मुंबई ः प्रतिनिधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नेहमीच त्याच्या खेळाबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. जितका मन लावून तो क्रिकेट खेळतो किंवा क्रिकेटचे सामने बघतो तितकेच मन लावून तो एखाद्या कलेचंही सादरीकरण बघतो.तो कलाप्रेमी आहे.नुकतीच एका लोकप्रिय मराठी शास्त्रीय गायिकेला सचिन तेंडुलकर आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींसाठी खासगी मैफिल करण्याची संधी मिळाली. त्याचा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर करत सचिन तेंडुलकर आणि अंजली यांचा स्वभाव कसा आहे हे सांगितले. बेला शेंडेची बहिण लोकप्रिय शास्त्रीय गायिका सावनी शेंडे सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या कार्यक्रमाबद्दल आणि कार्यक्रमांदरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल चाहत्यांना अपडेट्स देत असते. नुकतीच तिला खास सचिन तेंडुलकरसमोर गायची संधी मिळाली. यादरम्यानचा अनुभव…
Author: saimat
पुणे : प्रतिनिधी राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबतचा जीआर काढल्यानंतर सर्वच स्तरातून सरकारवर टीका केली जात आहे. संबंधित भरती तात्पुरत्या स्वरुपाची असेल, असें सरकारकडून सांगण्यात आले आहे. कंत्राटी नोकरभरतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. दोन-चार लोकांच्या खासगी कंपन्यांना लाभ देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला. ‘एक्स’वर (ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले, “एखाद्या कंपनीने शासनाला कंत्राटी नोकरदार पुरवठा केला, तर शासनाने त्या कंपनीला सर्व्हिस चार्ज किती द्यायला पाहिजे? आपले गंभीर आणि काटकसर करणारे सरकार खाजगी कंपन्यांना १५ टक्के सर्व्हिस चार्ज देते. एखाद्या कंत्राटी नोकरदाराला १०००० रुपये…
संभाजीनगर ः मराठवाड्यात कॅबिनेटची जी बैठक पार पडते आहे त्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे असे म्हटले आहे. मराठवाड्यात जाऊन फक्त घोषणा करतील बाकी काहीच नाही असे त्यांनी म्हटले आहे. तर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही अशीच टीका केली आहे. या सरकारकडून फक्त घोषणाबाजी सुरु आहे, मराठवाड्यातही तशाच घोषणा दिल्या जातील, ५० हजार कोटींचे पॅकेज वगैरे जाहीर केले जाईल. प्रत्यक्षात कुठलीही योजना अमलात येणार नाही असे आदित्य ठाकरेेंनी म्हटले आहे. या सगळ्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. “मंत्रिमंडळाची याआधीची जी बैठक आम्ही संभाजी नगरमध्ये घेतली होती…
कोल्हापूर ः महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारने ३० एप्रिल २०२४ पर्यंत परराज्यात ऊस निर्यात करण्यास बंदी घातली आहे. संबंधित सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्याबाहेर ऊस निर्यात करता येणार नसल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.या निर्णयामुळे कर्नाटकमध्ये होणारी ऊसाची संभाव्य निर्यात थांबण्यास मदत होऊन राज्यात पिकणारा ऊस हा इथल्याच साखर कारखान्यांमध्ये पोहोचवला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान,राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध होत आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या निर्णयावरून राज्य सरकारला इशारा दिला आहे. राजू शेट्टी म्हणाले, हा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा आहे. गेल्या ३ वर्षांपासून राज्यातल्या साखर कारखान्यांकडून हिशेब घ्या अशी मागणी…
मुंबई ः प्रतिनिधी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ची राज्य कार्यकारणी घोषीत झाली असून त्यात उत्तर महाराष्ट्रमधून साईमतचे संपादक प्रमोद बऱ्हाटे,सुरेश उज्जेनवाल, संदीप महाजन, प्रशांत शर्मा, नरेश होळणार, प्रमोद बऱ्हाटे यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. देशभरात अल्पावधीत नावारूपास येऊन सुमारे छत्तीस हजार पत्रकार सदस्य असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के केली आहे. संघटनेच्या कार्याध्यक्षपदी नंदकुमार सुतार, संतोष शाळीग्राम यांना संधी देण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी विलास आठवले, तुकाराम झाडे, प्रकाश कथले, जयप्रकाश दगडे यांची निवड करण्यात आली आहे. दुर्गेश सोनार आणि ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या शिक्षण विभागाचे मुख्य समन्वयक…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील नॅशनल हायवे क्रमांक ६ या रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन कोंडी होत आहे. तसेच काही ठिकाणी अपघात होत आहेत. