चाळीसगांव – पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे. नगरपालिका क्षेत्रात पर्यावरण संतुलन व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानाचे मूल्यमापन होणार असून यासाठी विविध वर्गवारीत गुणांचा समावेश आहे. पृथ्वी पंचतत्त्वांनुसार सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन नवीन हरितक्षेत्र विकास योजनेचे नियोजन करण्यात येत आहे. हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदूषण कमी केले जाणार आहे. पंचतत्त्वानुसार तलाव संवर्धन, जैवविविधतेचे जतन, जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन तलावांसह सार्वजनिक विहिरीची स्वच्छता, रेनवॉटर हार्वेस्टिंग, असे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. अग्नी तत्त्वांनुसार ऊर्जेचा परिणामकारक वापर व बचत, अपारंपरिक…
Author: saimat team
पुणे, वृत्तसंस्था । पुण्यात आज सकाळी डेमू रेल्वेचे काही डबे रुळावरुन घसरल्याची माहिती समोर आली आहे. पुणे रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे. सकाळी साडे नऊ वाजता ही घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. डेमू रेल्वेचे काही डबे रुळावरुन घसरल्याने रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. रेल्वेचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही रेल्वे दौंडच्या दिशेने जात होती त्यावेळी ही घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आठ…
jio ने भारतात अद्याप ५जी सर्व्हिस सुरू केलेली नाही. मात्र, ६जी वर काम करणे सुरू केले आहे. जिओची सबसिडियरी Estonia ने ६जी टेक्नोलॉजीवर रिसर्च करण्यास सुरुवात केली आहे. Jio Estonia या प्रोजेक्टवर University of Oulu सोबत मिळून काम करत आहे. कंपनीने अद्याप याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. कंपनी University of Oulu सोबत मिळून ६जी टेक्नोलॉजीच्या फ्यूचर वायरलेस end-to-end सॉल्यूशनवर काम करत आहे. कंपनीने सांगितले की, या भागीदारीमुळे एरियल आणि स्पेस कम्यूनिकेशन, होलोग्राफिक बीमफॉर्मिंग, सायबर सिक्योरिटी, मायक्रो-इलेक्ट्रॉनिक आणि फोटोनिक्समध्ये ३डी कनेक्टेड इंटेलिजेंसला इंडस्ट्री आणि अकॅडेमीमध्ये प्रोत्साहन मिळेल. तसेच, जिओ आणि University of Oulu कंझ्यूमर गुड्स, ऑटोमोटिव्ह आणि वॉइट गुड्स स्पेसमध्ये ६जी फीचरसह येणारे प्रोडक्ट्स तयार करण्यावर काम करेल.…
करोनाचा धोका अजूनही पूर्णपणे कमी झालेला नाही. दररोज हजारो करोना बाधित होत आहेत. करोनाचा वाढता धोका लक्षत घेता अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा वर्क फ्रॉम होम करण्यासच सांगितलं आहे. तसेच, अनेक शाळा आणि महाविद्यालये देखील विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाईनच घेत आहे. त्यामुळे भारतात ब्रॉडबँड सेवेची मागणी झपाट्याने वाढली आहे. ब्रॉडबँड सेवा प्रदात्यांनी युजर्सना हाय-स्पीड इंटरनेट ऍक्सेस प्रदान करण्यासाठी अनेक ब्रॉडबँड प्लान्सची नवीन श्रेणी देखील आणली आहे. तुम्हीही घरूनच काम करत असाल किंवा तुम्हाला तुमच्या मुलांच्या ऑनलाइन क्लासेससाठी सर्वोत्तम ब्रॉडबँड प्लान्स खरेदी करायचे असतील. तर ही ब्रॉडबँड प्लान्सची लिस्ट नक्की पाहा आणि तुमच्या गरजेनुसार यातील बेस्ट प्लान निवडा. यात बीएसएनएलचा ३९९…
गुणवत्ता ही खुल्या स्पर्धात्मक परीक्षेतील कामगिरीपुरती मर्यादित नसून, सामाजिक संदर्भही त्यासाठी महत्त्वाचे असल्याचे मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी असलेल्या प्रक्रियेतील (NEET) अखिल भारतीय स्तरावरील जागांमधील (ऑल इंडिया कोटा) इतर मागासवर्गीयांसाठीचे (ओबीसी) २७ टक्के आरक्षण कायम ठेवले. करोना साथरोगाच्या सध्याच्या काळात प्रवेश प्रक्रिया लांबविणे योग्य नसल्याचे नमूद करीत न्यायालयाने आर्थिक दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) सध्या असलेले दहा टक्के आरक्षणही कायम ठेवले आहे. ‘परीक्षेत मिळालेले गुण हा गुणवत्ता ठरविण्याचा एकमेव आधार असू शकत नाही. दुर्बल घटकांना समानतेची संधी