राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट कायम, काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

0
1

नागपूर : वृत्तसंस्था

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, अवकाळी पावसाचे हे संकट आणखी चार दिवस कायम राहील,असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
राजधानी मुंबईसह, पुणे, ठाणे, कल्याण तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली तर पुढील चार दिवसांत मुंबई, ठाणे आणि पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ जारी केला असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तर येत्या २४ तासांत पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here