Author: saimat

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये महापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले साईमत/मुंबई  /प्रतिनिधी महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये महापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून, यंदा १५ महानगरपालिकांमध्ये महिला महापौरांचा शासन स्थापणार आहेत. गुरुवारी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत नगरविकास मंत्रालयात या आरक्षणाची अधिकृत घोषणा करण्यात आली. ५० टक्के महिला आरक्षण धोरणानुसार हे पाऊल राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांच्या नेतृत्वाला अधिक बळकटी देणार आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या चारही प्रमुख शहरांमध्ये महिला महापौरांसाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या शहरांचे विकास आणि निर्णय घेण्याची सूत्रे महिलांच्या हाती जाणार आहेत, असा संदेश या आरक्षणातून स्पष्ट होत आहे. आरक्षणानुसार, मुंबई,…

Read More

 १६७ शाळांमध्ये खेळासाठी नवसुविधा उभारल्या जाणार साईमत/ जळगाव /प्रतिनिधी जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास सुनिश्चित करण्यासाठी ‘पालकमंत्री क्रीडांगण विकास योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १६७ शाळांसाठी १२ कोटी १४ लाख ४० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये क्रीडासुविधांचा अभाव विद्यार्थ्यांचा खेळाकडे ओढा कमी करीत होता, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक उत्साह आणि स्पर्धात्मक वृत्तीवर होत होता. आता या योजनेमुळे विद्यार्थ्यांना नियमित खेळाची संधी उपलब्ध होणार असून शाळांमधील उपस्थिती आणि पटसंख्याही वाढण्यास मदत होणार आहे. योजनेअंतर्गत ९९ शाळांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि ६७ शाळांना प्रत्येकी ३ लाख २० हजार…

Read More

रागाच्या भरात घर सोडून गेलेली १५ वर्षीय मुलगी फक्त २४ तासांत शोधून पालकांच्या स्वाधीन करण्यात आली. साईमत/ एरंडोल (कासोदा) /प्रतिनिधी: जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेला मिळालेलं यश स्थानिक पोलीस दलासाठी गौरवाचे ठरलं आहे. कासोदा पोलीस ठाण्याच्या तत्पर कारवाईमुळे रागाच्या भरात घर सोडून गेलेली १५ वर्षीय मुलगी फक्त २४ तासांत शोधून पालकांच्या स्वाधीन करण्यात आली. सविस्तर वृत्तानुसार, मुलगी काहीही सांगितल्याशिवाय अचानक घर सोडून निघून गेली होती. घटनेची गंभीरता ओळखून कासोदा पोलीस पथकाने त्वरित तपास सुरू केला. पोलिसांनी मुलीच्या गावापासून मुख्य महामार्गापर्यंतच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली आणि जवळच्या पोलीस ठाण्यांना मुलीच्या वर्णनानुसार सूचना दिल्या. तपासादरम्यान, चाळीसगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पायी…

Read More

पत्नीच्या उपचारासाठी गुजरातला गेले, रामनगरमधील घर चोरट्यांच्या हत्यारात साईमत/एरंडोल (कासोदा)/प्रतिनिधी कासोदा येथील रामनगर भागात एका निवृत्त सोनाराचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. या चोरीत १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल गायब झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमणलाल नथू सोनार (वय ६९, रा. रामनगर, कासोदा) हे १५ जानेवारी रोजी आपल्या पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी नवसारी (गुजरात) येथे गेले होते. त्यांचे घर पाच दिवस बंद राहिले. याच काळात अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप फोडून आत प्रवेश केला. घटनास्थळी केलेल्या पाहणीनुसार, चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील १० ग्रॅम सोन्याची मंगलपोत (सुमारे ७० हजार…

Read More

जळगाव ‘हार्ट प्लस’ हॉस्पिटलमध्ये नर्सवर वैद्यकीय अधिकार्यांची छळकांडी; गंभीर धमक्या! साईमत/ जळगाव /प्रतिनिधी जळगाव शहरातील ‘हार्ट प्लस’ हॉस्पिटलमध्ये कार्यरत एका ३० वर्षीय परिचारिकेवर डॉक्टरांच्या अश्लील चाळ्यांमुळे आणि गंभीर धमक्यांमुळे खळबळ उडाली आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी डॉ. संदीप भारुडे आणि डॉ. प्रीती भारुडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित नर्स २१ जुलै २०२५ पासून २० जानेवारी २०२६ या कालावधीत डॉ. संदीप भारुडे याच्या सततच्या छेडछाडीस सामोरे गेली. त्याने हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीने अश्लील चाळे करत तिला पाठलाग केले. पीडितेने विरोध दर्शविला असता, डॉ. प्रीती भारुडे यांनी तिला “जर याबाबत कोणाला सांगितले, तर तुझ्या पतीला आणि मुलांना औषध देऊन…

