दोन सत्रात विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन साईमत/चोपडा/प्रतिनिधी : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने ‘ताण-तणाव मुक्त परीक्षा व कॉपीमुक्त परीक्षा अभियान’ कार्यशाळेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, प्रमुख मार्गदर्शक म्हणून परीक्षा विभाग प्रमुख डॉ.के.एस.भावसार व मानसशास्त्र विभाग एस.बी.पाटील उपस्थित होते. व्यापीठावर प्रा.सौ.एस.टी.शिंदे, विद्यार्थी विकास विभागअधिकारी डॉ.डी.डी. कर्दपवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ.डी.डी.कर्दपवार यांनी विद्यार्थ्यांना ‘ताण-तणाव मुक्त परीक्षा व कॉपीमुक्त परीक्षा अभियान’ कार्यशाळेची माहिती दिली. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात मार्गदर्शक डॉ.के.एस.भावसार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना, विद्यार्थ्यांनी कॉपी न करता कॉपी मुक्त परीक्षा दिली पाहिजे, जेणेकरून त्यांचे नुकसान होणार नाही. तसेच विद्यापीठ कॉपी केस…
Author: saimat
नानासाहेब य.ना.चव्हाण महाविद्यालयात ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात स्वच्छता पंधरवडा अभियान अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी “स्वच्छता हीच खरी सेवा” विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस. आर.जाधव उपस्थित होते. व्यासपीठावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अधिसभा सदस्य, मीनाक्षी निकम, प्रा.सुनील निकम, उपप्राचार्य डॉ.जी.डी.देशमुख, डॉ. उज्ज्वला नन्नवरे, डॉ.विजय लकवाल उपस्थित होते. यावेळी अधिसभा सदस्य, मीनाक्षी निकम यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. अधिसभा सदस्य प्रा. सुनील निकम यांनी ‘स्वच्छता हीच खरी…
३० गावातील ४७१ शेतकऱ्यांचे नुकसान, तात्काळ नुकसान भरपाईची मागणी साईमत/रावेर/प्रतिनिधी : तालुक्यातील केळी व खरिपाची पिकांना अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठया प्रमाणावर पुन्हा एकदा भुई सपाट केले आहे. तालुक्यातील ३० गावांच्या शिवारातील केळी, कापुस, मका, तुर, चवळी, उडीद, मुग याचे ४७१ शेतकऱ्यांच्या सुमारे २५० हेक्टर क्षेत्रावर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल व कृषी विभागातर्फे वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने तालुक्याच्या शेती शिवाराला झोडपल्याने खिरोदे प्र, रावेर, रसलपूर, मुंजलवाडी, विवरे, बलवाडी, शिंगाडी, भामलवाडी, सिंगत, वडगाव, निंभोरा, ऐनपूर, निंबोल, मस्कावद, आभोडा खुर्द, जिन्सी, गुलाब वाडी, लालमाती आदी गावांसह ३० ते ४० गावांचा समावेश आहे.…
मनसेत ५० तरुणांचा ॲड.जयप्रकाश बाविस्कर, ॲड.जमील देशपांडे यांच्या उपस्थितीत प्रवेश साईमत/यावल/प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक-अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होऊन तसेच मनसेचे नेते ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांच्या अमोल दर्शनामुळे आणि मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संजय नन्नवरे यांच्या ५० व्या वाढदिवसाचे निमित्त साधत पाडळसे गावातील ५० कट्टर कार्यकर्त्यांनी २ दिवसांपूर्वी मनसेमध्ये स्वयंस्फूर्तीने प्रवेश करून तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भक्कम फळी निर्माण करण्याचा संकल्प केला.तालुक्यातील पाडळसे येथील भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रमात उपस्थित मार्गदर्शक ॲड.जमीलभाई देशपांडे, भुसावळ उप जिल्हाध्यक्ष विनोद पाठक, जळगाव महानगर अध्यक्ष किरण तळेले, उपाध्यक्ष सतिष सैंदाणे आणि यावल शहराध्यक्ष अजय तायडे (पाडळसा, भालोद गटाचे), यावल ता.उपाध्यक्ष पंकज तावडे,…
९० भजनी मंडळांनी घेतला सहभाग, आज होणार बक्षीस वितरण साईमत/भडगाव/प्रतिनिधी : कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या २३ व्या पुण्यस्मरण सप्ताह अंतर्गत, नानासाहेब श्री प्रतापराव हरी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भडगाव व पाचोरा तालुक्यातील भजनी मंडळासाठी नुकतीच भव्य भजन गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रतापराव पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालिका डॉ.पूनम पाटील उपस्थित होत्या. भजन स्पर्धेचे उद्घाटन ह.भ.प.गोविंद महाराज, पाचोरकर मठाधिपती पंढरपूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ह.भ.प.स्वप्निल महाराज, गिरडकर, संस्थेचे समन्वयक कमलेश शिंदे, विविध शाखांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. भजन गीत गायन स्पर्धेला…
