जळगाव प्रतिनिधी । जळगावातील सिव्हिल सर्जन डॉ. एन एस चव्हाण यांची बदली तर धरणगावचे ग्रामीणचे डॉ. किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांच्या बदली नाशिक येथे करण्यात आली असून त्यांच्या जागी धरणगाव ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आदेश आज प्राप्त झाले आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांची नाशिक येथील रूग्णालयीन प्रशिक्षण केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून बदली करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने आज काढले आहे. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे. त्यांच्या जागी धरणगाव ग्रामीण रूग्णालयाचे…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेच्या वाहनांच्या ताफ्यात आता आणखी एक नव्याने ब्राऊझर मशिनरूपी वाहन दाखल झाले आहे. या ब्राऊझर मशिनचे आज शुक्रवार, दि.21 जानेवारी 2021 रोजी सकाळी गोदावरी पीठगिरणी भागात महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. यानंतर त्यांच्या उपस्थितीतच महानगरपालिकेतर्फे गोदावरी पीठगिरणी भागातील कॉलनींतर्गत रस्त्यांच्या डागडुजीच्या कामांना सुरूवात करण्यात आली. यामुळे या परिसरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांच्या डांबरीकरणासह आता कॉलनी, उपनगरांतर्गत असलेले छोटे-छोटे रस्ते की ज्यांच्यावर काही ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आहे तेथील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह त्यावर डांबरीकरण करण्याच्या कामांनाही सुरूवात झाली आहे.…
गडचिरोली : गडचिरोली नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले . या निवडणुकीत शिवसेनेलामोठा फटका बसला आहे. तर काँग्रेस हा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. नगरपंचायत निवडणुकीसाठी (Nagar Panchayat elections) शिंदे यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. पण जिल्ह्यात पदांची खिरापत वाटल्यामुळे शिवसेनेला पराभवाचा धक्का बसला. मागली वेळेच्या तुलनेत यावेळी शिवसेनेला फक्त २ जागा अधिक मिळाल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी गडचिरोलिचे नियमित दौरेही केले होते. शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनाही त्यांनी आवाहन केले होते. पण एकाच जिल्ह्यासाठी ३ जिल्हाप्रमुख, एक संपर्कप्रमुख आणि एक जिल्हा समन्वयक, अशा पाच…
दिल्ली येथील इंडिया गेटवर (INDIA GATE) नेताजी सुभाषचंद्र बोस (SUBHASHCHNDRA BOSE) यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI) यांनी केली. नेताजींच्या पुतळ्याचे छायाचित्र ट्विट करून मोदींनी ही माहिती दिली. जोपर्यंत पुतळा तयार होत नाही, तोपर्यंत त्यांचा ‘होलोग्राम’ पुतळा तिथे उभारणार अशी माहिती त्यांनी ट्विटमध्ये दिली. नेताजींच्या जयंतीदिनी २३ जानेवारीला मी होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करणार आहे, “देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती साजरी करत आहे, त्यावेळी मला कळवायला आनंद होतो आहे की, इंडिया गेटवर त्यांचा ग्रॅनाइटचा भव्य पुतळा उभारू.” https://twitter.com/narendramodi/status/1484421974629978113?s=20 https://twitter.com/narendramodi/status/1484422112714854405?s=20
काश्मीर विलो बॅटने (Kashmir willow bat)अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात प्रवेश केला आहे. दुबईत झालेल्या शेवटच्या T20 विश्वचषकात 75 वर्षात प्रथमच दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी काश्मीरची विलो बॅट वापरली. या विकासामुळे काश्मीर विलो बॅट उद्योगाचे नशीब बदलले आहे. 100 कोटींची वार्षिक उलाढाल दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. काश्मीर विलो बॅटची मागणी प्रचंड वाढली असून जगभरातून ऑर्डर्स येत आहेत. सुमारे 12 क्रिकेट खेळणार्या देशांतील बॅट आयातदारांनी काश्मीर बॅट कारखान्यांसाठी ऑर्डर दिली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 मध्ये काश्मीर बॅट उद्योगाची स्थापना झाली. तेव्हापासून खोऱ्यात लाखो बॅट बनवण्यात आल्या आहेत, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी त्यांचा वापर केलेला नाही. विलो बॅट कारखान्याचे मालक फज्जल कबीर म्हणाले, “गेल्या…
