आ. अनिल पाटील यांचा पाठपुरावा यशस्वी साईमत /अमळनेर / प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या २०२६–२७ च्या अर्थसंकल्पात अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाल्याची आनंदाची माहिती आमदार आ. अनिल पाटील यांनी दिली. या निधीतून मतदारसंघातील महत्त्वाच्या रस्त्यांची दुरुस्ती, मजबुतीकरण तसेच इतर पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळणार असून स्थानिक विकासाला चालना मिळेल, असे आमदार पाटील यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अमळनेर मतदारसंघात सातत्याने विकासकामांचा आलेख वाढत असल्याचे दिसून येत आहे. रस्ते, पूल तसेच इतर पायाभूत सुविधांची अनेक कामे पूर्ण झाली असून काही कामे वेगाने सुरू आहेत. यामुळे मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलत असल्याचे स्थानिक नागरिकांकडूनही नमूद…
Author: saimat
मुख्य मार्गांचे काँक्रिटीकरण होणार; जळगावसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद साईमत/जळगाव/प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला. २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात जळगाव शहरासाठी तब्बल २२.५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण होणार असून नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित रस्त्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. या निधीची माहिती आमदार राजूमामा भोळे यांनी दिली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जळगाव शहरातील विकासकामांना गती मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत शहरातील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा…
होळीला घर बंद, चोरट्यांची संधी; शिक्षक कॉलनीत १.६८ लाखांची घरफोडी साईमत/जामनेर/प्रतिनिधी शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या शिक्षक कॉलनीत घरफोडीची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. होळीच्या सणानिमित्त कुटुंबासह गावी गेलेल्या घरमालकाच्या अनुपस्थितीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे १ लाख ६८ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या घटनेतील संशयित चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात राहणारे दरबार नवलसिंग राठोड हे आपल्या कुटुंबासह येथे वास्तव्यास आहेत. होळीच्या सणानिमित्त ते संपूर्ण कुटुंबासह गावी गेले होते. घर बंद असल्याची माहिती मिळताच…
काळाचा घाला भीषण अपघातात तिघे जागीच ठार, तीन जखमी साईमत/मालेगाव/प्रतिनिधी होळीच्या सणाच्या आनंदाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड गावातील नाफडे कुटुंबावर शुक्रवारी सकाळी ६ मार्च रोजी काळाचा भीषण घाला आला. मालेगाव परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात चार वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सातोड गाव हळहळेत बुडाले आहे. होळीच्या सणासाठी परतीच्या प्रवासात अपघात सातोड येथील नाफडे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी नाशिक येथे वास्तव्यास आहे. होळीच्या सणानिमित्त कुलदैवताचे दर्शन घेऊन ते नाशिकहून आपल्या मूळ गावी सातोडकडे खाजगी वाहनाने प्रवास करत होते. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मालेगाव परिसरात त्यांच्या वाहनाला…
युवकाने घराच्या छताला गळफास घेऊन घेतले आयुष्य संपवण्याचे टोकाचे पाऊल, कारण अद्याप अस्पष्ट साईमत/यावल/प्रतिनिधी यावल तालुक्यातील हंबर्डी गावात एका विवाहित तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना ५ मार्च रोजी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास घडली. मृतक नितीन सुधाकर मेढे (वय ३४, रा. हंबर्डी) यांनी घराच्या छताला नायलॉन पट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले. घरातील सदस्यांना ही बाब लक्षात आल्यावर परिसरात एकच खळबळ उडाली आणि शोककळा पसरली. अद्याप नितीन मेढे यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर कुटुंबीयांना मनोवैज्ञानिक आणि भावनिक धक्का बसला असून संपूर्ण गावात…
