अमळनेर तालुक्यातील पाच जणांचा राजस्थानमधील अपघातात मृत्यू

0
1

अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील मांडळ येथील दोन शिक्षकांचे कुटुंब राजस्थानमधील जैसलमेर येथे फिरायला जात असताना कंटेनरला धडक लागून त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मदतीसाठी तातडीने हालचाली करून तेथील जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून अपघाताची माहिती जाणून घेतली.
सविस्तर असे की, मांडळ येथील शिक्षक धनराज नागराज सोनवणे (वय ५५, रा.बेटावद) आणि योगेश धोंडू साळुंखे (रा.पिंपळे रोड, अमळनेर) या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब गाडीवर (क्र.एम.एच.०४, ९११४) राजस्थान फिरायला जात होते. तेव्हा सोमवारी, १३ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे तीन वाजता बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ एका कंटेनरला धडक दिली. त्यात धनराज सोनवणे त्यांची मुलगी स्वरांजली सोनवणे, गायत्री योगेश साळुंखे (वय ३०), प्रशांत योगेश साळुंखे (वय ७), भाग्यलक्ष्मी साळुंखे (वय १) यांचा जागीच मृत्यू झाला. धनराज सोनवणे यांच्या पत्नी सुरेखा सोनवणे ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here