Author: Kishor Koli

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्र सरकारमधल्या अजित पवार गट आणि शिंदे गटात धुसफूस सुरु आहे. अजित पवार गटाने विकास निधी वाटपावरून शिंदे गटाच्या मंत्र्यांविरोधात दिल्लीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी अमित शाहा यांची भेट घेतली होती. यावेळी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. विकासनिधी वाटपात तीन पक्षाचे आमदार यांना समानता हवीय मात्र, तसे प्रत्यक्ष होताना दिसत नाही. शिंदे गटाचे मंत्री विकास निधी वाटप करताना अजित पवार गटाच्या आमदारांना कमी देतात, अशी तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीत सामील झाल्यानंतर अवघ्या चारच महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत नाराज असल्याची चर्चा…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील मांडळ येथील दोन शिक्षकांचे कुटुंब राजस्थानमधील जैसलमेर येथे फिरायला जात असताना कंटेनरला धडक लागून त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मदतीसाठी तातडीने हालचाली करून तेथील जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून अपघाताची माहिती जाणून घेतली. सविस्तर असे की, मांडळ येथील शिक्षक धनराज नागराज सोनवणे (वय ५५, रा.बेटावद) आणि योगेश धोंडू साळुंखे (रा.पिंपळे रोड, अमळनेर) या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब गाडीवर (क्र.एम.एच.०४, ९११४) राजस्थान फिरायला जात होते. तेव्हा सोमवारी, १३ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे तीन वाजता बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ एका कंटेनरला धडक दिली. त्यात धनराज सोनवणे त्यांची…

Read More

मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट संंघाने वर्ल्डकप २०२३ मध्ये सलग ९ विजय मिळवत सेमीफायनलमध्ये धडक मारली.अखेरच्या साखळी लढतीत टीम इंडियाने नेदरलंँड्सवर विजय मिळवला. स्पर्धेत एकही पराभव न झालेला भारत हा एकमेव संघ आहे. सेमीफायनलमध्ये भारताची लढत १५ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. मात्र या लढतीच्या आधी भारताचे टेन्शन वाढणारी बातमी समोर आली आहे. कर्णधार रोहित शर्माने संपूर्ण स्पर्धेत फक्त ३ वेळा संघात बदल केले होते. पहिली लढत झाल्यानंतर संघात अश्विनच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली होती. त्यानंतर हार्दिक पंड्याच्या दुखापतीनंतर सूर्यकुमार यादव आणि ठाकूरच्या खराब कामगिरीमुळे मोहम्मद शमीला संधी दिली गेली.आता सेमीफायनलमध्ये भारताला कदाचीत संघात पुन्हा एकदा बदल करावा…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राजकीय फटाके सातत्याने फुटत असतात, परंतु, आज आपण केवळ दिवाळीच्या फटाक्यांबद्दल बोलणं उचित राहील. कारण राजकीय फटाके फुटायला अजून वेळ आहे. असे सूचक विधान विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. कुलाबा कोळीवाडा येथे दिवाळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला श्री. नार्वेकर उपस्थित होते. त्यांनी स्थानिक नागरिकांबरोबर दिवाळी साजरी केली, तसेच राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छादेखील दिल्या. सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी घेऊन ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नार्वेकर यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ३१ डिसेंबरच्या राजकीय फटक्यांबाबत प्रश्न विचारला. त्यावर नार्वेकर म्हणाले, तुम्ही त्याची काळजी करू नका, राजकीय फटाके फुटण्यास थोडा वेळ बाकी आहे. जनसामान्यांना…