Read More

शिवपुराण कथा, कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेत भाविकांनी समाधान व्यक्त केले. साईमत/ जळगाव /प्रतिनिधी गणेश जयंतीच्या पावन पर्वानिमित्त जळगाव शहरात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. शहरातील विविध भागांतील मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली असून पूजन, अभिषेक, कीर्तन, गणेश आवर्तन व महाप्रसादाच्या आयोजनामुळे संपूर्ण परिसर श्रद्धा व भक्तिभावाने भारावून गेला होता. बजरंग बोगद्याजवळील कृषी कॉलनी परिसरातील नवसाच्या गणपती मंदिरात गणेश जयंतीनिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या मंदिराचा आज २८ वा वर्धापन दिन असल्याने भाविकांचा उत्साह दुणावलेला दिसून आला. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. अनेक भाविकांनी आपल्या नवसपूर्तीच्या भावना व्यक्त करत गणरायाच्या चरणी मनोभावे प्रार्थना…

Read More

महिला ओबीसी आरक्षण जाहीर  साईमत/ जळगाव /प्रतिनिधी राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून जळगाव महानगरपालिकेसाठी महिला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण निश्चित झाले आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या निर्णयामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात महापौरपदाबाबत उत्सुकता आणि चर्चांना उधाण आले आहे. जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरल्याने महापौरपदावर भाजपचाच दावा मजबूत मानला जात आहे. मात्र, महिला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण निघाल्यामुळे आता भाजप कोणत्या महिला नेतृत्त्वाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “लाडक्या बहिणींपैकी” कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपकडून महापौरपदासाठी…

Read More

सीट बेल्ट व एअरबॅगमुळे चौघांचे प्राण वाचले साईमत/ जळगाव /प्रतिनिधी नाशिक येथे भाजप नगरसेवकांच्या गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून जळगावकडे परत येत असताना जळगावच्या माजी महापौर तथा नवनिर्वाचित नगरसेविका जयश्री महाजन आणि त्यांचे पती नगरसेवक सुनील महाजन यांच्या कारचा मालेगावजवळ भीषण अपघात झाला. बुधवारी (दि. २१) सकाळी सुमारे ७.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने महाजन दाम्पत्यासह कारमधील चौघेही जण बालंबाल बचावले. जळगाव महानगरपालिकेतील भाजपचे नवनिर्वाचित ४६ नगरसेवक गट नोंदणीसाठी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गेले होते. ही अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जयश्री महाजन व सुनील महाजन हे (एम.एच. ५२ बी ०९९९)…

Read More

५७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला साईमत/ जळगाव /प्रतिनिधी काशिनाथ चौफुली परिसरातील ओला इलेक्ट्रिक सर्व्हिस सेंटर समोर ५७ हजार रुपयांच्या बॅटरी व सुटे भागांची चोरी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपी अफझल अली शब्बीर नगरी (वय २८, रा. शिवाजी नगर, जळगाव) आणि त्याचा एक साथीदार यांना अटक केली असून, चोरी गेलेला सारा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ओला इलेक्ट्रिकच्या ३ KV क्षमतेच्या बॅटरीची किंमत ४४ हजार रुपये आणि MCU असेंब्लीची किंमत १३ हजार रुपये असून, या दोन्ही वस्तू संध्याकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० च्या दरम्यान चोरील्या गेल्या होत्या. या चोरीची फिर्याद ओला ई-मॅनेजर निलेश…

Read More

पारोळा पोलिसांनी दाखल केला गुन्हा साईमत/ पारोळा /प्रतिनिधी न्यायालयात खोटी कागदपत्रे सादर करून वारसा हक्क डावलून वडिलांच्या मालकीची शेतजमीन आणि घरफाटा बळकावल्याप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात तक्रारदार ज्योती संजय सोनार (वय ५०, रा. आसोदा, जि. जळगाव) यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात त्यांच्या दोन सख्ख्या भावांचा तसेच आईचा सहभाग असल्याचे सांगण्यात येते. तक्रारीनुसार, घटना २ सप्टेंबर २०२१ ते १८ मे २०२४ दरम्यान घडली. ज्योती सोनार यांचे भाऊ सोमनाथ विठ्ठल टोळकर (वय ४५) आणि गोविंद विठ्ठल टोळकर (वय ५२) तसेच आई शोभाबाई विठ्ठल टोळकर (वय ७२, सर्व टोळकर गल्ली, पारोळा) यांनी मिळून संगनमत करून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. संशयित आरोपींनी पारोळा…

Read More