पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ; २ कोटी ९७ लाखांच्या प्रकल्पातून पीडितांना मिळणार एकाच छताखाली कायदेशीर, समुपदेशन व पोलीस मदत साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी जिल्ह्यातील महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या तक्रारींचे जलद व संवेदनशील निवारण व्हावे या उद्देशाने जिल्हा पोलीस दलाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र’ाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आज (दि. ८) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून अत्याचारग्रस्त महिला व बालकांना एकाच छताखाली कायदेशीर मार्गदर्शन, मानसिक समुपदेशन तसेच पोलीस मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे पीडितांना तक्रार…
Author: saimat
गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान उपक्रम साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी सामाजिक बांधिलकीच्या ध्येयाने प्रेरित होऊन गुरुकुल कॉलनी येथे ८ मार्च २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे विशेष महत्त्व हे आहे की ते परमपूज्य श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक उपक्रमाला साथ द्यावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. शिबिराचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांच्या वतीने करण्यात आले असून, सकाळी ८ वाजता सुरू होऊन दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. रक्तदात्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आयोजकांचा मुख्य उद्देश म्हणजे…
तालुक्याची पहिली IAS अधिकारी साईमत/ मुक्ताईनगर/ प्रतिनिधी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत मुक्ताईनगरची कन्या मोहिनी अशोक जगताप हिने ३२३ वी रँक मिळवून देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. खास म्हणजे, मुक्ताईनगर तालुक्यातून आयएएस अधिकारी होण्याचा पहिला मान मोहिनीच्या नावावर नोंदला गेला आहे. तिच्या या यशाने संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात आनंदाची लाट पसरवली आहे. प्राथमिक शाळेतून थेट UPSC पर्यंतचा प्रवास मोहिनीचे प्रारंभिक शिक्षण सरकारी शाळेतून झाले असून, त्या काळापासूनच तिने मोठ्या अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. कोणत्याही महानगराचा आधार न घेता, फक्त स्वतःच्या कठीण परिश्रम आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर तिने UPSC सारख्या कठीण परीक्षेत यश मिळवले. तिचा प्रवास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक…
फेसबुकवरील मैत्री महागात जळगावच्या तरुणावर ब्लॅकमेलिंगचा फटका साईमत/ जळगाव /प्रतिनिधी सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना सावध न राहिल्याने जळगावचा १९ वर्षीय विद्यार्थी आर्थिक फसवणुकीचा बळी ठरला आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये फेसबुकवर एका अनोळखी तरुणीशी ओळख झाल्यानंतर त्याला तब्बल ५ लाख ९५ हजार ४५० रुपये ब्लॅकमेलिंगद्वारे उकळण्यात आले, अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. पीडित तरुण सध्या नाशिक येथे बीएससीचे शिक्षण घेत आहे. त्याची फेसबुकवरून ओळख झालेल्या तरुणीने त्याला Tango नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. अॅपवर ‘नेहा शर्मा’ नावाच्या महिलेबरोबर त्याची ओळख झाली. काही दिवसांतच तिने…
आदिवासी शालेय विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप, विविध योजनांचा लाभ साईमत /जळगाव /प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य उभे करताना “रयतेचा राजा म्हणजे रयतेची सेवा” हा मूलमंत्र ठेवला होता. त्या तत्त्वावर चालत आज राज्य शासन नागरिकांच्या दारी पोहोचत असून, नागरिकांना थेट शासकीय सेवा मिळाव्यात, यासाठी “महाराजस्व समाधान शिबिर”चे आयोजन केले जात आहे. भोकर व आसोदा येथे झालेल्या या शिबिराचे उद्घाटन करत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गोरगरिबांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा असल्याचे प्रतिपादन केले. पालकमंत्री पाटील म्हणाले, “एखाद्या गरीब आईला तिच्या मुलासाठी दाखला मिळणे, एखाद्या शेतकऱ्याचा जमीन प्रश्न सुटणे किंवा एखाद्या कुटुंबाला घरकुल मिळणे – या आनंदातून शासनाच्या कार्याचे खरे समाधान मिळते. आपल्या जीवनाचा…