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेत काही ठिकाणचे खड्डे बुजविले. मात्र, खड्डे मोठ्या संख्येने असल्याने पोलिसांची अडचण झाली. त्यामुळे तत्काळ खड्डे बुजवून रस्ता दुरुस्ती करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र तसेच जळगाव जागा यात्रा आणि निवेदन देऊन प्रशासनाकडे पाठपुरावा सादर केलेला आहे. त्यानुसार तात्पुरती उपाययोजना म्हणून काही ठिकाणी खडी, मुरूम टाकण्यात आला आहे. मात्र, अनेक रस्त्यांवर अद्याप खड्डे आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जळगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी केले…
गडचिरोली : जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या एका महिला नेत्याची पतीने निर्घृणपणे हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या सगळ्या प्रकारानंतर गडचिरोलीत खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गडचिरोलीच्या कुरखेडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद हिची तिच्या पतीने चाकूने भोसकून हत्या केली आहे. हा थरार मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास राहतच्या वडिलांनी उठून पाहिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर आरोपी पतीने पोलीस ठाण्यात जात या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून…
गोहआटी ः वृत्तसंस्था ओडिशा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एस. मुरलीधर यांनी सध्या राजकारण आणि न्यायालयांचे कामकाज यांची सरमिसळ होत असल्याचे मत व्यक्त केले. “न्यायाधीश स्वतःला तटस्थ समजत असले, तरी त्यांच्याकडून राजकीय निवड होते,” असे स्पष्ट मत मुरलीधर यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी (१४ सप्टेंबर) गौतम भाटिया यांचे पुस्तक ‘अनसिल्ड कव्हर्स : द डिकेड ऑफ द कॉन्स्टीट्युशन, द कोर्ट्स अँड द स्टेट’च्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. माजी न्यायमूर्ती एस. मुरलीधर म्हणाले, “न्यायाधीश कुठून येतात? गौतम यांचे पुस्तक न्यायाधीश निश्चित स्थानांवरून आले आहेत हे सांगतात. हे पुस्तक तुम्हाला सांगते की, कायदेशीर प्रश्न म्हणून अनेक राजकीय मुद्दे न्यायालयात येत आहेत. उदाहरणार्थ, हिजाब…
त्रिअनंतपूरम ः निपा विषाणूचा संसर्ग केरळमध्ये वाढत असून आज पुन्हा एका बाधिताची नोंद झाली आहे. त्यामुळे केरळमध्ये निपा बाधितांची एकूण संख्या सहा झाली आहे.त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून चौघांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये एक नऊ वर्षांचा मुलगाही आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. नव्याने बाधित झालेला रुग्ण ३९ वर्षीय असून त्याच्यावर कोझिकोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी संशयित रुग्णांची चाचणी केली होती. या संशयित ११ बाधितांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. निरीक्षणाखाली असलेल्या रुग्णांची संख्या ९५० वर पोहोचली आहे. त्यापैकी २३१ रुग्ण अतिजोखमीच्या श्रेणीतील असून २१ रुग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान,राज्य सरकारने कोझिकोड जिल्ह्यात प्रतिबंधात्मक…
अलिबाग ः दुसरे लग्न केले म्हणून मानसिक त्रास देणाऱ्या बायकोला निर्जन स्थळी नेऊन तिचा खून केल्याची घटना सुधागड पाली तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी नवऱ्याला जेरबंद केले आहे.सागर किसन पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ९ सप्टेंबरला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उंबरवाडी येथे जंगलभागात अनोळखी महिलेचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता.या घटनेनंतर पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. प्राथमिक तपासात सदर महिलेचा खून करून तिचा मृतदेह पाच ते सहा दिवसापूर्वी जंगलात टाकला असल्याचे दिसून आले. ही बाब लक्षात घेऊन पोलीसांनी गेल्या दिवसात बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती घेतली. त्यात आरड्याची वाडी येथून कुसबा…