Author: saimat

भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ स्पोर्ट्‌स ॲड रनर्स असोसिएशनचे शेकडो पुरुष व महिला धावपटू दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी एकत्रित धावण्याचा सराव करीत असतात. या धावपटूंमध्ये एक कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे. महिला व पुरुष धावपटू भाऊ बहिणींच्या पवित्र नात्याने संपूर्ण भुसावळ शहरास सुदृढ आरोग्याचा संदेश देतात. त्यामुळे यावर्षी सर्व पुरुष व महिला धावपटूंनी एकत्रित क्रीडांगणावर ‘रक्षाबंधन’ सण साजरा केला. सुरुवातीस सकाळी ५.३० ते ६.३० दरम्यान प्रत्येक धावपटूने ७ ते ८ कि.मी. धावून अंतर पूर्ण केले. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर परतल्यावर सर्व महिला धावपटूंनी सर्व पुरुष धावपटूंना राखी बांधून भाऊ-बहिणीच्या नात्यातील स्नेह व गोडवा वृद्धिंगत केला. यावेळी सर्व पुरुष धावपटूंनी कृतार्थ…

Read More

मलकापूर : प्रतिनिधी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्यावतीने साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा, यासह मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी अनु.जातीमध्ये वर्गवारी व्हावी, बार्टीच्या धर्तीवर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना व्हावी, अशा प्रमुख मागण्यांसाठी मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सोशल फोरमचे प्रदेश सरचिटणीस निवृत्ती तांबे यांच्या नेतृत्वाखाली आणि राजेंद्र वानखेडे तथा विजय पारेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी, ३१ ऑगष्ट रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मलकापूरला उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख यांना धरणे आंदोलनस्थळी लेखी निवेदन देण्यात आले. आंदोलनाला उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख तथा मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्यासह काँग्रेसचे…

Read More

मलकापूर : प्रतिनिधी तालुका क्रीडा संकुल मलकापूर, जि.बुलढाणा येथे सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्‌स असोसिएशन, बुलढाणा व स्पोर्टस झोन ऑफ मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य स्पर्धेत प्राविण्य प्राप्त अशा २८ खेळाडूंचा सत्कार सोहळा नुकताच झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजेश्वर खंगार, चंद्रकांत साळुंखे तसेच सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे बुलढाणाचे सचिव विजय पळसकर, गणेश खर्चे, संदीप शिरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. गतवर्षी झालेल्या राज्यस्तर शालेय व ज्युनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडू यांचा सत्कार पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विजय पळसकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. सत्कारार्थी खेळाडूंमध्ये स्पर्श तायडे, मयंक पळसकर, कार्तिक कुदळे, सार्थक जोगदंड, लोकेश चांडक, तनिष्क तायडे, ज्ञानेश…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव बु. ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच निवड अडीच वर्षासाठी राहील. त्यानंतर इतर सदस्यांना सरपंच, उपसरपंच पद देण्यात येईल, असा शब्द माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांनी इतर सदस्यांना दिला होता आणि आहे. त्यानुसार उपसरपंच लूकमान तडवी यांनी ठरल्याप्रमाणे १२ ऑगस्ट २०२३ रोजी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. परंतु ऑगस्ट २०२३ हा महिना संपत आल्यावरही किनगाव बुद्रुक ग्रामपंचायत महिला सरपंच निर्मला संजय पाटील यांनी अद्यापही राजीनामा न दिल्याने किनगावात चर्चेला उधाण आले आहे. माजी आमदार रमेश चौधरी यांनी ग्रामपंचायत सदस्यांना दिलेला शब्द खरा ठरणार किंवा नाही..? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. किनगाव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक माजी आमदार…

Read More

वरणगाव : प्रतिनिधी वेल्हाळे गावालगतच्या स्मशानभूमीत गावातील दोन महिला व एक पुरुष अघोरी कृत्य करीत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी स्मशानभूमीकडे धाव घेतली. मात्र, त्याची भणक लागताच अघोरी कृत्य करणारे जोडपे, मांत्रिक महिलेने घटनास्थळावरून धूम ठोकली. या प्रकाराची गावात चांगलीच चर्चा रंगली आहे. अघोरी कृत्याचा छडा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सविस्तर असे की, भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथे रविवारी, २० रोजी स्व.शांताबाई आत्माराम पाटील (वय ९२) यांचे निधन झाले होते. त्यांच्यावर गावालगतच्या स्मशानभूमीत सांयकाळी अंत्यविधी पार पडला. रात्री ८.३० वा गावातील काही शेतकरी शेती पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा गावातीलच एक पती-पत्नी व एक महिला मांत्रिकाला नग्नावस्थेत प्रेताजवळ हवन…

