वरणगाव : प्रतिनिधी वेल्हाळे गावालगतच्या स्मशानभूमीत गावातील दोन महिला व एक पुरुष अघोरी कृत्य करीत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी स्मशानभूमीकडे धाव घेतली. मात्र, त्याची भणक लागताच अघोरी कृत्य करणारे जोडपे, मांत्रिक महिलेने घटनास्थळावरून धूम ठोकली. या प्रकाराची गावात चांगलीच चर्चा रंगली आहे. अघोरी कृत्याचा छडा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सविस्तर असे की, भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथे रविवारी, २० रोजी स्व.शांताबाई आत्माराम पाटील (वय ९२) यांचे निधन झाले होते. त्यांच्यावर गावालगतच्या स्मशानभूमीत सांयकाळी अंत्यविधी पार पडला. रात्री ८.३० वा गावातील काही शेतकरी शेती पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा गावातीलच एक पती-पत्नी व एक महिला मांत्रिकाला नग्नावस्थेत प्रेताजवळ हवन…
Author: saimat
वरणगाव : प्रतिनिधी महात्मा गांधी विद्यालयात शिल्लक साठ्यातील शालेय पोषण आहार खराब अवस्थेत असल्याचे पोषण आहार अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या तपासणीत आढळून आल्याने त्याचा पंचनामा केला आहे. मात्र, खराब व मुदतबाह्य झालेल्या पोषण आहाराची नोंदवहीत नोंद नसल्याचेही आढळून आल्याने याबाबत दोषींवर कारवाई केली जाणार का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याची कुजबुज सुरू आहे. वरणगाव व शहर परिसरात नावाजलेल्या दी वरणगाव एज्युकेशन सोसायटी संचलीत महात्मा गांधी विद्यालयातील कार्यकारिणी मंडळाचा सत्ता संघर्षाचा वाद सर्वश्रृत आहे. हा वाद आता न्यायालयाच्या पायरीपर्यंत पोहोचला आहे. त्यातच विद्यालयातील भ्रष्ट कारभार कात्रीत पकडण्यासाठी सुरु असलेल्या धडपडीत शालेय पोषण आहाराचा मुद्दा समोर…
ठाणे : पोलिस दलात काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या परिवारपासून दूर राहून आपले कर्तव्य बजवावे लागत असल्याने त्यांना या सणापासून वंचित राहावे लागत असल्याचे लक्षात घेत दिवा शहरातील महिला भगिनींनी दिवा पोलीस चौकीत रक्षाबंधन साजरे केले पोलिस कर्मचाऱ्यांना राखी बांधून आपली सामाजिक बांधिलकी जपली.अहोरात्र कर्तव्य बजावून जनतेचं रक्षण करणाऱ्या पोलिस बांधवांना बहिणीची उणीव भासू नये. त्यामुळे या पोलिस कर्मचाऱ्यांना राख्या बांधून आज त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे केले. दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो, देव त्यांच रक्षण करो, अशी प्रार्थना या पोलीस बांधवांसाठी महिलांनी देवाकडे केल्याचं यावेळी पहायला मिळालं प्रसंगी दिवा पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर तसेच रवींद्र देसले, अनिल कुरघोडे,…
वर्धा : वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील एका आश्रमशाळेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारंजा तालुक्याती नारा येथील एका आश्रमशाळेत बारा वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूनंतर आश्रमशाळेत एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील आश्रमाशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार ऐरणीवर आला आहे. दरम्यान, आश्रमशाळेत असणाऱ्या गादीखाली या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. शिवम सनोज उईके असं बारा वर्षीय मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. शिवम अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट येथील चिखलदरा तालुक्याच्या डोमा येथील राहणारा होता. शिवमचा संशयास्पद मृतदेह परिस्थितीत मृतदेह सापडल्याने कारंजा परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र शिवमचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत अद्याप…
अहमदाबाद : दुसऱ्या धर्मातील मैत्रिणीबरोबर फिरणाऱ्या एका हिंदू तरुणाला जमावाकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा प्रकार घडला आहे. २६ ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून, तरुण आणि तरुणी शहरात फिरत असताना जमावाने त्यांना थांबवलं. यानंतर काहीजणांनी तरुणाला कानशिलात लगावल्या. इतकंच नाही तर तरुणीचा बुरखा वारंवार खेचत चेहरा झाकण्यापासून थांबवलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत जमावातील काही तरुण दोघांना जाब विचारताना दिसत आहेत. तरुणाला मारहाण केली जात असून, बुरखा घातलेल्या मुस्लीम तरुणीलाही खडसावत आहेत. यावेळी ते तरुणाला ‘मुस्लीम तरुणीसह फिरण्याची हिंमत कशी झाली?’ अशी विचारणा करताना दिसत आहेत. या घटनेचा…
