Author: saimat

शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांसह इतर विकास कामांचा समावेश साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : येथील नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात अजून पाच कोटींच्या विकासकामांना मंजुरी तथा प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यातून महत्त्वपूर्ण रस्त्यांसह इतर विकास कामे मार्गी लागणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत सुवर्ण जयंती नगरोथान महाअभियान आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलीत वस्ती सुधार योजनेतून ही कामे मंजूर झाली आहेत. त्यात प्रामुख्याने अत्यंत दुरवस्था झालेल्या रेल्वे उड्डाणपूल ते बंगाली फाईलकडून विप्रो कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यांचा समावेश असल्याने या परिसरासह बोरी काठच्या गावांची सोय होणार आहे. तसेच बस स्टँड शेजारील अत्यंत दयनीय अवस्था झालेला गांधी नगरचा रस्ता…

Read More

सहकार महर्षी रामभाऊ जिभाऊ पाटील यांच्या जयंती निमित्ताने चाळीसगाव येथे ११.६९ कोटींच्या भव्य कृषी भवनाचे भूमिपूजन संपन्न साईमत/चाळीसगाव /प्रतिनिधी : तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ जिभाऊ पाटील यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या शेतकरी हिताच्या कार्याला आदरांजली म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांनी ११ कोटी ६९ लक्ष निधीतून साकारण्यात येत असलेल्या जळगाव भव्य अश्या कृषीभवनाचे भूमिपूजन करत तालुक्यातील ५०० प्रगतिशील शेतकऱ्यांचा सपत्नीक आदर्श शेतकरी म्हणून सन्मान केला. यावेळी माजी आमदार साहेबराव घोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर जळकेकर महाराज. केळीतज्ञ – श्री. के. बी. पाटील (जैन इरिगेशन), जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी, से. नि. कृषी संचालक- श्री. अनिल भोकरे, राज्य पुरस्कार प्राप्त कृषी भुषण…

Read More

राज्यपालांच्या हस्ते मंत्र्याच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान साईमत/पारोळा/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन कृषी विभागाने नव्याने सुरू केलेल्या “युवा शेतकरी पुरस्काराचा” नाशिक विभागातून पहिलाच पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मल्हार कुंभार या युवा शेतकऱ्यास मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, अजित पवार व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार नुकताच देण्यात आला. आपल्या शेतात नाविन्यपूर्ण प्रयोग राबवून यश संपादित केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत नुकताच मुंबई येथे पार पडला. या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील चोरवड या गावातील कृषी पदवीधर असलेले तरुण शेतकरी मल्हार प्रल्हाद कुंभार यांना शासनाने नव्यानेच सुरू केलेल्या युवा शेतकरी हा पहिलाच नाशिक विभागातून…

Read More

चित्र रेखाटण्यासाठी पोस्टर कलरचा केला वापर साईमत/जळगाव/प्रतिनिधी : श्रीरामाच्या वहीच्या कागदापासून बनवलेली इष्टिका (कागदापासून बनवलेली विट) व कुलस्वामी देवीचे मनमोहक असे चित्र चित्रकार सुनिल दाभाडे कलाशिक्षक मानव सेवा विद्यालय जळगाव यांनी रेखाटलेले आहे.इष्टिका (कागदापासून बनवलेली विट) बनविण्यासाठी पाच नोटबुकचा वापर केलेला आहे. नोटबुकचा लगदा तयार करून त्यापासून इष्टिका तयार करण्यात आली. त्यानंतर पंधरा मिनिटात देवीचे सुंदर चित्र रेखाटण्यात आले. चित्र रेखाटण्यासाठी पोस्टर कलरचा वापर करण्यात आला. असे नवनवीन कल्पनाचा वापर करुन सुनील दाभाडे नेहमी विविध वस्तूवर चित्र रेखाटत असतात. या इष्टकेवरील चित्राचे व सुनील दाभाडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read More

प. वि. पाटील विद्यालयाची ‘गांधी तीर्थ’ला भेट साईमत/जळगाव/न.प्र.: के.सी.ई.सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून जैन व्हॅली येथे महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘गांधी तीर्थ’ म्युझियमला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी बालपणाच्या मोहनपासून ते महात्मा गांधी पर्यंतचा जीवनप्रवास अनुभवला. महात्मा गांधी यांच्या जीवनातील विविध प्रसंग व्हिडिओ ग्राफिक्स, ऑडिओ क्लिप, चार्ट, चित्र तथा मॉडेल्स पाहून विद्यार्थी भारावून गेले. जैन व्हॅलीच्या निसर्गरम्य वातावरणाचाही विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. भेटीचे आयोजन मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक योगेश भालेराव, योगेश पाटील, गायत्री पवार यांनी केले.

