Author: saimat

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझे ‘बॉस’ आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात अनेकदा सांगितले असले तरी त्यांनी आता सरकारवरील आपली पकड अधिक मजबूत केली आहे. प्रत्येक महत्त्वाची फाईल फडणवीस यांच्या मंजुरीशिवाय शिंदे यांच्याकडे जाणारच नाही, असे आदेश मुख्य सचिवांनी काढल्याने सरकारवर फडणवीसांचे पूर्ण नियंत्रण प्रस्थापित झाले आहे. मात्र त्यातून प्रचलित कामकाज नियमावलीचा (रुल्स ऑफ बिझिनेस) भंग होत असल्याची चर्चा मंत्रालयीन वर्तुळात सुरू झाली आहे. राज्यघटनेतील तरतुदीनुसार उपमुख्यमंत्री पदाला मुख्यमंत्र्यांप्रमाणे कोणतेही विशेष अधिकार नाहीत, मुख्यमंत्री हे सरकारचे घटनात्मक प्रमुख आहेत. उपमुख्यमंत्री हे त्यांच्याकडील खात्यांचे केवळ कँबिनेट मंत्री असतात. उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पर्यायी सत्ताकेंद्रे तयार होऊ नयेत, यासाठी शिवसेनेला…

Read More

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारविरोधात देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी म्हणजेच ‘इंडिया’ची आजपासून मुंबईत दोन दिवसीय बैठक सुरू होत आहे. या बैठकीवरून भारतीय जनता पार्टीसह महायुतीतले पक्ष शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गट आणि काँग्रेसवर टीका करत आहेत. तसेच या बैठकीचं यजमानपद शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे असल्यामुळे ठाकरे गटाला लक्ष्य केलं जात आहे. इंडिया’च्या बैठकीसाठी खर्च केल्या जाणाऱ्या पैशांवरून शिवसेनेच्या शिंदे गटाने आणि भारतीय जनता पार्टीने प्रश्न उपस्थित केले आहेत. याला आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांनी (शिंदे गट आणि…

Read More

मुंबई: पत्नी आणि मुलीची हत्या करणाऱ्या ९१ वर्षीय वृद्धाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अंथरुणाला खिळलेली पत्नी आणि गतीमंद मुलीचा खून करणाऱ्या वृद्धाला १८ महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. पुरुषोत्तम सिंह गंधोक असे आरोपीचे नाव असून तो अंधेरीच्या शेर-ए-पंजाबमध्ये वास्तव्यास होता. गेल्या फेब्रुवारीत त्यानं ८१ वर्षीय पत्नी आणि ५५ वर्षीय मुलीची हत्या केली. दोघींची काळजी घेण्यास मी असमर्थ होतो. त्यामुळे मी त्या दोघींची हत्या केली, असे पुरुषोत्तम सिंह गंधोकनं पोलिसांना सांगितले. गेल्या वर्षीच्या ८ ऑगस्टला दिंडोशी सत्र न्यायालयाने गंधोकता जामीन अर्ज फेटाळला. ‘पत्नी गेल्या १० वर्षांपासून अंथरुणाला खिळून होती. तिला हृदयरोग होता आणि तिची अँजियोप्लास्टी झाली होती. तर…

Read More

बोदवड : प्रतिनिधी येथील विधीसेवा प्राधिकरण आणि बोदवड पो.स्टे. यांच्या संयुक्त विद्यमाने बोदवड पो.स्टे. येथे रस्ते सुरक्षा, वाहन कायद्याबाबत जनजागृतीबाबत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.अर्जुन पाटील यांनी वाहतुकीचे नियम पाळणे ही सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करून अपघाताचे प्रमाण कमी होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. अध्यक्षस्थानी तथा उद्घाटक न्या.क्यु.यु.एन शरवरी होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वाढत अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू पाहता काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने वाहतूक नियम मोडणाऱ्या शिक्षेच्या आणि दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. मात्र, त्यानंतरही वाहन चालक हे नियम पाळत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बोदवड तालुका विधी…

Read More

बोदवड : प्रतिनिधी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ध्यानचंद सिंह यांच्या प्रतिमेचे पूजन नुकतेच करण्यात आले. ध्यानचंद हे माजी भारतीय हॉकी खेळाडू आणि कर्णधार होते. भारतातील आणि जागतिक हॉकीमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये त्यांची गणना होते. त्यांची जन्मतारीख भारतात “राष्ट्रीय क्रीडा दिन” म्हणून साजरी केली जाते. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मिठुलाल अग्रवाल यांच्या प्रोत्साहनातून आणि प्राचार्य प्रा.अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. उपप्राचार्य व्ही.पी. चौधरी यांचे ‘क्रीडा जगत’वर मार्गदर्शन झाले. यावेळी प्रभारी क्रीडा संचालक डॉ.अमर वाघमोडे, डॉ.रत्ना जवरस, हेमलता कोटेचा, डॉ.रुपेश मोरे, वैशाली संसारे, अजित पाटील, धीरेंद्र कुमार, अनिल धनगर, शरद पाटील, शेखरसिंग चव्हाण यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

