Author: saimat

भंडारा : भरधाव ट्रकने दुचाकीस्वार पती- पत्नीला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यात समोर आला आहे. यामध्ये पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहे. रविवारी तुमसर-मोहाडी राज्य मार्गावरील खरबी येथे ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. तर मोहाडी पोलिसात अपघाताची नोंद करत पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. दुचाकीस्वार पती -पत्नी रस्त्याच्या बाजूला नातेवाईकांसोबत बोलत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या डब्लु सी एल कंपनीचा कोळसा भरलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली.या धडकेनंतर दुचाकीस्वार पती -पत्नी जागीच ठार झाले तर एक महिला गंभीर झाली आहे. तुमसर-मोहाडी…

Read More

बारासात (पश्चिम बंगाल) ः पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात रविवारी सकाळी एका बेकायदा फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान सात जण ठार तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले की,कोलकात्याच्या उत्तरेला सुमारे ३० किलोमीटरवर असलेल्या दत्तपुकुर पोलीस ठाण्यांतर्गत नीलगंजच्या मोशपोल भागात फटाक्यांच्या कारखान्यात अनेक कामगार काम करत असताना हा स्फोट झाला.जखमींमध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. हा स्फोट इतका भीषण आणि जोरदार होता की, त्याच्या धयाने कारखाना कोसळून त्याचे ढिगाऱ्यात रूपांतर झाले. परिसरातील काही घरांचेही नुकसान झाले. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केला आहे. मेमध्ये पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एगरा येथे एका…

Read More

बंगळुरु ः काही महिन्यांपूर्वी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने देशभर खळबळ उडवली होती. त्यानंतर मीरारोड परिसरात सरस्वती वैद्यची तिचा लिव्ह इन पार्टनर मनोज सानेने निर्घृणपणे हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये लपवून ठेवले होते.आता पुन्हा एक लिव्ह-इन पार्टनर तरुणीच्या हत्येचा प्रकार उघड झाला आहे. २४ वर्षीय तरुणाने त्याच्या समवयीन लिव्ह-इन पार्टनरची कुकरने हत्या केली असून तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. हा सगळा प्रकार बंगळुरूमध्ये घडला आहे. बंगळुरूच्या साऊथ-ईस्ट डिव्हिजनचे डीसीपी सी. के. बाबा यांनी यासंदर्भात प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे. त्यानुसार शनिवारी संध्याकाळी बंगळुरूच्या बेगूर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव वैष्णव असून तरुणीचे नाव देवी…

Read More

चेन्नई ः वृत्तसंस्था काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या उटी या ठिकाणी असलेल्या चॉकलेट फॅक्टरीला भेट दिली. या चॉकलेट फॅक्टरीचे वैशिष्ट्य हे आहे की, या फॅक्टरीत सगळ्या महिलाच काम करतात. इथे काम कसं चालतं हे जेव्हा राहुल गांधी महिला कर्मचाऱ्यांकडून जाणून घेत होते त्याचवेळी तिथे एक लहान मुलगी आहे. तिने राहुल गांधींना एक विनंती केली. ज्यानंतर राहुल गांधी यांनी केलेली कृती चर्चेत आहे. हा व्हिडीओही व्हायरल होतो आहे. काय आहे व्हायरल व्हिडीओत? राहुल गांधी महिला कर्मचाऱ्यांशी बोलत होते त्याचवेळी तिथे एक चिमुरडी मुलगी आली. तिने राहुल गांधींना विचारले, तुम्ही मला सही द्याल का? राहुल गांधींनी तिच्या वहीवर सही केली आणि…

Read More

मुंबई ः प्रतिनिधी अजित पवार मुख्यमंत्री होणारच नाहीत, असे चॅलेंज राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एका कार्यक्रमात केले होते. तसेच मंत्रीपदाची शपथ घेतलेले नऊही आमदार पुन्हा शरद पवारांकडे परततील असा दावाही त्यांनी केला होता. यावर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “२०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार आहेत. २०२४ नंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात समन्वय होईल. जागा वाटप या समन्वयाने होईल. त्यानंतर जो काही निकाल येईल, त्यानंतर केंद्रीय संसदीय मंडळ जो निर्णय घेईल त्यानुसार आम्ही पुढे जाऊ”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. “५१ टक्के लोक मोदींच्या बाजूला आहेत.अजितदादांनी चांगला निर्णय घेतला.राजकारणात काही…