जळगाव, प्रतिनिधी । माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्तांवर हद्दपारीची कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 14 दिवसांपासून साखळी उपोषणास बसलेले रिपाइं ( आठवले) गटाचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनांंचा ताफा अडवून प्रशासनाचा निषेध केला. यावर ना. अब्दुल सत्तार यांनी या प्रश्नी चौकशी करून योग्य न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले. जळगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांच्याविरूध्द गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतांना जिल्हा पोलिस यंत्रणेने त्यांना संरक्षण दिले आहे. हे संरक्षण त्वरित काढून घेण्यात यावे व त्यांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करावे या मागणीसाठी रिपाइं आठवले गटाचे महानगराध्यक्ष…
जळगाव, : ज्या वेळी देशात 50 टक्के महिला उद्योजक होतील तेव्हा भारत हा जगात क्रमांक एकचा देश बनेल. आजच्या महिला या स्वयंपूर्ण आहेत. त्यामुळेच त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळणेही तितकेच गरजेचे आहे. महिलांमध्ये आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करण्याची गरज असून यासाठी घरातल्या प्रत्येक पुरुषाने पुढाकार घेण्याची गरज आहे. महिलांना उद्योग क्षेत्रांत ताकदीची नव्हे, तर फक्त इतरांच्या विश्वासाची गरज आहे असा सूर रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालय व एशियन इस्टीट्यूट ऑफ फॅमिली मॅनेज बिजनेस मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या “द गेम चेंजर-वूमन” या वेबिनारमधील मार्गदर्शकामधून निघाला. या ऑनलाईन वेबिनार मार्गदर्शनात रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, “न्यूसम” मुंबई च्या संचालिका फोरम शहा, हिल…
चाळीसगांव – पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे. नगरपालिका क्षेत्रात पर्यावरण संतुलन व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानाचे मूल्यमापन होणार असून यासाठी विविध वर्गवारीत गुणांचा समावेश आहे. पृथ्वी पंचतत्त्वांनुसार सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन नवीन हरितक्षेत्र विकास योजनेचे नियोजन करण्यात येत आहे. हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदूषण कमी केले जाणार आहे. पंचतत्त्वानुसार तलाव संवर्धन, जैवविविधतेचे जतन, जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन तलावांसह सार्वजनिक विहिरीची स्वच्छता, रेनवॉटर हार्वेस्टिंग, असे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. अग्नी तत्त्वांनुसार ऊर्जेचा परिणामकारक वापर व बचत, अपारंपरिक…
पुणे, वृत्तसंस्था । पुण्यात आज सकाळी डेमू रेल्वेचे काही डबे रुळावरुन घसरल्याची माहिती समोर आली आहे. पुणे रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे. सकाळी साडे नऊ वाजता ही घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. डेमू रेल्वेचे काही डबे रुळावरुन घसरल्याने रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. रेल्वेचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही रेल्वे दौंडच्या दिशेने जात होती त्यावेळी ही घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आठ…
jio ने भारतात अद्याप ५जी सर्व्हिस सुरू केलेली नाही. मात्र, ६जी वर काम करणे सुरू केले आहे. जिओची सबसिडियरी Estonia ने ६जी टेक्नोलॉजीवर रिसर्च करण्यास सुरुवात केली आहे. Jio Estonia या प्रोजेक्टवर University of Oulu सोबत मिळून काम करत आहे. कंपनीने अद्याप याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. कंपनी University of Oulu सोबत मिळून ६जी टेक्नोलॉजीच्या फ्यूचर वायरलेस end-to-end सॉल्यूशनवर काम करत आहे. कंपनीने सांगितले की, या भागीदारीमुळे एरियल आणि स्पेस कम्यूनिकेशन, होलोग्राफिक बीमफॉर्मिंग, सायबर सिक्योरिटी, मायक्रो-इलेक्ट्रॉनिक आणि फोटोनिक्समध्ये ३डी कनेक्टेड इंटेलिजेंसला इंडस्ट्री आणि अकॅडेमीमध्ये प्रोत्साहन मिळेल. तसेच, जिओ आणि University of Oulu कंझ्यूमर गुड्स, ऑटोमोटिव्ह आणि वॉइट गुड्स स्पेसमध्ये ६जी फीचरसह येणारे प्रोडक्ट्स तयार करण्यावर काम करेल.…