Author: saimat

विक्रेत्यांकडून समाजातील लोकांची माफी मागून सर्वांचे झाले समाधान साईमत/बोदवड/प्रतिनिधी तालुक्यातील जामठी येथे अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशा आशयची मागणी ग्रामस्थांच्यावतीने निवेदनाद्वारे केली होती. दोन दिवस बोदवड पोलीस स्टेशनकडून अवैध दारू विक्रेत्यांवर छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर विक्रेत्यांनी तात्पुरती दारू विकायचे बंद केले. दारूमुळे गावातील १५ ते २५ वयोगटातील मुले व्यसनाधीन झाल्यामुळे काहींचे संसार उद्‍ध्वस्त झाले. हा रोष अनेक महिलांच्या मनामध्ये असून मोठ्या संख्येने महिला रस्त्यावर उतरून दारूबंदीचे घोषणा दिल्या. पोलिसांची गाडी गावात येताच सर्व दारू विक्रेत्यांनी दारूचे खोके लंपास केले. जामठी येथील काही नागरिकांच्या निदर्शनास आढळून आले की, अवैध दारू विक्रेते दारू विकत आहे, अशी माहिती मिळताच गावातील…

Read More

पीआय भोळे यांच्यासह पीएसआय सुजित पाटील यांचे होतेय कौतुक साईमत/बोदवड/प्रतिनिधी बोदवड पोलीस स्टेशनकडील पीएसआय सुजित पाटील हे मॉर्निंग वॉक करत असताना बस स्थानक बोदवड येथे सुरक्षेच्या दृष्टीने फेरफटका मारत असताना दोन मुली तोंडाला स्कार्फ बांधून बसलेल्या दिसल्या. गर्दीतही सुजित पाटील यांच्या चाणाक्ष नजरेने ह्या मुली काहीतरी संशय निर्माण करणाऱ्या आहेत, हे ओळखले. सुजित पाटील यांनी मुलींची विचारपूस केल्यावर त्या मुली जामनेर तालुक्यातील बेटावद बु.येथील असल्याची माहिती समोर आली. सुजित पाटील यांनी मुलींना विश्वासात घेऊन अधिक माहिती विचारल्यावर मुली पालकांना न सांगता घरातून पळून आल्या होत्या. भुसावळ येथुन दूर जाण्याच्या तयारीत होत्या. तेव्हा सुजित पाटील यांनी तत्काळ हा प्रकार पो.नि. श्री.भोळे…

Read More

अंत्योदय रेशन योजनेचा लाभ मिळाल्यावर दिव्यागांच्या चेहऱ्यावर उमटला आनंद साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी दिव्यांगांना शासनाच्या अन्नपुरवठा योजनेतून अंत्योदय शिधापत्रिकाचा लाभ मिळत नसल्याने दिव्यांग बांधव योजनेपासून वंचित राहत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय शिधापत्रिका कार्ड देताना प्राधान्य देण्यात यावे, असा आदेश आहे, असे असतानाही दिव्यांग कायदा-२०१६ च्या दिव्यांग व्यक्तींना हक्क अधिनियम कायद्यानुसार दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय अन्न शिधापत्रिका योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे. त्यानुसार दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड मिळावे, यासाठी लोहारा येथील एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेच्या प्रतिनिधींनी पाचोरा तहसीलदार यांना विविध निवेदने दिली होती. अशातच लोहारा येथील स्वस्त धान्य दुकान येथून दिव्यांगाना अंत्योदय रेशन योजनेचा…

Read More

उपकोषागारात होणार जमा : निवडणूक निर्णय अधिकारींची माहिती साईमत/चोपडा/प्रतिनिधी तिरंगा चौक श्रीनाथ प्राईड येथे २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास होंडाई व्हेन्यू कंपनीची गाडीत तीस लाख रुपयांची रोकड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून नाकाबंदी तपासणी केली जात असतांना हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही रक्कम कुणाची आणि कुठे घेऊन जात होते, हे अद्याप समोर आलेले नाही. निवडणूक पार्श्वभूमीवर उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. लवकरच सत्यता उघड होईल, असा दावा पोलिसांनी केला आहे. घटनेतील गाडी होंडाई व्हेन्यू कंपनीची क्र.एमपी०९-सीके७४७४ असा अाहे. तिच्यात ३० लाखांची रोकड मिळून आली. त्यात ५०० रुपये दराचे १५ लाख रुपये…

Read More

चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल साईमत/चोपडा/प्रतिनिधी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी अधिक तपास करीत अचानक एकाच्या घरी धाड टाकल्यावर २४ ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास मोहम्मद कादिश शेख आयुब (वय ३८, रा.केजीएन कॉलनी, नायरा पेट्रोल पंपच्या मागील गल्ली) राहत असलेल्या घरात घराच्या बाजूस असलेल्या गोडाऊनमध्ये प्रतिबंध असलेल्या पान मसाला व सुगंधित तंबाखू, जर्दा एक लाख ८७ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तो पहाटेच विक्री करतांना आढळून आल्याने चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी त्याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, महेश्वर रेड्डी यांनी नाकाबंदी करण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्याप्रमाणे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस…

