Author: saimat

स्थानिक गुन्हे शाखेच्या गुप्त माहितीच्या आधारे वाहनचोरांचा पर्दाफाश; नागरिकांमध्ये समाधानाची लहर साईमत/भुसावळ /प्रतिनिधी –: स्थानिक गुन्हे शाखेने भुसावळ आणि जामनेर परिसरातील चोरीच्या मोटारसायकलींच्या प्रकरणात धाडसी कारवाई करत तीन दुचाकी जप्त केल्या आणि दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले. ही कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली असून यामुळे वाहनचोरीच्या घटनांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार जामनेर परिसरातील अनुराग लक्ष्मण सूनगत (वय १९, रा. वाकी रोड, हरी ॐ नगर, जामनेर) आणि दर्शन बाप्पू चव्हाण (वय १८, रा. संत सेवालाल नगर, जामनेर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीदरम्यान त्यांनी एका साथीदारासह मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. तपासात समोर…

Read More

सकाळी ट्रॅक्टर पलटी, बाजारात धावपळ; जीवितहानी टळली साईमत/जळगाव /प्रतिनिधी – जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शुक्रवारी सकाळी एका अनियंत्रित ट्रॅक्टरने महामार्गावर पलटी घेतली; सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (३० जानेवारी) सकाळी सुमारे १० वाजता शेतकऱ्यांचा माल खाली करून ट्रॅक्टर (क्र. MH 19 BG 8416) भाजीपाला मार्केटच्या मुख्य गेटमधून बाहेर पडत होता. मात्र, मार्केट परिसरातून बाहेर येताच राष्ट्रीय महामार्गावर वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रॅक्टर अचानक पलटी घेतली. सकाळी १० वाजेच्या वेळेमुळे बाजार समिती परिसरात गर्दी होती आणि ट्रॅक्टर पलटी झाल्याने जोराचा आवाज झाला, ज्यामुळे परिसरात धावपळ उडाली. अपघातात चालकासह कुणालाही दुखापत झालेली नाही, ही…

Read More

 पोलिसांच्या कारवाईत दोन संशयित ताब्यात साईमत/अमळनेर /प्रतिनिधी – अमळनेर शहरातील मेहेतर कॉलनी परिसरात जुन्या वादातून २७ जानेवारीच्या रात्री एका तरुणावर बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुरूवारी, २९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये दोन संशयित आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाहरुख खान रहिम खान पठाण (वय ३४, रा. चुनाधामी, गांधीलीपुरा) हे मंगळवारी, २७ जानेवारी रोजी रात्री सुमारे १ वाजता मुस्लिम कब्रस्तान परिसरातून जात असताना ही घटना घडली. जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयित आरोपी विक्की घोगले आणि दिपक प्रभुदास लोहरे यांनी शाहरुख यांना अडवून शिवीगाळ…

Read More

खळबळजनक  चोपड्यात दोन चिमुकल्यांसह महिलेची विहिरीत उडी साईमत/चोपडा /प्रतिनिधी –: जळगाव-चोपडा तालुक्यातील उमर्टी गावातून एका धक्कादायक घटनेची माहिती समोर आली आहे. २८ वर्षीय पमिता डोंगरसिंग पावरा या महिलेने दोन लहान मुलांसह स्वतःच्या घरातील विहिरीत उडी घेतली, ज्यामुळे तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अडीच वर्षांचा विरेन आणि १५ दिवसांचे बाळ यांचा समावेश आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, पमिता काही दिवसांपूर्वीच बाळंत झाली होती आणि माहेरी आली होती. तिचा मोठा मुलगा विरेन काही दिवसांसाठी वडिलांकडे होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून लोकांत दुःख आणि भीती पसरली आहे. बुधवारी स्थानिकांनी विहिरीत तिघांचे मृतदेह तरंगताना पाहिले. तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले, त्यानंतर रात्रीच अंत्यसंस्कार…

Read More

महिलेला हात धरून मोटारसायकलीवर बसवण्याचा प्रयत्न साईमत/पाचोरा/प्रतिनिधी –:  पाचोरा शहरातील पुजारी नगर परिसरात बुधवारी दुपारी २ ते २:३० वाजेच्या सुमारास एका २० वर्षीय विवाहितेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली. कामाच्या निमित्ताने शहरात आलेली पीडित महिला एका रिकाम्या प्लॉटजवळून जात असताना, आरोपी निलेश कुमावत दुचाकीवर येऊन तिचा उजवा हात धरून बळजबरीने मोटारसायकलीवर बसवण्याचा प्रयत्न केला. महिलेवर लज्जास्पद कृत्य केल्याने तिने जोरात आरडाओरड केली, त्यावर आरोपी तिथून पसार झाला. घाबरलेली महिला ताबडतोब पाचोरा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा तपास पोलीस पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू ठेवला असून, आरोपीच्या शोधासाठी शहरभर पथक तैनात करण्यात आले आहे.पोलीसांनी नागरिकांना…