Read More

सोयगाव : प्रतिनिधी जरंडी ग्रामस्थांना ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याची सुविधा ग्रामपंचायतने उपलब्ध करून दिली आहे. सरपंच स्वाती पाटील यांनी बुधवारी, ३० रोजी ‘माझी वसुंधरा’ उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत ऑनलाइन कर वसुली सुविधेचा प्रारंभ केला. यावेळी ग्रामपंचायत पटांगणात सरपंच स्वाती पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामसभा झाली. यावेळी उपसरपंच संजय पाटील यांनी ग्रामपंचायतमार्फत राबविण्यात येणाऱ्या नवनवीन सुविधा, ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सहकार्य करून गाव स्वच्छ व सुंदर, प्लॅस्टिक मुक्त करण्यासंबंधी माहिती दिली. यावेळी सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच संजय पाटील, ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे, सदस्य मधुकर पाटील, मधुकर सोनवणे, दिलीप पाटील, संजीवन सोनवणे, अमृत राठोड, महेंद्र पाटील यांच्यासह इतर ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

यावल : प्रतिनिधी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात खुल्या जागेवर तालुका शिवसेना शिंदे गटाची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे होते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन संचालक निवडून आणले. याबद्दल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे व मित्र पक्षाचे कौतुक केले. आपल्या संचालकांकडून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत विकास कामे करण्याबाबत मार्गदर्शनपर आवाहन माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांनी केले. शिवसेनेच्या संघटनेबाबत प्रत्येकाने केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना ज्या राबविल्या जात आहे. त्याबाबत जनतेसमोर जाऊन जनतेला माहिती देऊन मेहनत कशी घ्यावी, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यभान पाटील यांनी त्यांना संचालकपदी निवड…

Read More

बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील निमखेड ग्रामपंचायतीने शासनाच्या चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोग निधीचा अपहार केला आहे. प्रत्यक्षात कोणतेही कामे न करता बनावट कागदपत्रांद्वारे निधी हडपल्याची तक्रार भीमराव वाघ यांनी बोदवड पंचायत समिती आणि जळगाव जिल्हा परिषद यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. तालुक्यातील निमखेड ग्रामपंचायतीत चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीत ग्रामसेवक, सरपंच व सदस्यांनी खोटी बिले दाखवून लाखो रूपयांचा अपहार केला असल्याचे तक्रारदार भीमराव वाघ यांनी म्हटले आहे. निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील निमखेड येथील ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगान्वये निधी प्राप्त झाला होता. हा निधी ग्रामसेवक, सरपंच आणि काही सदस्यांनी हडप केला आहे. गावात निकृष्ठ प्रतीचे काम केली. काही ठिकाणी कामे…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी शेतजमिनीचा ताबा आणि वहीवाटीबाबत शेतकऱ्यातील आपआपसातील वाद मिटविण्यासाठी, समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकाचे अदलाबदल दस्तासाठी मुद्रांक शुल्क नाममात्र १ हजार रुपये व नोंदणी फी नाममात्र १ हजार रुपये आकारण्याबाबत सवलत देण्याची ‘सलोखा’ योजना राबविण्यास शासनाने ३ जानेवारी २०२३ रोजी मान्यता दिली. ‘सलोखा’ योजनेनुसार मुक्ताईनगर तालुक्यातील पहिला दस्त तहसीलदार डॉ.निकेतन वाळे यांच्या प्रयत्नाने नोंदविला गेला. विशेष बाब म्हणजे त्यांनी दस्तावर स्वतः साक्षीदार म्हणून सही करून या योजनेत इतर शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, अशी इच्छा व्यक्त…

Read More

चंद्रपूर : २०१८ पासून नोकरीच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या अंबुजा सिमेंट कंपनीतील प्रकल्पग्रस्तांनी आता मंत्रालयात विष प्राशन करू, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. उपरवाही येथील अदानी समुहाच्या ताब्यात असलेली अंबुजा सिमेंट कंपनी म्हणजेच पूर्वीची मे. मराठा सिमेंट वर्क्समधील प्रकल्पग्रस्तांचे २०१८ पासून नोकरीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. कंपनीने भूसंपादन करारातील अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याचे जिल्हा प्रशासनाने केलेल्या चौकशीत सिद्ध झाले. मार्च २०१९ मध्ये जिल्हा प्रशासनाने कंपनीविरुद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाच्या महसूल व वन तसेच मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवला मात्र चार वर्षे लोटूनही शासनाने कंपनीविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. कंपनीविरुद्ध कारवाई प्रलंबित असतानाच कंपनीच्या विस्तारित प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासन व पर्यावरण विभागाने…

Read More