Read More

वरणगाव : प्रतिनिधी महात्मा गांधी विद्यालयात शिल्लक साठ्यातील शालेय पोषण आहार खराब अवस्थेत असल्याचे पोषण आहार अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या तपासणीत आढळून आल्याने त्याचा पंचनामा केला आहे. मात्र, खराब व मुदतबाह्य झालेल्या पोषण आहाराची नोंदवहीत नोंद नसल्याचेही आढळून आल्याने याबाबत दोषींवर कारवाई केली जाणार का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याची कुजबुज सुरू आहे. वरणगाव व शहर परिसरात नावाजलेल्या दी वरणगाव एज्युकेशन सोसायटी संचलीत महात्मा गांधी विद्यालयातील कार्यकारिणी मंडळाचा सत्ता संघर्षाचा वाद सर्वश्रृत आहे. हा वाद आता न्यायालयाच्या पायरीपर्यंत पोहोचला आहे. त्यातच विद्यालयातील भ्रष्ट कारभार कात्रीत पकडण्यासाठी सुरु असलेल्या धडपडीत शालेय पोषण आहाराचा मुद्दा समोर…

Read More

ठाणे : पोलिस दलात काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या परिवारपासून दूर राहून आपले कर्तव्य बजवावे लागत असल्याने त्यांना या सणापासून वंचित राहावे लागत असल्याचे लक्षात घेत दिवा शहरातील महिला भगिनींनी दिवा पोलीस चौकीत रक्षाबंधन साजरे केले पोलिस कर्मचाऱ्यांना राखी बांधून आपली सामाजिक बांधिलकी जपली.अहोरात्र कर्तव्य बजावून जनतेचं रक्षण करणाऱ्या पोलिस बांधवांना बहिणीची उणीव भासू नये. त्यामुळे या पोलिस कर्मचाऱ्यांना राख्या बांधून आज त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे केले. दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो, देव त्यांच रक्षण करो, अशी प्रार्थना या पोलीस बांधवांसाठी महिलांनी देवाकडे केल्याचं यावेळी पहायला मिळालं प्रसंगी दिवा पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर तसेच रवींद्र देसले, अनिल कुरघोडे,…

Read More

वर्धा : वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील एका आश्रमशाळेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारंजा तालुक्याती नारा येथील एका आश्रमशाळेत बारा वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूनंतर आश्रमशाळेत एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील आश्रमाशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार ऐरणीवर आला आहे. दरम्यान, आश्रमशाळेत असणाऱ्या गादीखाली या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. शिवम सनोज उईके असं बारा वर्षीय मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. शिवम अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट येथील चिखलदरा तालुक्याच्या डोमा येथील राहणारा होता. शिवमचा संशयास्पद मृतदेह परिस्थितीत मृतदेह सापडल्याने कारंजा परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र शिवमचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत अद्याप…

Read More

अहमदाबाद : दुसऱ्या धर्मातील मैत्रिणीबरोबर फिरणाऱ्या एका हिंदू तरुणाला जमावाकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा प्रकार घडला आहे. २६ ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून, तरुण आणि तरुणी शहरात फिरत असताना जमावाने त्यांना थांबवलं. यानंतर काहीजणांनी तरुणाला कानशिलात लगावल्या. इतकंच नाही तर तरुणीचा बुरखा वारंवार खेचत चेहरा झाकण्यापासून थांबवलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत जमावातील काही तरुण दोघांना जाब विचारताना दिसत आहेत. तरुणाला मारहाण केली जात असून, बुरखा घातलेल्या मुस्लीम तरुणीलाही खडसावत आहेत. यावेळी ते तरुणाला ‘मुस्लीम तरुणीसह फिरण्याची हिंमत कशी झाली?’ अशी विचारणा करताना दिसत आहेत. या घटनेचा…

Read More

मैसुरू : निवडणूक जाहीरनाम्यातील आणखी एका आश्वासनाची पूर्तता करताना कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने बुधवारी ‘गृहलक्ष्मी’ योजना सुरू केली. यानुसार राज्यातील सुमारे १.१ कोटी महिलांना दर महिन्याला २ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत महाराजा महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात ‘गृहलक्ष्मी’ची सुरुवात करण्यात आली. काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेल्या पाच प्रमुख हमी योजनांपैकी ही एक आहे. काँग्रेसने मे महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करून राज्यात सत्ता स्थापन केली. सिद्धरामय्या यांनी सांगिले की, काँग्रेस सरकारने पाच हमी योजनांपैकी शक्ती, गृहज्योती आणि अन्न भाग्य या तीन योजना याआधीच सुरू…

Read More