Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ
    क्राईम

    Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ

    saimatBy saimatMarch 7, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jamner: Burglary incident in Jamner city; stir in Teachers Colony
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    होळीला घर बंद, चोरट्यांची संधी; शिक्षक कॉलनीत १.६८ लाखांची घरफोडी

    साईमत/जामनेर/प्रतिनिधी

     शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या शिक्षक कॉलनीत घरफोडीची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. होळीच्या सणानिमित्त कुटुंबासह गावी गेलेल्या घरमालकाच्या अनुपस्थितीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे १ लाख ६८ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या घटनेतील संशयित चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात राहणारे दरबार नवलसिंग राठोड हे आपल्या कुटुंबासह येथे वास्तव्यास आहेत. होळीच्या सणानिमित्त ते संपूर्ण कुटुंबासह गावी गेले होते. घर बंद असल्याची माहिती मिळताच अज्ञात चोरट्यांनी संधी साधली. दिनांक ७ रोजी पहाटे सुमारे पाच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

    घरात शिरल्यानंतर चोरट्यांनी घरातील कपाटे व इतर साहित्याची झडती घेतली. त्यानंतर सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याचे उघडकीस आले. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १ लाख ६८ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने चोरीस गेले आहेत. दरम्यान, ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले असून त्याच्या आधारे पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

    ही घटना उघडकीस आल्यानंतर शिक्षक कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातच अशी घरफोडी घडल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

    या प्रकरणी घरमालक दरबार राठोड यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून लवकरच चोरट्यांना जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : बॅनरच्या वादातून थेट हल्ला मुकुंद सपकाळे जखमी

    April 11, 2026

    Shocking : प्रेमसंबंधात अडथळा ठरल्याने 6 वर्षीय चिमुकल्याची आईकडून प्रियकरासोबत निर्घृण हत्या

    April 10, 2026

    Crime News: कौटुंबिक वादाचा भयंकर परिणाम : रागाच्या भरात नवऱ्याने बायकोलाच संपवलं”

    April 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.