Read More

मनपात आयसीटी बेस टेक्नॉलॉजीचा वापरावर प्रशिक्षण कार्यशाळा साईमत/जळगाव/न.प्र.: ‘स्वच्छता ही सेवा’ २०२४ उपक्रमांतर्गत जळगाव शहर महानगरपालिकेमार्फत मनपाच्या सभागृहात आयसीटी बेस टेक्नॉलॉजीचा वापर करण्याबाबत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त अविनाश गांगोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सफाई कर्मचारी, घंटागाडी चालक, मदतनीस, मोकादम, स्वच्छता निरीक्षक यांना आयसीटी तंत्रज्ञानाच्या वापराबाबत आयटीआय कंपनी लिमीटेड यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात आले.कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्तउदय पाटील, मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, जितेंद्र किरंगे, नागेश्वर लोखंडे, शहर समन्वयक राजेश रमण पाटील, प्रशिक्षक आशिष कुलकर्णी, पर्यवेक्षक दिनेश चौधरी, मनपाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्तअविनाश गांगोडे यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच वॉटर ग्रेस कर्मचारी यांना कचरा…

Read More

पिंपरुडला पंडित दीनदयाल उपाध्याय आदिवासी मुला-मुलींची अनुदानित आश्रमशाळेत महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साईमत/फैजपूर/प्रतिनिधी : पंडित दीनदयाल उपाध्याय आदिवासी मुला-मुलींचे अनुदानित आश्रमशाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती प्रतिमा पूजन करुन उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक रामदास बैरागी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन नेहेते उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे आणि शिक्षक वृंद यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापका यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचा जीवनपट तसेच स्वच्छतेचे आणि स्वावलंबनाचे अहिंसेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमानंतर शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र- मैत्रिणी यांनी…

Read More

आ. मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश, नवरात्रोत्सवाच्या पर्वणीवर तालुकावासियांनी अनोखी भेट साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी तालुक्यातील मुलभूत सुविधांसाठीच नाही तर सांस्कृतिक, धार्मिक व पर्यटन विकासासाठीही हजारो कोटींच्या विकास निधीचा ओघ वाहत ठेवणा-या आ. मंगेश चव्हाण यांनी पाटणादेवी परिसराच्या वैविध्यपूर्ण विकासासाठी २० कोटी रुपयांचा निधी मिळवित तालुकावासियांना नवरात्रोत्सवाच्या पर्वणीवर अनोखी भेट दिली आहे. यामुळे या पुरातन तीर्थ व पर्यटनक्षेत्राचा कायापालट होणार आहे. खान्देशातील एक प्रमुख धार्मिक व पर्यटन क्षेत्र असा यास्थळाचा लौकीक असून तो अजून वाढणार आहे. पाटणादेवी हे चाळीसगाव तालुकावासियांचेच नव्हे तर अवघ्या खान्देशवासियांचेही कुलदैवत आहे. नवसाला पावणारी असे माता चंडिकेचे अधिष्ठान असून थोर गणितीतज्ञ भास्कराचार्य यांची ही तपोभूमी आहे. पुराणकाळापासूनच यापरिसराचे मोठे…

Read More

चांदसरकर विद्यामंदिर शाळेत राष्ट्रपिता म.गांधी, लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन साईमत/जळगाव/न.प्र.: साने गुरुजी कॉलनीतील खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै.गि.न.चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिर शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात सर्व प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चेतना महाजन, सुनीता सिमाले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनाविषयी आपल्या भाषणातून सांगितले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्याम ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे औचित्य साधून निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे…

Read More

स्मृतींना आवडीच्या संगीत मैफिलीद्वारे दिला उजाळा साईमत/जळगाव/न.प्र.: ‘नाम गुम जाएगा,चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज ही पहचान है…’ अशी सार्थ साद देत स्व. आर. बी. (नाना) पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आर. डी. बर्मन – नाना संगीत मैफिलचे मित्र परिवारातर्फे नेचर कॅफे, कन्या शाळेसमोर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आर. बी. नाना नावाने सर्वाना परिचित असणारे नाना एस. टी. महामंडळातून अकाऊंटट पदावर सेवानिवृत्त झाल्यानंतर ते मराठा मंगल या विवाह संस्थेच्या माध्यमातून सेवाभाव जपणारे, आणि यशदा पुणे यांचे माहिती (RTI) प्रचार आणि प्रसार व माहिती अधिकार क्लिनिक मोफत चालवून सामाजिक जीवनात सक्रियपणे हिरीरीने कार्यरत होते. तसेच नाना हे संगित क्षेत्राची प्रचंड आवड…

Read More