Read More

पुजारी नगरमध्ये पोलीसही आरोपी; ५१ वर्षीय व्यक्तीवर घरात हल्ला साईमत/पाचोरा/प्रतिनिधी – पाचोरा शहरातील पुजारी नगर भागात एका ५१ वर्षीय व्यक्तीवर घराबाहेर बोलावून शिवीगाळ करत घरात घुसून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना २८ जानेवारी रोजी घडली. विशेष बाब म्हणजे या प्रकरणात एका पोलीस अंमलदाराचा समावेश असून, पोलिसांनी आरोपींविरुद्ध त्वरित गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादी निलेशकुमार लक्ष्मणराव कुमावत यांच्या तक्रारीनुसार, भडगाव पोलीस ठाण्यात नोकरी करणारा अल्पेश सुभाष कुमावत आणि त्याचा सहकारी योगेश चंद्रभान कुमावत यांनी घराबाहेर बोलावून फिर्यादीवर शिवीगाळ करत हल्ला केला. फिर्यादी जीव वाचवण्यासाठी आपल्या घरात पळाला, परंतु आरोपींनी त्याच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून त्याचे डोके भिंतीवर आपटले. याचवेळी, आरोपींनी फिर्यादीच्या आईलाही…

Read More

मुलांच्या खेळण्याच्या वादातून हिंसाचार  साईमत/नशिराबाद/प्रतिनिधी – नशिराबाद गावातील मणियार मोहल्ला परिसरात मुलांच्या खेळण्याच्या किरकोळ कारणावरून उफाळलेल्या वादाचे रूपांतर थेट हिंसक हाणामारीत होऊन एका ३७ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना २५ जानेवारी रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी बुधवारी (दि. २८) सकाळी ११.३० वाजता जखमी तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिसांनी संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख खलील अहमद सलीम मणियार (वय ३७, रा. मणियार मोहल्ला, नशिराबाद) हे रविवारी सायंकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी उपस्थित असताना मुलांच्या खेळण्यावरून शेख ओसामा शेख रहेमतुल्ला व त्याचे दोन नातेवाईक यांच्यात वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक वाद…

Read More

 शेतकऱ्यांचे पीक आणि घरांचे मोठे नुकसान साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी –: मुक्ताईनगर मतदारसंघातील ग्रामीण भाग मंगळवार, २७ जानेवारी रोजी निसर्गाच्या प्रचंड कोपाखाली आला. अचानक आलेल्या अवकाळी वादळी पावसामुळे तालुक्यातील कोथळी, चांगदेव, चिंचोल, मानेगाव, वढवे, उचंदे, पंचाना, मेळसांगावे, दुई, सुकळी आणि खामखेडा या जवळजवळ १० ते १२ गावांना मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून, विशेषतः गहू आणि मका यांचे दाणे भरण्याच्या टप्प्यात असताना वादळी वाऱ्यामुळे उभी पिके झोपली आणि अनेक बळीराजे आपले प्रयत्न अपुरे पडल्याने हतबल झाले आहेत. याशिवाय ग्रामीण भागातील अनेक कच्च्या घरांवरील छप्पर उडून गेले, भिंती कोसळल्या, ज्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. घटनेची माहिती मिळताच,…

Read More

जळगाव सायबर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे साईमत/ जळगाव/प्रतिनिधी –: शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळेल, असा आमिष दाखवून एका ६१ वर्षीय निवृत्त व्यक्तीची तब्बल १ कोटी ३५ लाख ८५ हजार १८९ रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कमलाकर धोंडू चौधरी (वय ६१, रा. तिवारी नगर, महाबळ रोड, जळगाव) हे सेवानिवृत्त आहेत. ३१ ऑगस्ट २०२५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना ‘Astha Trade 833 Education Community’ नावाच्या ग्रुपमध्ये ॲड केले. या ग्रुपद्वारे ‘ACSTRADE’…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार विमान अपघातात मृत्यू, राज्यभर शोककळा साईमत/ जळगाव/प्रतिनिधी –: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती तालुक्यातील विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात एकूण पाच जणांचा बळी गेला असून, महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताचे शिकार झालेल्यांमध्ये अजित पवार यांच्यासोबत वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, पायलट-इन-कमांड शांभवी पाठक आणि कॅप्टन सुमित कपूर यांचा समावेश आहे. पिंकी माळी:ठाण्यातील २९ वर्षीय फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी या अपघातात बळी ठरल्या. मॉडेलिंगमध्ये करियर करण्याची स्वप्न बाळगणाऱ्या पिंकीची आकांक्षा या दुर्दैवी दुर्घटनेत संपुष्टात आली. वरळीतील तिच्या घरात आई–बाबा आणि भाऊ राहतात. नियमितपणे आई–बाबांशी फोनवर संपर्क साधणारी पिंकी,…

Read More