मैसुरू : निवडणूक जाहीरनाम्यातील आणखी एका आश्वासनाची पूर्तता करताना कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने बुधवारी ‘गृहलक्ष्मी’ योजना सुरू केली. यानुसार राज्यातील सुमारे १.१ कोटी महिलांना दर महिन्याला २ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत महाराजा महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात ‘गृहलक्ष्मी’ची सुरुवात करण्यात आली. काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेल्या पाच प्रमुख हमी योजनांपैकी ही एक आहे. काँग्रेसने मे महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करून राज्यात सत्ता स्थापन केली. सिद्धरामय्या यांनी सांगिले की, काँग्रेस सरकारने पाच हमी योजनांपैकी शक्ती, गृहज्योती आणि अन्न भाग्य या तीन योजना याआधीच सुरू…
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझे ‘बॉस’ आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात अनेकदा सांगितले असले तरी त्यांनी आता सरकारवरील आपली पकड अधिक मजबूत केली आहे. प्रत्येक महत्त्वाची फाईल फडणवीस यांच्या मंजुरीशिवाय शिंदे यांच्याकडे जाणारच नाही, असे आदेश मुख्य सचिवांनी काढल्याने सरकारवर फडणवीसांचे पूर्ण नियंत्रण प्रस्थापित झाले आहे. मात्र त्यातून प्रचलित कामकाज नियमावलीचा (रुल्स ऑफ बिझिनेस) भंग होत असल्याची चर्चा मंत्रालयीन वर्तुळात सुरू झाली आहे. राज्यघटनेतील तरतुदीनुसार उपमुख्यमंत्री पदाला मुख्यमंत्र्यांप्रमाणे कोणतेही विशेष अधिकार नाहीत, मुख्यमंत्री हे सरकारचे घटनात्मक प्रमुख आहेत. उपमुख्यमंत्री हे त्यांच्याकडील खात्यांचे केवळ कँबिनेट मंत्री असतात. उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पर्यायी सत्ताकेंद्रे तयार होऊ नयेत, यासाठी शिवसेनेला…
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारविरोधात देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी म्हणजेच ‘इंडिया’ची आजपासून मुंबईत दोन दिवसीय बैठक सुरू होत आहे. या बैठकीवरून भारतीय जनता पार्टीसह महायुतीतले पक्ष शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गट आणि काँग्रेसवर टीका करत आहेत. तसेच या बैठकीचं यजमानपद शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे असल्यामुळे ठाकरे गटाला लक्ष्य केलं जात आहे. इंडिया’च्या बैठकीसाठी खर्च केल्या जाणाऱ्या पैशांवरून शिवसेनेच्या शिंदे गटाने आणि भारतीय जनता पार्टीने प्रश्न उपस्थित केले आहेत. याला आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांनी (शिंदे गट आणि…
मुंबई: पत्नी आणि मुलीची हत्या करणाऱ्या ९१ वर्षीय वृद्धाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अंथरुणाला खिळलेली पत्नी आणि गतीमंद मुलीचा खून करणाऱ्या वृद्धाला १८ महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. पुरुषोत्तम सिंह गंधोक असे आरोपीचे नाव असून तो अंधेरीच्या शेर-ए-पंजाबमध्ये वास्तव्यास होता. गेल्या फेब्रुवारीत त्यानं ८१ वर्षीय पत्नी आणि ५५ वर्षीय मुलीची हत्या केली. दोघींची काळजी घेण्यास मी असमर्थ होतो. त्यामुळे मी त्या दोघींची हत्या केली, असे पुरुषोत्तम सिंह गंधोकनं पोलिसांना सांगितले. गेल्या वर्षीच्या ८ ऑगस्टला दिंडोशी सत्र न्यायालयाने गंधोकता जामीन अर्ज फेटाळला. ‘पत्नी गेल्या १० वर्षांपासून अंथरुणाला खिळून होती. तिला हृदयरोग होता आणि तिची अँजियोप्लास्टी झाली होती. तर…
बोदवड : प्रतिनिधी येथील विधीसेवा प्राधिकरण आणि बोदवड पो.स्टे. यांच्या संयुक्त विद्यमाने बोदवड पो.स्टे. येथे रस्ते सुरक्षा, वाहन कायद्याबाबत जनजागृतीबाबत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.अर्जुन पाटील यांनी वाहतुकीचे नियम पाळणे ही सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करून अपघाताचे प्रमाण कमी होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. अध्यक्षस्थानी तथा उद्घाटक न्या.क्यु.यु.एन शरवरी होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वाढत अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू पाहता काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने वाहतूक नियम मोडणाऱ्या शिक्षेच्या आणि दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. मात्र, त्यानंतरही वाहन चालक हे नियम पाळत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बोदवड तालुका विधी…