर : प्रतिनिधी सहकार महर्षी व शिक्षण महर्षी स्व.दादासाहेब जे.टी.महाजन यांना ९९ व्या जयंतीनिमित्त परिसरातील मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम सकाळी त्यांच्या राहत्या घरी न्हावी गावातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना विनम्र आदरांजली वाहिली. त्यानंतर न्हावी ग्रामपंचायतीच्या सभागृहात शरद महाजन, सरपंच देवेंद्र चोपडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांतर्फे दादासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. जे.टी.महाजन फ्रूट सेल सोसायटीच्या आवारातील अर्धाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर जे.टी.महाजन कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या आवारातील दादासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उपस्थित मान्यवरांनी आदरांजली वाहिली. यांची होती उपस्थिती यावेळी संस्थाध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी, आ. शिरीष चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, माजी आ. अरुण…
यावल : प्रतिनिधी येथील नगरपालिकेपासून अर्धा किलोमीटर अंतरावरील शिवाजीनगर, व्यास मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ढापा तुटल्याने दुचाकी, चार चाकी वाहनांसह इतर नागरिकांना येण्याजाण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे. याठिकाणी चार चाकी गाड्या आणि रिक्षा रस्त्यावरील तुटलेल्या ढाप्यात अडकून वाहनाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे यावल नगरपालिकेने याठिकाणी नवीन ढापा टाकण्याचे बांधकाम तात्काळ करावे, अशी मागणी शिवाजीनगरमधील व इतर नागरिकांनी यावल नगरपरिषदेकडे केली आहे. ढापाचे बांधकाम तात्काळ न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. अशा आशयाचे निवेदन गुरुवारी, १७ ऑगस्ट रोजी यावल नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. यावल नगरपालिका ढाप्याचे बांधकाम केव्हा करणार, याकडे शिवाजीनगरमधील सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवाजीनगरमधील मुख्य…
वरणगाव : प्रतिनिधी शहरातील नागरिकांकडून नगर परिषद ३६५ दिवसांची पाणीपट्टी वसुली करते. प्रत्यक्षात मात्र, महिन्यातून दोन ते तीनच वेळा असे किमान २०० दिवसच पाणीपुरवठा केला जात असल्याने शहरवासियांना पाणीटंचाईच्या यातना सहन कराव्या लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शहराला तापी नदी पात्रातील पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, तापी नदी पात्रात पाण्याचा मुबलक प्रमाणात जलसाठा असतानांही शहरवासियांना १२ ते १५ दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईच्या यातना सहन कराव्या लागत आहेत. १५ दिवसानंतर होत असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक करावी लागत आहे. त्यामुळे साठविलेल्या पाण्यात जंतुचा प्रार्दुभाव निर्माण होत आहे. मात्र, या…
चंदीगड : पत्नीची साडी चोरली म्हणून एकाने शेजाऱ्याची गोळी झाडून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये ही घटना उघडकीस आली आहे. यात साडी चोरीच्या संशयामुळं सिक्युरीटी गार्डने शेजाऱ्याची गोळी झाडून हत्या केली आहे. मयतदेखील सिक्युरिटी गार्ड होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुण हा मुळचा बिहारचा असून त्याचे नाव पिंटू कुमार असं आहे. ज्या इमारतीत पिंटू राहत होत्या त्याच्या बाजूच्यात खोलीत उत्तर प्रदेशचा अजय कुमार (४२) त्याची पत्नी रीनासोबत राहत होता. पिंटू आणि अजय दोघही सिक्युरिटी गार्डम्हणून काम करत होते. साडी चोरल्याच्या संशय १५ ऑगस्ट रोजी ही घटना घडली…