देण्यासाठी राज्यघटनेचे कलम १६ (४), १५ (४) आणि १५ (५) सरकारला अधिकार देते. समानतेसाठीचा अडथळा दूर करण्यासाठी आरक्षण हा एक उपाय…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगर परिसरात राहणाऱ्या तरुणाची आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवाजी नगरातील तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समीर रामदास बांदल रा. शिवाजीनगर हुडको जळगाव असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. समीर बांदल हा शिवाजी नगरात वडील, पत्नी, भाऊ व दोन मुलींसह वास्तव्याला आहे. गेल्या दीड महिन्यांपुर्वीच समीर हा पुण्याला नोकरी लागली होती. मंगळवारी १८ जानेवारी रोजी समीरच्या घरी गोंधळाचा कार्यक्रम असल्याने तो जळगावात घरी आला होता. दरम्यान २० जानेवारी रोजी सायंकाळ…
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता. ‘प्रश्न विचारायला अक्कल लागते काय’ असे वक्तव्य महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर या वक्तव्यावरून भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यालाच अनुसरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यावेळी संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलसमोरील वर्दळीच्या रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग दिसत नाहीत. त्यामुळे पायी चालणाऱ्यांचे हाल होत आहेत. याच मुद्द्यावरून संदीप देशपांडे यांनी ‘झेब्रा क्रॉसिंग नीट रंगवायला अक्कल लागते का?’…
देशात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना एक मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीसाठी आणि खास करून उद्धव ठाकरेंसाठी चांगली बातमी आहे. देशात टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचासमावेश आहे. एका सर्वेतून ही मोठी माहिती समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे आणि सी व्होटरने ‘मूड ऑफ द नेशन’ या आधारवर सर्वे केला. २०२२ हा अतिशय ताजा सर्वे आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? यातून समोर आले आहे. यात पहिल्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या क्रमांकावर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन तिसऱ्या…
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने 51 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, पण तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही आणि पुन्हा एकदा शतक झळकावण्यापासून वंचित राहिला. या सामन्यात विराट खूपच चांगला दिसत होता आणि कर्णधारपदाचे दडपण दूर झाल्यानंतर कोहली मोठी खेळी खेळेल याची त्याच्या चाहत्यांना खात्री होती. विराटही तेच करण्याच्या मूडमध्ये होता, पण तबरेझ शम्सीचा एक चेंडू थोडा संथ राहिला आणि विराटचा येथेच पराभव झाला. तो बाद होताच संपूर्ण संघ कोलमडला आणि भारताचा सामना 31 धावांनी गमवावा लागला. विराटचे शेवटच्या पाच एकदिवसीय डावांमधील हे चौथे अर्धशतक होते. याआधी त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धही अर्धशतके झळकावली आहेत, मात्र त्याला शतक…
चोपडा – शहरात दुचाकी वाहन धारकांची संख्या कमालीची वाढली असून, दुचाकी वाहनांमध्ये मॉडिफिकेशन करून, जास्त आवाजाचे सायलेन्सर आणि कर्णकर्कश हॉर्न बसवून चोपडा शहरात सुसाट वेगात फेरफटका मारण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. हॉस्पिटल्स, शाळा, महाविद्यालये तसेच इतर शांत व सार्वजनिक ठिकाणी या सायलेन्सर व हाॕर्नमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते, शिवाय अनेकांना विनाकारण त्रासही होतो. बुलेटवरून हवा करत फिरणाऱ्या अशाच अतिउत्साही युवकांची हवा काढण्याची कारवाई चोपडा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी करावी हिच सर्वसामान्यांची अपेक्षा.आता तर चक्क तहसील कार्यालय व शहर तसेच ग्रामीण पोलिस स्टेशनच्या बाहेरील रस्त्यावरच या गाड्या फेरफटका मारत असतात. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असलेल्या पोलीस चौकीसमोरुन जात…