Read More

लखनौ : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने राज्यातील विविध भागातून इसीसच्या सहा संशयितांना अटक केली आहे. रकीब इनाम, नावेद सिद्दीकी, मोहम्मद नोमान आणि मोहम्मद नाझीम अशी या सहापैकी चौघांची नावे आहेत. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी अलिगढ विद्यापीठाच्या स्टुडंट्‌‍स ऑफ अलिगढ युनिव्हर्सिटी (एसएएमयू) या विद्यार्थी संघटनेशी संबंधित आहेत. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित संशयित आरोपी देशात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची योजना आखत होते. यूपी एटीएसने सहा जणांना अटक केल्याने अलीगढ विद्यापीठात खळबळ उडाली आहे. SAMU ही ISIS मध्ये नवीन लोकांची भरती करणारी शाखा बनली आहे, असा दावाही दहशतवादविरोधी पथकाने केला. तसेच अलीगढ विद्यापीठातील इतर काही विद्यार्थीही…

Read More

पुणे : प्रतिनिधी ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांची अधिष्ठातापदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निकालावरुन त्यांना अधिष्ठातापदावरून हटवण्यात आले आहे. ललित पाटील प्रकरणामुळे संजीव ठाकूर चर्चेत होते.त्यांच्या जागी आता पुर्वीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांंची अधिष्ठातापदावर नियुक्ती करण्यात आली आहे.मागील काही दिवसांपासून संजीव ठाकूर हे नाव चांगलेच चर्चेत होते.

Read More

नागपूर : वृत्तसंस्था अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, अवकाळी पावसाचे हे संकट आणखी चार दिवस कायम राहील,असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राजधानी मुंबईसह, पुणे, ठाणे, कल्याण तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली तर पुढील चार दिवसांत मुंबई, ठाणे आणि पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ जारी केला असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तर येत्या २४ तासांत पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना समाजोपयोगी कार्य म्हणून जळगाव शहरातील निखील पाटील व वेदांत चालसे या युवकांनी सुरू केलेल्या ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर फरसाण स्टॉल चे यंदाचे ४ थे वर्ष आहे. भाऊंचे उद्यान, जाणता राजा व्यायामशाळा समोरील बाजूस हा स्टॉल लावण्यात आला आहे. या स्टॉलचे उद्घाटन दैनिक साईमतचे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर सुनील खडके, मा. शहर अभियंता शशिकांत बोरोले, बापुसाहेब पाटील, दिलीप चाळसे, आनंदसिंगअण्णा पाटील, सुरेशआबा पाटील, प्रदीपनाना सूर्यवंशी, दिपक कंडारे, रमेशअप्पा पाटील, डॉ. अवधुत चौधरी, प्रकाश पाटील, हिमांशु सोनवणे, नरेंद्र शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर सुरू…

Read More

पाटणा : वृत्तसंस्था बिहारमधील नितीश कुमार सरकारने आज (गुरुवारी) विधानसभेत आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव मांडला. या विधेयकानुसार बिहारमध्ये मागासवर्गीय, अत्यंत मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी ६५ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. सध्या या वर्गांना बिहारमध्ये ५० टक्के आरक्षण आहे.नितीश कुमार यांनी अलिकडेच राज्यात जातीनिहाय जनगणना करून त्याचा अहवाल सादर केला होता.या अहवालाचा आधार घेत त्यांनी आता आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज त्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवणारे विधेयक विधानसभेत मांडले,जे बिनविरोध मंजूर करण्यात आले आहे. बिहारमध्ये सध्या ५० टक्के आरक्षण लागू आहे.आर्थिक मागास घटकांना १० टक्के आरक्षण दिले जात होते. हे आरक्षणही कायम राहिल्यास ६५ अधिक १०…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार एकनाथराव खडसे यांना चार दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समोर आले होते. हे वृत्त समोर येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. प्रकृतीबाबत समस्या निर्माण झाल्यानंतर रविवारी रात्री उशिरा एअर ॲम्ब्युलन्सद्वारे आ.खडसेंना तातडीने मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. यानंतर आता त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती समोर आली आहे.आ.खडसे यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट लिहून प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे. ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये एकनाथ खडसे म्हणाले, “मध्यंतरी मला हृदयविकाराचा त्रास झाला. मात्र आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी प्रकृती आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन…

Read More