कष्ट, शिस्त आणि स्वप्नांची ताकद प्रेम पुरकरचा नेपाळमध्ये सुवर्णविजय साईमत /मुक्ताईनगर/ /प्रतिनिधी : ग्रामीण भागातील जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांची ताकद पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठळकपणे अधोरेखित झाली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा गावाचा सुपुत्र प्रेम श्रीकृष्ण पुरकर याने नेपाळमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत २०० मीटर धावण्यात सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला. या दैदीप्यमान यशानंतर चारठाणा गावात प्रेमचे ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात भव्य स्वागत करण्यात आले. नेपाळमधील पोखरा येथील रंगसाला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयोजित ‘युथ गेम इंडो–नेपाळ इंटरनॅशनल सिरीज २०२६’ या प्रतिष्ठित स्पर्धेत प्रेम पुरकरने २०० मीटर धावण्याचे अंतर अवघ्या २३ सेकंद ८७ पॉइंट्समध्ये पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला. अत्यंत साध्या व हलाखीच्या…
Author: saimat
बोगस अपंग प्रमाणपत्राचा पर्दाफाश; जळगाव जि.प.मध्ये कारवाई वेगात साईमत /जळगाव/बोदवड/प्रतिनिधी : बोगस दिव्यांग (अपंग) प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरी मिळविल्याच्या प्रकरणात राज्यभरात सुरू असलेल्या कठोर कारवाईचे पडसाद आता जळगाव जिल्हा परिषदेतही उमटू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी दोन कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतर आता आणखी एका कर्मचाऱ्याला निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, आणखी एका कर्मचाऱ्याच्या निलंबन प्रस्तावावर मंगळवार, दि. १३ रोजी निर्णय होणार आहे. ही कारवाई जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. ताज्या कारवाईत ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, बोदवड येथे कार्यरत असलेले वरिष्ठ सहाय्यक शंकर वसंतराव वाघमारे यांचे निलंबन करण्यात आले आहे. दिव्यांगत्व तपासणी अहवालात शासनाने निश्चित केलेल्या आवश्यक…
जळगावात १४० लिटर गावठी दारू जप्त, दोघांवर गुन्हा साईमत/जळगाव/प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरात धडक कारवाई करत अवैध दारूविक्रीवर मोठा आळा घातला आहे. येत्या १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार असल्याने निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत रेल्वे स्थानक व शिवाजीनगर परिसरातून तब्बल १४० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण सीताराम सोनवणे आणि विवेक विजय ढाके अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघे रेल्वे स्थानक परिसर आणि शिवाजीनगर भागात गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची…
राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त बोदवड येथे आयोजित जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. साईमत /बोदवड/प्रतिनिधी – राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त बोदवड येथे आयोजित जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. यावेळी १३ ते ३० वयोगटासाठी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या मिराताई दिनेश माळी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बोदवड पोलीस निरीक्षक अरविंद भोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील, माजी नगराध्यक्ष, आ.चंद्रकांत पाटील यांचे चिरंजीव हर्षराज पाटील, अनुप हजारी, नगरसेवक सुनील बोरसे, दिनेश माळी, निलेश माळी, हर्ष बडगुजर, देवा देवकर, अनंत वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. भव्य मॅरेथॉन स्पर्धेत मुलांच्या गटात प्रथम क्रमांक वैभव पुरुषोत्तम बरडे (बुलढाणा), द्वितीय सचिन…
कडाक्याच्या थंडीसह अनेक समस्यांचा सामना करत ठरला चॅम्पियन साईमत /ता. यावल /प्रतिनिधी : जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर डोंबिवलीतील अवघ्या आठ वर्षांच्या ओम कुणाल भंगाळे याने न्हावीकर (ता. यावल) व डोंबिवलीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्याने मुंबईतील अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे १७ किलोमीटरचे सागरी अंतर अवघ्या २ तास ३३ मिनिटांत पार केले आहे. ओम डोंबिवलीतील ओमकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये तिसरीत शिकतो. यश जिमखान्यात प्रशिक्षक विलास माने यांच्या मार्गदर्शनाखाली तो जलतरणाचे धडे गिरवत होता. विशेष म्हणजे, या मोहिमेपूर्वी ओमला समुद्रात पोहोण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तरीही त्याची जिद्द पाहून त्याचे आई-वडील आणि आजोबांनी त्याला पाठिंबा दिला. या मोहिमेसाठी प्रशिक्षक विलास…
