३० हजार लाचप्रकरणी दोन तलाठ्यांना अटक साईमत/एरंडोल/प्रतिनिधी –: एरंडोल तालुक्यात महसूल विभागातील दोन तलाठ्यांनी ३० हजार रुपयांची लाच मागून स्वीकारल्याचा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे. ही कारवाई रंगेहात पकडण्यात आल्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधात एसीबीने पुन्हा एकदा कठोर संदेश दिला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्रांतर्गत जळगाव घटकाने ही कारवाई केली. कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १८/२०२६ नोंदविला गेला असून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ व १२ अन्वये दोन्ही तलाठ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. आरोपी म्हणून नरेश भास्कर शिरूड (वय ४१), तलाठी सजा उत्राण अहिर हद्द, ता. एरंडोल व शिवाजी एकनाथ घोलप (वय ४६),…
Author: saimat
महाराष्ट्रात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा, आज राज्यभर शासकीय सुट्टी साईमत/ जळगाव/प्रतिनिधी –: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाल्याची माहिती समोर आली असून, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या अत्यंत दुःखद पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने तातडीने निर्णय घेत आज बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण राज्यात शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. तसेच तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यपालांच्या निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे. या निर्णयानुसार दुखवट्याच्या कालावधीत राज्यातील ज्या शासकीय व निमशासकीय इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार आहे.…
६ फेब्रुवारीला जळगाव महापालिकेत महापौर-उपमहापौर निवडीची प्रक्रिया साईमत/ जळगाव/प्रतिनिधी –: जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी ६ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत नवनिर्वाचित सदस्यांमधून महापौर व उपमहापौर निवडले जाणार आहेत. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार, या विशेष बैठकीचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैठकीत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील सर्व तरतुदींचे काटेकोर पालन करुन कार्यवाही पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, बैठकीचे संपूर्ण इतिवृत्त महानगरपालिकेच्या नोंदवहीत नोंदवून सविस्तर अहवाल सादर करणे हे देखील पीठासीन अधिकाऱ्याचे कर्तव्य राहणार आहे. यापूर्वी,…
सावखेडा शिवारातील लेण्याद्री कॉलनीत बंद घर फोडून चोऱ्या साईमत/ जळगाव /प्रतिनिधी – शहरातील घरफोडीच्या घटनांचा सत्र दिवसेंदिवस वाढत चालला असून, सावखेडा शिवार परिसरातील लेण्याद्री कॉलनीतील एका बंद घराचे कुलूप फोडून चोरट्यांनी तब्बल ३० हजार रुपयांच्या वस्तू लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी निलेश परमेश्वर राजपूत (वय ४३, रा. मोहाडी, ता. जामनेर, ह.मु. सावखेडा शिवार) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते गेल्या एका वर्षापासून जळगाव येथील लेण्याद्री कॉलनी, गट क्रमांक १६०, प्लॉट क्रमांक ३९ मधील घरात वास्तव्यास आहेत. दि. १५ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांनी घराचे दरवाजे कुलूप लावून शेतीच्या कामासाठी मूळ गावी मोहाडी येथे रवाना झाले होते.…
बाजारपेठेत विक्रेत्यांची धावपळ, थंडी आणि आरोग्यावर चिंता साईमत/जळगाव/प्रतिनिधी – मंगळवारी, २७ जानेवारी रोजी जळगाव शहरासह जिल्हाभरात अचानक अवकाळी पाऊस पडल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनात खळबळ उडाली. कडाक्याची थंडी अपेक्षित असताना सायंकाळी सुमारे पाच वाजता आकाशात काळे ढग दाटले आणि जोरदार पावसाने अचानक हजेरी लावली. कोणतीही पूर्वसूचना नसल्यामुळे शहरातील नागरिक आणि वाहनस्वार या अचानक परिस्थितीमध्ये अडकले. सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील टॉवर चौक, आकाशवाणी चौक आणि गोलाणी मार्केट परिसरात नागरिकांची आणि दुचाकीस्वारांची धावपळ पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी गटारी तुंबल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले, तर काही ठिकाणी वाहतुकीला त्रास झाला. या पावसाचा सर्वात मोठा फटका शहरातील लहान विक्रेत्यांना बसला आहे. रस्त्यांवर बसणाऱ्या फळविक्रेत्यांचे फळे…