मानसिक त्रासाने जीवन उजाडले भातखेड्यात धक्कादायक घटना साईमत/जळगाव, एरंडोल ता/प्रतिनिधी: भातखेडा येथील गौरव ज्ञानेश्वर बडगुजर (वय २३) या तरुणाने सतत होणाऱ्या सासरच्या मानसिक छळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली, अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे. मृत्यूपुर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये गौरवने आपल्या सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाचा सविस्तर उल्लेख केला असून, या प्रकारातील जबाबदार व्यक्तींची नावे नमूद केली आहेत. सुसाईड नोटमधील धक्कादायक खुलासे गौरवने लिहिलेल्या नोटमध्ये सासू अनिता बडगुजर, साडू भटू गरुड आणि साली गौरी गरुड यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या मानसिक छळाचा सविस्तर उल्लेख केला आहे. त्याने सांगितले की, सतत पैशांची मागणी, धमक्या आणि मानसिक दबावामुळे तो अत्यंत त्रस्त झाला होता. “हे सगळं सहन करता…
शासकीय दंड न भरलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव तहसील कार्यालयात साईमत/जळगाव/प्रतिनिधी जळगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने कारवाईचा वेग वाढवला असून, या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या ३४ वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. हा लिलाव १२ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, जळगाव येथे पार पडेल. महसूल विभागाकडून अवैध वाळू वाहतुकीवर सातत्याने कारवाई केली जात असून, जप्त केलेली वाहने सध्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात व आकाशवाणी चौक, जळगाव येथे ठेवण्यात आली आहेत. संबंधित वाहनमालकांना शासकीय नियमांनुसार दंड भरावा, अशी सूचना देण्यात आली होती; मात्र, अनेकांनी अद्याप दंड भरणे टाळल्यामुळे प्रशासनाने या वाहनांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.…
अचानक रस्त्यावर आलेल्या कुत्र्यामुळे अपघात तरुणाचा मृत्यू साईमत/यावल /प्रतिनिधी तालुक्यातील साकळी फाट्याजवळ बुधवारी रात्री झालेल्या दुचाकी अपघातात लोहाराच्या ३५ वर्षीय जुल्फिकार ईसा तडवी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक माहिती नुसार, रस्त्यावर अचानक आलेल्या कुत्र्यामुळे त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि गंभीर अपघात झाला. यावल पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुल्फिकार तडवी (वय ३५, रा. लोहारा, ता. रावेर, जि. जळगाव) हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच-१९ डीजी-९५२३ वरून यावल ते मोहना मार्गावर जात होते. बुधवारी (४ मार्च) रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास साकळी फाटा परिसरात त्यांच्या दुचाकीसमोर अचानक कुत्रा आला, ज्यामुळे नियंत्रण सुटले आणि ते गंभीरपणे जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने जुल्फिकार…
महापौर दीपमाला काळे आदेशाने सुरू शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि महामार्गावरील अपघातांचा धोका लक्षात घेता महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील मुख्य महामार्ग तसेच त्यावरील समांतर रस्ते तात्काळ अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला पुढील दोन ते तीन दिवसांत ही कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, रस्ते पूर्णपणे मोकळे करण्यावर भर दिला जात आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. परंतु महामार्गालगत असलेल्या समांतर रस्त्यांवर अनेक ठिकाणी झालेले अतिक्रमण नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरत आहे. यामुळे वाहतूक कोंडी अधिक गंभीर बनली असून अपघातांचा धोकाही वाढत आहे. महापौर काळे यांनी तातडीने बैठक…
इस्रायल–इराण संघर्षात भारतीय तरुणही बळी साईमत वृत्तसेवा ओमानच्या मस्कत किनारपट्टीपासून ५२ नॉटिकल माईल्सवर एमकेडी व्हायॉम (MKD Vyom) या ऑईल टँकरवर झालेल्या भीषण ड्रोन हल्ल्यात २५ वर्षीय दीक्षित सोळंकीचा मृत्यू झाला. दीक्षित सोळंकी हा मूळचा दीवचा रहिवासी असून, मुंबईत कांदिवलीत स्थायिक होता. हल्ल्यात बिहार आणि राजस्थान येथील आणखी दोन भारतीयांचा मृत्यू झाला असून, ओमानमधील भारतीय दूतावासाने या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. टँकरवरील एकूण २५ क्रू मेंबर्समध्ये १६ भारतीय आणि चार बांगलादेशी नागरिक होते, जे सुरक्षित रितीने सुटले आहेत. दीक्षित सोळंकी मच्छिमार व्यवसायिक अमृतलाल सोळंकी यांचा धाकटा मुलगा होता. त्याची आई महिन्याभरापूर्वी निधन पावली होती, ज्यामुळे तो दीवला आले आणि…