गुड शेपर्ड अकॅडमीच्या प्रसाद पाटीलची राज्यस्तरीय कला स्पर्धेसाठी निवड साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी जळगाव येथे नूतन मराठा महाविद्यालयात कला स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत समूहगीत गायन, पारंपरिक कथा वाचन,शास्त्रीय सुरवाद्य वादन अशा कलाप्रकारात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सुरवाद्य वादन कला प्रकारात गुड शेफर्ड शाळेतील दहावीचा विद्यार्थी प्रसाद केशव पाटील याने प्रथम क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांची राज्यस्तरासाठी जळगाव जिल्ह्यातून निवड झाली आहे. सहभागी विद्यार्थ्यांना शाळेचे संगीत शिक्षक तुषार मुजुमदार तसेच गौरव काळंगे, अजिंक्य त्रिभुवन यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक…
Author: saimat
पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे फळ मिळाल्याने लागली वर्णी साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना नेते उमेश गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांच्या हस्ते चाळीसगाव शहर प्रमुखपदी सागर रावण चौधरी यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. सागर चौधरी हे शिवसेना पक्षाचे २०१४ पासून ते आजपर्यंत एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. तसेच स्व.पप्पूदादा गुंजाळ यांचे खंदे समर्थक म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असून तालुक्यात शिवसेना पक्ष बांधणीसाठी मोलाचा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे फळ शिवसेना शिंदे गट जळगाव जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांनी सागर चौधरी यांची शहरप्रमुख पदावर वर्णी लागली आहे. जळगाव जिल्हाप्रमुख…
एक लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त साईमत/जळगाव/प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात बकाऱ्या चोरीचे प्रमाण वाढले असल्याने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेश दिले होते. त्यावर बबन आव्हाड यांनी पीएसआय गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, पो.ह. संदीप पाटील, हरीलाल पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, महेश पाटील, सागर पाटील, ईश्वर पाटील, दीपक चौधरी अश्यांचे पथक तयार केले होते. नमुद पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी तांत्रिक व गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली की, चाळीसगाव ग्रामीण पो.स्टे. दाखल गु.र.क्र. २८१/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे दाखल गुन्हा हा भवाळी, ता. चाळीसगाव येथील…
११ लाख ८२ हजार रुपयांचा घातला गंडा, सायबर पोलिसात गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी तालुक्यातील ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या वाढल्या आहेत.ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली अनेकांना लाखोंचा चुना लावला जात असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहे. आता असाच एक प्रकार जळगावमधून समोर आला आहे. शेअर मार्केटमध्ये चांगल्या नफ्याचे आमिष दाखवून संजय राजाराम वसतकार (वय ४२, रा. एसएमआयटी कॉलेज) यांना ११ लाख ८२ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी वसतकार यांच्या तक्रारीनुसार सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. एसएमआयटी कॉलेज परिसरातील संजय वसतकार हे ऑनलाइन ट्रेडिंग करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. जुलैत त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केले होते. त्या ग्रुपमध्येअॅडमिन नारायण जिंदाल व चिन्मयी रेड्डी नामक…
मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद साईमत/जळगाव/प्रतिनिधी राज्यासह जळगाव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सातत्याने समोर येत आहे. अशातच कर्जफेडीच्या विवंचनेत असलेल्या तरुण शेतकऱ्याने शेतात जाऊन विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव येथे ही घटना घडली आहे. सुरेश ओंकार विटे (वय ४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मुक्ताईनगरातील रिगाव येथील सुरेश ओंकार विटे यांची शेती आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. शेतीसाठी पीक कर्ज काढले असताना सततची नापिकीमुले कर्ज फेडू शकत नाही. डोक्यावर असलेल्या कर्जामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. सुरेश विटे हे नेहमीप्रमाणे दोन ऑक्टोबरला…
जिल्हाधिकारी कार्यालयात ७ ऑक्टोबरला लोकशाही दिनाचे आयोजन साईमत/जळगाव/प्रतिनिधी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार ऑक्टोंबर महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 7 ऑक्टोंबर, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदर अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल, अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
पुतळ्यांची उंची, वजन माहित नसताना चबुतऱ्याचे काम कसे सुरु?, नवीन पुतळे विराजमान झाल्याशिवाय जुन्या स्मारकांना हात लावू देणार नाही साईमत/धरणगाव/प्रतिनिधी : धरणगावातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना शासनाची परवानगी व निधी संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत सकल मराठा समाज आणि बौद्ध समाजाची शहरात संयुक्त पत्रकार परिषद झाली. माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांसंदर्भात माहिती अधिकारातून कागदपत्र मिळवले आहेत. याबाबत पत्रकार परिषदेत लेखी पुरावे सादर करत खळबळ उडवून दिली आहे. यावेळी मराठे समाज अध्यक्ष भरत मराठे, बौद्ध समाजाचे गोवर्धन सोनवणे, साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे, मराठा नेते जानकीराम पाटील, गोपाल…
तिर्थक्षेत्री मुक्ताईनगरला संत मुक्ताई जन्मोत्सव उत्साहात साजरा साईमत/मुक्ताईनगर /प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर आधी चौघा भावंडांमध्ये अतिशय लडिवाळ असलेल्या आदिशक्ती संत मुक्ताबाई या वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ संत, आपल्या परखड अभंग वाणीतून थोर कवयित्री म्हणून ओळख असणाऱ्या मुक्ताबाई यांचा अश्विन मासातील नवरात्रोत्सवात अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापना शुभदिनी अवतीर्ण झाल्याने मुक्ताई साहेबांचा हा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्याचा निश्चय करून श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तापी पूर्णा परिसर सेवेकरांतर्फे परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताई चंडी सेवा अंतर्गत सामूहिक दुर्गा सप्तशती पाठाचे आयोजन केले होते. सामूहिक पारायण सोहळ्यात हजारो सेवेकरी…
गांधीजींचे विचार अन् त्यांचा जीवन प्रवासावर झाले मार्गदर्शन साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात मेंटल, मोरल आणि सोशियल सायन्स असोसिएशन आणि राष्ट्रीय सेवा योजना एकक यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधीजी यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही.पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे उपस्थित होते. प्रमुख वक्ते प्रा. वंदना नेमाडे यांनी गांधीजींचे विचार आणि त्यांचा जीवन प्रवासावर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी महात्मा गांधीजींनी केलेले चंपारण्य सत्याग्रह, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ इत्यादी बाबतीत सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस. व्ही.पाटील यांनी महात्मा गांधीजींचे…
प्रभागातील १५ जोडप्यांच्या हातून आदिशक्तीची विधीवत पूजा साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त माजी नगरसेवक नंदकिशोर बाविस्कर व अजिंक्य बाविस्कर यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या आदिशक्तीच्या आरत्यांचा व माहितीचा संग्रह असणाऱ्या पुस्तिकेचे घटस्थापनेच्या दिवशी आनंदा माता मंदिर, सराफ बाजार येथे माजी खासदार उन्मेष पाटील आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर प्रभागातील १५ जोडप्यांच्या हातून आदिशक्तीची विधीवत पूजा अर्चा करून महाआरती करण्यात आली. याप्रसंगी माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, शिवसेना नेते मोरसिंग राठोड, शिवसेना तालुकप्रमुख रमेश चव्हाण, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, मा. नगरसेवक शाम देशमुख, मा. नगरसेवक रामचंद्र जाधव, तालुका संघटक…