आ. अनिल पाटील यांचा पाठपुरावा यशस्वी साईमत /अमळनेर / प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या २०२६–२७ च्या अर्थसंकल्पात अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाल्याची आनंदाची माहिती आमदार आ. अनिल पाटील यांनी दिली. या निधीतून मतदारसंघातील महत्त्वाच्या रस्त्यांची दुरुस्ती, मजबुतीकरण तसेच इतर पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळणार असून स्थानिक विकासाला चालना मिळेल, असे आमदार पाटील यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अमळनेर मतदारसंघात सातत्याने विकासकामांचा आलेख वाढत असल्याचे दिसून येत आहे. रस्ते, पूल तसेच इतर पायाभूत सुविधांची अनेक कामे पूर्ण झाली असून काही कामे वेगाने सुरू आहेत. यामुळे मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलत असल्याचे स्थानिक नागरिकांकडूनही नमूद…
मुख्य मार्गांचे काँक्रिटीकरण होणार; जळगावसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद साईमत/जळगाव/प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला. २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात जळगाव शहरासाठी तब्बल २२.५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण होणार असून नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित रस्त्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. या निधीची माहिती आमदार राजूमामा भोळे यांनी दिली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जळगाव शहरातील विकासकामांना गती मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत शहरातील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा…
होळीला घर बंद, चोरट्यांची संधी; शिक्षक कॉलनीत १.६८ लाखांची घरफोडी साईमत/जामनेर/प्रतिनिधी शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या शिक्षक कॉलनीत घरफोडीची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. होळीच्या सणानिमित्त कुटुंबासह गावी गेलेल्या घरमालकाच्या अनुपस्थितीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे १ लाख ६८ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या घटनेतील संशयित चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात राहणारे दरबार नवलसिंग राठोड हे आपल्या कुटुंबासह येथे वास्तव्यास आहेत. होळीच्या सणानिमित्त ते संपूर्ण कुटुंबासह गावी गेले होते. घर बंद असल्याची माहिती मिळताच…
काळाचा घाला भीषण अपघातात तिघे जागीच ठार, तीन जखमी साईमत/मालेगाव/प्रतिनिधी होळीच्या सणाच्या आनंदाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड गावातील नाफडे कुटुंबावर शुक्रवारी सकाळी ६ मार्च रोजी काळाचा भीषण घाला आला. मालेगाव परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात चार वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सातोड गाव हळहळेत बुडाले आहे. होळीच्या सणासाठी परतीच्या प्रवासात अपघात सातोड येथील नाफडे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी नाशिक येथे वास्तव्यास आहे. होळीच्या सणानिमित्त कुलदैवताचे दर्शन घेऊन ते नाशिकहून आपल्या मूळ गावी सातोडकडे खाजगी वाहनाने प्रवास करत होते. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मालेगाव परिसरात त्यांच्या वाहनाला…
युवकाने घराच्या छताला गळफास घेऊन घेतले आयुष्य संपवण्याचे टोकाचे पाऊल, कारण अद्याप अस्पष्ट साईमत/यावल/प्रतिनिधी यावल तालुक्यातील हंबर्डी गावात एका विवाहित तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना ५ मार्च रोजी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास घडली. मृतक नितीन सुधाकर मेढे (वय ३४, रा. हंबर्डी) यांनी घराच्या छताला नायलॉन पट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले. घरातील सदस्यांना ही बाब लक्षात आल्यावर परिसरात एकच खळबळ उडाली आणि शोककळा पसरली. अद्याप नितीन मेढे यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर कुटुंबीयांना मनोवैज्ञानिक आणि भावनिक धक्का बसला असून संपूर्ण गावात…