आनंदाने परीक्षेला सामोरे जा : डॉ नूतन पाटील साईमत/जळगाव/प्रतिनिधी : अभ्यासाला जर आनंद जोडला तर तणाव बराच कमी होऊ शकतो. विद्यार्थ्यांनो अभ्यासाचे नियोजन करा. परीक्षेची भीती बाळगू नका. चिंतन, लेखन सराव करा. असा सल्ला नूतन मराठा महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाच्या डॉ. नूतन पाटील यांनी दिला. येथील मू जे महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील वादविवाद मंडळाद्वारे “अभ्यासातील ताण तणाव व व्यवस्थापन ” या विषयावर आयोजित व्याख्यानात त्यांनी व्याख्याता म्हणून बोलतांना अभ्यास कसा करावा? अभ्यास करताना येणारा ताण आणि त्या ताणाचे व्यवस्थापन यावर आपले विचार व्यक्त केले. ताणाविषयी बोलताना डॉ. नूतन पाटील म्हणाल्या की, ताण आल्यास विद्यार्थी एक तर ताणापासून दूर जातो किंवा…
Author: saimat
साईमत/जळगाव/प्रतिनिधी : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरात विविध कार्यक्रम राबविले जात आहे. याच मोहिमेत कमी माईक्रॉनच्या प्लास्टीकचा वापर बंद करावा, यासाठी आकस्मिक पाहणी करण्यात आली. यात आरोग्यास अपायकारक प्लास्टीक वापर होत असल्याचे दिसून आले. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथकाने सुप्रीम कॉलनी परिसरातील दुकानातून १० किलो कमी मायक्रॉनच्या प्लास्टीक जप्त करत दुकान चालकास ५ हजार रुपये दंड करण्यात आला. सदर कारवाई गुरुवारी दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सुप्रीम कॉलनी येथील अपना स्वीट या दुकानात करण्यात आली. दुकानातून सुमारे १० किलो कमी मायक्रॉनच्या प्लॉस्टीक पिशव्या आढळून आल्या त्या जप्त करून दुकान चालकास ५ हजार रुपये दंड करण्यात आला. सदर कारवाई…
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला प्रारंभ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : सामाजिक न्याय विभागाच्या सर्व गरीब गरजू आणि मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या योजना ग्रामिण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान निश्चित उपयोगी पडेल, अशी आशा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. समाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजना गावागावात पोहचाव्या यासाठी जिल्ह्यात 26 सप्टेंबर पासून गावोगावी एलईडी चित्ररथ फिरणार असून आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या चित्ररथाला झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य घनश्याम अग्रवाल, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील,…
इनरव्हील क्लब जळगावच्या महिलांना मार्गदर्शन,एचआयव्हीग्रस्त महिलेला शिलाई मशिन वाटप, मुकबधिर मुलीला शिष्यवृत्ति साईमत/जळगाव /प्रतिनिधी : महिलांनी आपल्यातील शक्ती ओळखून, आपल्या मर्यादाही समजून घेतल्या पाहिजेत. घर, परिवार आणि सामाजिक स्तरावर सकारात्मकरित्या पुढे येऊन सर्व विचारांना प्रोत्साहन दिले पाहिजे. ज्या विचारांतून दीन, दुबळ्यांसह गरजवंतांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे काम इनरव्हीलच्या माध्यमातून करता येत आहे, त्यासाठी जळगाव इनरव्हील क्लबच्या माध्यमातून उषा जैन व टिम प्रयत्न करत असल्याचा आनंद आहे. सध्या समाजात अस्वस्थता असून सामाजिकस्तरावर अस्वस्थता आहे. ही भरकटेलेली दिशा बदलविण्याची ताकद महिलांमध्ये आहे. इनरव्हिल क्लबच्या विशिष्ट प्रक्रियेतून विधायक कार्यासाठी प्रत्येक महिलेने पुढाकार घ्यावा व आपल्या संस्कृतीचे संवर्धन करावे असे आवाहन डिस्ट्रीक चेअरमन जयश्री पोफळे…
दारूबंदी विभागाची कारवाई, ६८ हजाराचे कच्चे रसायन नष्ट साईमत/वरणगाव/प्रतिनिधी : भुसावळ तालुक्यातील दारूबंदी विभागाच्या ओझरखेडा गावात मंगळवारी दुपारी ४ वाजता सुमारास अवैध हातभट्टी दारू ठिकाणावर अचानक धाड टाकुन ६८ हजाराचे कच्चे रसायन आणि तयार केलेली दारू नष्ट केली आहे. भुसावळ तालुका दारूबंदी अधिकारी सुजित कपाटे यांना ओझरखेडा गावालगतच्या साठवण तलावाजवळील पाटसरीत एका मंदिराजवळ अवैध गावठी दारूची हातभट्टी गेल्या कित्येक वर्षापासून सुरु असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मंगळवारी अजय गावंडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, ईश्वर बाविस्कर व अन्य कर्मचाऱ्यांचे पथक घेऊन ओझरखेडा गावालगतच्या तलावाजवळ मिळालेल्या माहितीप्रमाणे पाटचारीत शोध घेतला असता पथकाला अवैध दारूची हातभट्टी आढळून आली. मात्र, दारूभट्टीचा मालक आणि…