Read More

मुंबई : मंत्री धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेल्या बीडच्या सभेत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सडकून प्रहार केलेतेलगी प्रकरण, पहाटेचा शपथविधी ते दादांचे नेतृत्व यावरून भुजबळांनी फटकेबाजी करताना शरद पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. संपूर्ण भाषणात भुजबळांनी पवारांना टार्गेट केले. आधीच लांबलेल्या भाषणाला उपस्थित कंटाळले होते. त्यात भुजबळ एकामागून एक पवारांवर वार करत राहिले. हाच धागा पकडून आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.पवारसाहेबांच्या विरोधात सूर निघाल्याने उपस्थित बीडकरांनी गोंधळ केला.त्यामुळे पुढच्या २ मिनिटांत त्यांना भाषण गुंडाळावे लागले, अशी टीका रोहित पवार यांनी केली. …सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची… अस्मितेची……

Read More

काश्मीर ः उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील एका शाळेत शिक्षिकेने वर्गातील विद्यार्थ्यांना एका मुस्लीम विद्यार्थ्याला मारहाण करायला लावली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. हे प्रकरण ताजे असताना आता जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील सरकारी शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित विद्यार्थ्याने वर्गातील फलकावर ‘जय श्री राम’ लिहिल्याने ही मारहाण झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षकासह शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे तर मुख्याध्यापक फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एका वृत्तानुसार, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३ (स्वैच्छिकपणे दुखापत करणे), ३४२ (चुकीच्या पद्धतीने बंदिस्त करणे), ५०४ (जाणूनबुजून अपमान…

Read More

मुंबई ः प्रतिनिधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि महाराष्ट्र सरकार जोरदार टीकास्र सोडले आहे. देशातील महागाई, बेरोजगारी आणि कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर आहेत.या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून दंगली पेटवण्याचे काम सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. दरम्यान, त्यांनी केंद्र आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी हा आरोप केला. यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले, “गेल्या दहा वर्षांत जेवढा भ्रष्टाचार झाला, तेवढा ब्रिटिशांनीही त्यांच्या काळात केला नसेल.काल गुजरातच्या मंत्रालयात नवीन घोटाळा उघडकीस आला आहे. भाजपाचा मित्र असलेल्या उद्योगपतीला ३७०० कोटींचा फायदा मिळवून दिला आहे. शक्तिसिंह…

Read More

सोलापूर : मुलाला शिक्षणासाठी मामाकडे पाठविल्याचा राग मनात धरून दारूड्या नवऱ्याने पत्नीचा खून केला आणि तिने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केल्याचा प्रकार करमाळा शहरात घडला. पतीला पोलिसांनी अटक केली आहे. उमा प्रफुल्ल पवार (वय ३२, रा. फंड गल्ली, करमाळा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ दादा मारुती चव्हाण (वय ३५, रा. लऊळ, ता. माढा) याने करमाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचा मेव्हणा प्रफुल्ल विठ्ठल पवार (वय ४१) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नोंद झालेल्या फिर्यादीनुसार आरोपी प्रफुल्ल पवार यास दारूचे व्यसन असून तो कुटुंबाची जबाबदारी सांभाळत नव्हता. त्यामुळे मुलांचे पालनपोषण होणे कठीण झाले होते.…

Read More

मुंबई ः प्रतिनिधी मुस्लीम समाजातील विद्यार्थ्याला त्याच्या वर्गमित्रांकडून थप्पड मारणाऱ्या शिक्षिकेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता महाराष्ट्रातूनही एक गंभीर प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडीओ ट्वीट केला आहे. कबुतर आणि शेळी चोरल्याच्या संशयावरून तीन दलित तरुणांना बेदम मारहाण केल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरद्वारे केला आहे. त्यांनी यासंदर्भातील व्हिडीओही पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत असून तो हात जोडून विनंती करताना दिसतोय. आपण निर्दोष असल्याचे वारंवार सांगूनही त्याच्यावर विश्वास ठेवला जात नाही.तर, दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्या मुलाला झाडाला टांगलेले दिसत आहे. “महाराष्ट्रात आणखी एक जातीय अत्याचार. हा व्हिडीओ श्रीरामपूर,…

Read More