‘लाडक्या बहिणीं’चा संयम सुटला दोन महिने उलटूनही हप्ता न मिळाल्याने महिला व बालकल्याण कार्यालयावर धडक साईमत/ जळगाव/प्रतिनिधी – राज्य सरकारची महिलांसाठीची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जळगाव जिल्ह्यात सध्या तीव्र वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हप्त्याची रक्कम न मिळाल्याने संतप्त झालेल्या लाभार्थी महिलांनी आज थेट जळगाव येथील महिला व बालकल्याण विकास विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. अचानक झालेल्या या गर्दीमुळे कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यातील हजारो महिलांनी या योजनेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे, तांत्रिक प्रक्रिया तसेच केवायसी पूर्ण करूनही त्यांच्या बँक खात्यात अद्याप अनुदान जमा झालेले नाही, अशी तक्रार आहे. या संदर्भात विचारणा…
पावती फाडण्यावरून वाद, हॉटेलमध्ये घुसखोरी करून उन्माद साईमत/ पाचोरा/प्रतिनिधी – पाचोरा शहरातील हॉटेल ‘भाग्यलक्ष्मी पॅलेस’ तसेच हॉटेल दाजीबा पॅलेस येथे शिवजयंतीच्या पावतीवरून झालेल्या वादातून काही जणांनी जबरदस्तीने घुसून तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करून व्यापाऱ्यांना धमकावण्याच्या प्रवृत्तीमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, हॉटेलचे संचालक तुषार मराठे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे थेट न्यायाची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्ती हॉटेल भाग्यलक्ष्मी पॅलेसमध्ये शिवजयंतीची पावती फाडण्याच्या उद्देशाने आल्या होत्या. यावेळी हॉटेलचे मालक बाहेरगावी असल्याने ते फोनवरून चर्चा करत असतानाच संबंधित टोळक्याने आक्रमक भूमिका घेत रागाच्या भरात हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली. खुर्च्या,…
नववीत शिकणाऱ्या दोन मुलींचा संशयास्पद मृत्यू साईमत/ भुसावळ/प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील साकरी गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी घराबाहेर पडलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह गावालगतच्या विहिरीत आढळून आल्याने परिसरात तीव्र खळबळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे. साकरी येथील जनता विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या या दोन्ही मुली सकाळी नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी निघाल्या होत्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा सर्वत्र शोध सुरू करण्यात आला. शोधादरम्यान गावालगत असलेल्या सोपान फेगडे यांच्या शेतातील विहिरीत दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले. ही माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिस…
निरंकारी संत समागमाच्या पार्श्वभूमीवर भुसावळहून सांगलीकडे विशेष रेल्वेगाडी रवाना करण्यात आली. साईमत/ भुसावळ/प्रतिनिधी – संत निरंकारी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निरंकारी संत समागमाच्या पार्श्वभूमीवर भुसावळहून सांगलीकडे विशेष रेल्वेगाडी रवाना करण्यात आली. शुक्रवार, २३ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता विशेष रेल्वेगाडी क्रमांक 01209 भुसावळ रेल्वे स्थानकावरून भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात मार्गस्थ झाली. या रेल्वेच्या माध्यमातून भुसावळसह जळगाव, पाचोरा व चाळीसगाव परिसरातील भाविकांना समागमासाठी प्रवासाची सोय करण्यात आली होती.सतगुरु माताजी यांच्या असीम कृपेने तसेच झोनल इंचार्ज महात्मा हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष रेल्वे सेवा आयोजित करण्यात आली होती. संत निरंकारी मंडळाच्या विविध शाखांच्या सहकार्याने रेल्वेचे यशस्वी आयोजन पार पडले. रेल्वे रवाना होत…
आईच्या अनुपस्थितीत उचलले जीवघेणे पाऊल; संपूर्ण जुने जळगाव परिसरात हळहळ साईमत/ जळगाव /प्रतिनिधी शहरातील जुने जळगाव भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ३४ वर्षीय गणेश समाधान अहिरे (रा. जुने जळगाव) या तरुणाने आजाराशी झुंज देत थकून आपले जीवन संपवले. हा प्रकार पाहून परिसरात शोककळा पसरली आहे. माहितीनुसार, गणेश अहिरे आपल्या वृद्ध आईसोबत राहत होता. काही दिवसांपासून त्याला गंभीर आजार होता, ज्यामुळे तो शारीरिक आणि मानसिक त्रासात होता. शुक्रवारी, दि. २३ जानेवारी रोजी, त्याची आई काही कामासाठी घराबाहेर गेली असताना, गणेशने घरात कुणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. आई घरी परतल्यावर गणेश बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पाहून हंबरडा फोडला. तत्काळ परिसरातील नागरिकांनी…