Read More

चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल साईमत/चोपडा/प्रतिनिधी चोपडा-शिरपूर रस्त्यावर बंद टोल नाक्याजवळ २३ ऑक्टोबर रोजी साडे आठ वाजता संशयित आरोपी आकाश गणेश चव्हाण (वय २४, रा.तळेगाव दाभाडे, पुणे, ह.मु. वाल्मिक नगर, पनवेल) याने मोटारसायकलने (क्र.एमएच१४- केएल ४३०३) गावठी बनावटीचे पिस्तूल (सिल्व्हर रंगाचा कट्टा) आणि पिवळसर रंगाचे दोन जिवंत काडतूस मिळून आल्याने त्याच्यावर चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत सापडल्याने आकाश चव्हाण यांच्यावर गुन्हा नोंद केला असून आरोपीस ताब्यात घेतले आहे. निवडणूक विधानसभा २०२४ च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी नाकाबंदी करण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्याप्रमाणे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, त्यांच्या सोबत असलेले पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांनी…

Read More

आमदारांच्या समर्थनार्थ पालकमंत्री गुलाबराव पाटील, गिरीषभाऊ महाजन पाचोऱ्यात, नामांकनसाठी आजी – माजी आमदारांच्या समर्थकांत उत्साह साईमत/पाचोरा/प्रतिनिधी पाचोरा -भडगाव मतदासंघांत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी, २४ ऑक्टोबर रोजी मतदारसंघांचे विद्यमान आणि माजी आमदार यांनी शक्ती प्रदर्शन आणि सभा घेवून आमदारकीचे नामांकन निवडणूक निर्णय अधिकारी भूषण अहिरे यांच्याकडे दाखल केले. नामांकन दाखल करण्यासाठी राजकारणातील पारंपरिक राजकिय प्रतिस्पर्धी आजी – माजी आमदारांनी शक्ती प्रदर्शनाचे दर्शन जनतेला दाखविले. पाचोरा – भडगाव मतदारसंघांत विधानसभेची चुरस आणि प्रचार दिवसेंदिवस आरोप प्रत्यारोप करून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांची उमेदवारी महायुती कडून ठरलेली आणि घोषित झाल्याने आमदार किशोर पाटील यांनी मोंढाळा रोड वरील तुळजाई…

Read More

जिल्ह्यातील पाच उमेदवार घोषित साईमत / जळगाव / प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत यात जिल्ह्यातील पाच जागांचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये 288 जागांच्या वाटपावर चर्चा चालू आहे. जवळपास सर्वच जागांवरील चर्चा निकाली लागली आहे. असे असताना आता भाजपाने एकूण 99 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर, जामनेर, चाळीसगाव, रावेर, भुसावळ अशा पाच मतदारसंघांचा समावेश आहे. भाजपच्या यादीत आज जामनेरातून ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, जळगाव शहरातून विद्यमान आमदार राजूमामा भोळे, भुसावळमधून आमदार संजय सावकारे, चाळीसगावातुन आमदार मंगेश चव्हाण, रावेर-यावलमधून पक्षाचे…

Read More

भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल साईमत/भुसावळ/प्रतिनिधी तालुक्यातील कुऱ्हा ते मोंढाळा रस्त्यावरील शेताजवळ पिकअप वाहन आणि डंपर यांच्या झालेल्या भीषण अपघातात पिकअप वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेले दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी घडली होती. भावसिंग रामदास पवार (रा. धानोरी, ता. बोदवड) असे मयत झालेल्या चालकाचे नाव आहे. सविस्तर असे की, भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा ते मोंढाळा रस्त्यावरील शेताजवळ पिकअप वाहन (क्र.एमएच १९ सीवाय८०४९) आणि डंपर (एमएच१९ झेड ३९४३) यांच्यात समोरासमोर अपघात झाला. अपघातात पिकअप वाहनातील चालक भावसिंग पवार याचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेले प्रवीण संजय जाधव, अजय आनंदा बेलदार हे गंभीर जखमी झाले. जखमींना…

Read More

लसीकरणाविषयी विद्यार्थ्यांना दिले धडे साईमत/मलकापूर/प्रतिनिधी डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाविषयी महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या वैद्यकीय सुविधांअंतर्गत प्रा. तेजल खर्चे आणि महाविद्यालयीन वैद्यकीय सेलच्या इंचार्ज प्रा. रुतुजा पाटील यांनी केले. कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याने आणि त्याच्या संभाव्य धोका वाढत असल्याने कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत आवश्यक ठरले. सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या उद्घाटनाने झाली. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाचे महत्त्व सांगितले आणि कर्करोगासंबंधी जनजागृती करण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित करणे किती आवश्यक आहे यावर जोर दिला. प्राचार्यांनी कर्करोगाच्या विविध प्रकारांची माहिती दिली आणि यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी सुस्पष्ट विचार व्यक्त केले. कार्यक्रमात मलकापूरचे…

Read More