२२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत साईमत/रावेर/प्रतिनिधी : रावेर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी एका गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्तुलसह दोन मॅगझिन २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी त्यांच्या कॅबीनमध्ये पोलीस उप निरीक्षक तुषार पाटील, पो.हे.कॉ.विष्णु बिऱ्हाळे, विनोद पाटील, ईश्वर देशमुख, राहुल महाजन, रवींद्र पंजारी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे यांना बोलावून कळविले. मिळालेल्या गोपनिय बातमीप्रमाणे रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील पाल दुरक्षेत्र अंतर्गत कुसुंबा ते लालमाती रस्त्यावरील जल्लार शहाबाबाच्या दर्ग्याजवळ समोर एक जण गावठी देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याठिकाणी…
संशयित आरोपीला अटक, हल्ल्यात एक किरकोळ जखमी साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : येथून जवळच असलेल्या साकेगाव येथे एका तरुणाने चाकूने भोसकून महिलेची हत्या केल्याची घटना घडली आहे. यावेळी एक जण किरकोळ जख्मी झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे . सविस्तर असे की, सोनाली महेंद्र कोळी हिला २५ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी सागर रमेश कोळी हा जोरजोरात शिविगाळ व आरोळ्या मारत सोनाली कोळीच्या पाठीवर व पोटाच्या बाजूला चाकुने वार करीत होता. यावेळी विनोद सुभाष कुंभार (रा . साकेगाव) हा वाचविण्यासाठी गेला होता. ‘तू आमच्यामध्ये पडू नको’ असे म्हणत सागरने विनोद कुंभारच्या उजव्या हाताच्या…
सेवानगर येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जल्लोषात प्रवेश साईमत/चाळीसगाव /प्रतिनिधी : तालुक्यातील बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार आणि खासदार असताना सतत प्रयत्नशिल होतो. आजही समाजातील प्रत्येक व्यक्तींशी संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तत्पर आहे. समाजाने विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी माझी धडपड सुरू आहे.समाजाने मला दिलेले प्रेम आशिर्वाद याचे भान सदैव राहील, अशी भावना शिवसेना नेते माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. सेवानगर, ता. चाळीसगाव येथे भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. सुरुवातीला संत सेवालाल महाराज, श्री संत बाळूमामा व हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते…
महाविद्यालयाचा परिसर स्वच्छता घोषणांनी दणाणला साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : येथील बी.पी.आर्ट्स,एस.एम.ए.सायन्स,के.के.सी.कॉमर्स कॉलेज तसेच चाळीसगाव नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त ‘स्वच्छता हीच सेवा’ हा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छता साखळी तयार केली. उपप्राचार्य प्रा. डी.एल.वसईकर यांनी स्वच्छतेची शपथ सर्व उपस्थितांना दिली. संपूर्ण महाविद्यालय परिसर स्वच्छता घोषणांनी दणाणून गेले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. व्ही.बिल्दिकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत राष्ट्रीय सेवा योजना दिवस आणि स्वच्छतेचे महत्त्व विषद केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.ए. व्ही.काटे, उपप्राचार्य डॉ.खापर्डे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. आर. आर. बोरसे, एनसीसी विभाग प्रमुख डॉ.चंदनशिव, विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा.प्रभाकर पगार तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर…
विद्यालयाच्यावतीने मान्यवरांचा सत्कार साईमत/भडगाव/प्रतिनिधी : येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित आमडदे येथील सौ.साधनाताई प्रतापराव पाटील प्राथमिक माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, शाळेत संस्थेचे संस्थापक कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या २३व्या पुण्यस्मरण सप्ताहाचे उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रतापराव हरी पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालिका डॉ. पूनम पाटील, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी मानद सचिव तथा कै. दीनानाथ दूध उत्पादक सोसायटी आमडदे येथील चेअरमन जगदीश पाटील, पाचोरा येथील व्याख्याते रवी पाटील, स्थानिक स्कूल कमिटीचे…