आसिफ मोहम्मद यांनी अनपेक्षित विजय पटकावला साईमत /रावेर /प्रतिनिधी : सोमवारी (१२ जानेवारी) रावेर नगरपालिकेत झालेल्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत नाट्यमय आणि चकमकीसह गोंधळ निर्माण झाला. विशेष सभेपूर्वीच दोन राजकीय गटांमध्ये झालेल्या जोरदार वादावादीत नगरसेवक गणेश सोपान पाटील यांच्या अंगावरील कपडे फाटण्याची धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे नगरपालिका परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली, परंतु या घटनेने शहरात मोठा गदारोळ उडाला. राड्यापूर्वीचे राजकीय तणाव उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप समर्थकांमध्ये सुरुवातीपासूनच चकमक सुरू होती. मतदान सुरू होण्याआधीच ओढताण इतकी वाढली की शरद पवार गटाचे नगरसेवक गणेश पाटील यांचे कपडे…
युवक जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील यांचा तडकाफडकी राजीनामा साईमत /जळगाव /प्रतिनिधी : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलेला असतानाच, मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला जळगावात मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील यांनी अचानक आपल्या पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घडामोडीमुळे निवडणूक काळातच पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विश्वजीत पाटील यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांना उद्देशून अधिकृत राजीनामा पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी राजीनाम्याचे कारण वैयक्तिक असल्याचे नमूद केले आहे. “माझ्या वैयक्तिक कारणांमुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार…
महापौर कोण? जळगावात आरक्षणाचा सस्पेन्स कायम; प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात इच्छुकांची धडधड साईमत /जळगाव /प्रतिनिधी : जळगाव महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा रणसंग्राम आता अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. केवळ काही तासांत, उद्या १३ जानेवारीपासून प्रचाराच्या तोफा थंडावणार असून १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. मात्र, निवडणुकीचा कौल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अद्याप महापौर पदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आणि सस्पेन्सचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. प्रतिष्ठेची ही लढाई असल्याने सर्वच पक्षांनी प्रचारात ताकद पणाला लावली असून प्रभागनिहाय जोरदार हालचाली सुरू आहेत.…
ॲड.अर्जुन पाटील यांचा इशारा; बेघर वृद्ध दाम्पत्याला मिळवून दिली ८१ आर. जमीन साईमत /बोदवड/प्रतिनिधी : ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक असून त्यांचा छळ करून सेवा-सुश्रूषेचे आमिष दाखवून मालमत्ता हडपणाऱ्या मुलांनी सावध राहावे. आई-वडिलांना योग्य वागणूक दिली नाही तर दिलेली संपत्ती कायद्यानुसार परत घेतली जाऊ शकते, असा ठाम इशारा ॲड. अर्जुन पाटील यांनी दिला आहे. ज्येष्ठ नागरिक कायदा पालकांच्या बाजूने असून त्यांनी अन्याय सहन करण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुक्ताईनगर येथील मुक्ताई मंदिर परिसरात वास्तव्यास असलेल्या गोळेगाव (ता. बोदवड, जि. जळगाव) येथील कस्तुराबाई शांताराम पाटील (वय ७६) व शांताराम नामदेव पाटील (वय ७७) या वृद्ध दाम्पत्याची व्यथा जाणून घेतल्यानंतर…
जळगावातील दोन मोठ्या चोरीचे गुन्हे उघडकीस साईमत /जळगाव /प्रतिनिधी : शहरातील घरफोडींच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला स्थानिक पोलीसांनी मोठा फटका दिला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या यशस्वी कारवाईत आंतरराज्यीय अट्टल गुन्हेगार चंदन राजू जुनी याला पुण्यातील हडपसर परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून, त्याने जळगावातील दोन मोठ्या घरफोडींच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दोन स्वतंत्र पथकांची स्थापना करून तपास सुरू केला होता. शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करून संशयित आरोपीची ओळख पटविण्यात पोलीस यशस्वी झाले. चंदन राजू जुनी (वय ४५, रा.…