शेतकरी शिवसंवाद यात्रेअंतर्गत घेतला शेतकरी मेळावा साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या अंतर्गत पिंपळगाव हरेश्वर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यानिमित्त पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी उध्दव मराठे, अरूण पाटील, रमेश बाफना, गजू पाटील, विसपुते अण्णा, बी.आर. महाजन, भास्कर नाथ, ज्ञानेश्वर पाटील, भारत क्षीरसागर, हिलाल पाटील, तिलोत्तमा मौर्य, सिकंदर तडवी, अण्णा परदेशी, अजय तेली, योगेश बडगुजर, कोमल देशमुख, कैलास क्षीरसागर, शांताराम पाटील, भाऊसाहेब पाटील, राजेंद्र देवरे, अरूण तांबे, विजया मालकर, चंद्रकला क्षीरसागर, धनराज पाटील, विलास राजपूत, राजेंद्र…
पाळधीला “स्वच्छता ही सेवा” अभियानात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी : आरोग्याचा खरा मंत्र स्वच्छता आहे. “ स्वच्छ परिसर व स्वच्छ गाव ” ही प्रत्येकाची वैयक्तिक तसेच सामूहिक जबाबदारी आहे. गावाच्या स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग मोलाचा ठरत आहे. ही बाब शासनासाठी उत्साहवर्धक आहे. स्वच्छता ही केवळ गरजच नाही तर ती एक सवय झाली पाहिजे. बाह्य स्वच्छते बरोबर मनाची स्वच्छता झाली पाहिजे. यासाठी मन आणि गाव दोन्ही स्वच्छ ठेवा. प्रत्येकाने स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी करावी. स्वच्छता करणारे प्रत्येक सफाई कर्मचारी हेच त्या – त्या गावाचे खरे नायक असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते…
‘झाडे जीवनाचा आधार, असा असावा गणेशोत्सव’ विषयावर अप्रतीम सादरीकरण साईमत/चोपडा/प्रतिनिधी : येथील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पंकज विद्यालयातील इयत्ता चौथीचा विद्यार्थी राजवीर गजानन कदम याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच जान्हवी अनिल मोतिराळे हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ह्या स्पर्धा तु.स.झोपे विद्यालय, भुसावळ यांनी बाबासाहेब के.नारखेडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केल्या होत्या. त्यात विद्यार्थ्यांनी ‘झाडे जीवनाचा आधार आणि असा असावा गणेशोत्सव’ विषयावर अप्रतीम सादरीकरण केले.विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक डी.एम.जैस्वाल, मनोज अहिरे, प्रियंका पाटील यांचे व पालकांचे यशस्वी मार्गदर्शन लाभले. भुसावळ येथील आयोजित समारंभात दोघे विद्यार्थी यांना मान्यवर संस्थाध्यक्ष मकरंद नारखेडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन अभिनंदन पालक सोबत सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अत्याधुनिक जळीत कक्षाचे लोकार्पण साईमत/जळगाव/प्रतिनिधी : आपण ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यास प्राधान्य दिले आहे. मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागाचे लोकार्पण हे आरोग्य सेवेत एक महत्त्वपूर्ण पावले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी मागच्या चार वर्षात जिल्हा वार्षिक नियोजन मधून अत्याधुनिक करणासाठी नव्या तंत्रज्ञानाने सज्ज असलेले यंत्र सामुग्री दिले आहेत. आज त्यात अत्याधुनिक जळीत उपचार वॉर्डची भर पडली. उत्तर महाराष्ट्रातलं सर्वाधिक अत्याधुनिक रुग्णालय म्हणून ओळख निर्माण होत आहे. डीपीडीसीतून दिलेल्या मोठ्या निधीमुळे सिव्हील हॉस्पिटल व महाविद्यालयाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलला असल्याने सर्वसामान्यांना आपल्या हक्काचे हॉस्पिटल वाटत असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…
गोदावरी अभियांत्रिकीत प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी प्रवर्तन इंडक्शन प्रोग्रामचे उद्घाटन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा संस्थेतील प्राध्यापकांशी सुसंवाद निर्माण व्हावा व त्यांना शैक्षणिक वातावरणाशी जुळवून घेता यावे या उदात्त हेतूने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसीय इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डॉ.नितीन भोळे (विभाग प्रमुख, बेसिक सायन्स अँड ह्यूम्यानिटीज), डॉ. ईश्वर जाधव (रजिस्ट्रार), डॉ.विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर)तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग व प्रथम वर्षाचे सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य…