पाटील, चालसे यांच्या फरसाण स्टॉलचे यंदा चौथे वर्ष

0
1

जळगाव : प्रतिनिधी

अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना समाजोपयोगी कार्य म्हणून जळगाव शहरातील निखील पाटील व वेदांत चालसे या युवकांनी सुरू केलेल्या ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर फरसाण स्टॉल चे यंदाचे ४ थे वर्ष आहे.
भाऊंचे उद्यान, जाणता राजा व्यायामशाळा समोरील बाजूस हा स्टॉल लावण्यात आला आहे. या स्टॉलचे उद्घाटन दैनिक साईमतचे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी उपमहापौर सुनील खडके, मा. शहर अभियंता शशिकांत बोरोले, बापुसाहेब पाटील, दिलीप चाळसे, आनंदसिंगअण्णा पाटील, सुरेशआबा पाटील, प्रदीपनाना सूर्यवंशी, दिपक कंडारे, रमेशअप्पा पाटील, डॉ. अवधुत चौधरी, प्रकाश पाटील, हिमांशु सोनवणे, नरेंद्र शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर सुरू असलेला हा उपक्रम सर्वसामान्यांची दिवाळी नक्कीच गोड करणारा ठरत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here